शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 तगडे व्यक्तिमत्त्व. बाळासाहेब आणि शरद पवार साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळेच स्थान आहे. हे दोन्ही नेते राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक होते. पण राजकारणापलीकडे या दोघांची मैत्री सर्वसृत होती. शरद पवार व बाळासाहेबांनी राजकारणा पलिकडे जाऊन स्नेहाचा धागा नेहमी अबाधित ठेवला. शिवसेनेसोबत त्यांचे राजकीय मतभेद होते तरीही त्यांचे बाळासाहेब व शिवसैनकाशी मनभेद कधीच नव्हते. शरद पवार आणि बाळासाहेबांच्या स्नेहातून महाराष्ट्रातील राजकारणात निराळेच समीकरण तयार केले आहे.
शरद पवार साहेबांनी मे 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याच्या 8 दिवस आधीच शरद पवार हे नवीन पक्ष काढणार असल्याची भविष्यवाणी स्व. बाळा ठसकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून केली होती. बाळासाहेब आणि पवार साहेब हे राजकीय विरोधक असले तरी ते एकमेकांच्या पक्षसाठी सल्ला मसलत करत असत. शरद पवार यांना बारामतीचा म्हमद्या किंवा मद्याचे पोटे अशा शब्दात आपल्या स्टाईलने टीका करताना बाळासाहेबांना उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. पण तरीही शरद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात कधीही कटुता आली नाही. ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीवर उगवतात की मातीखाली उगवतात हे माहिती नाही त्यांनी माझ्याबद्दल बोलू नये अशा शब्दात पवारसाहेब देखील त्यांच्यावर सभामधून बोलायचे. त्यांचे संबंध नेहमी मैत्रीपूर्ण आणि खेळीमेळीचे होते. ही दोन ब्रम्हफुले एकाच वेलीवर फुलली असल्याने त्यांची आपसातील वीण घट्ट होती याची दार्शनिक असणारे अनेक किस्से गेल्या साठ वर्षात घडले.
तारुण्यात असताना बाळासाहेब व शरद पवार यांनी एकत्र येऊन एक मासिक सुरू केले होते. आज आपण खासरेवर जाणून घेणार आहोत या मासिकाबद्दल सर्व माहिती.
कधी सुरू केले होते मासिक-
आपन सर्वजण बाळासाहेबांच्या व्यंग्यचित्र कले बाबत परिचित आहोत. बाळासाहेबांनी राजकारणात येण्याच्या अगोदर एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नावर भाष्य करण्यास सुरुवात केली. 1950 मध्ये ते फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी जेष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्यासोबतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करत असताना बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपनीसाठी व नियतकालिकासाठी चित्रे व्यंगचित्र-जाहिरातीचे काम करत असत.
पुढे 1960 मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली. त्याच काळात त्यांनी एक मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे हे मासिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे असा संकल्प त्यांनी केला होता. हे मासिक चालू करण्यासाठी बाळासाहेबांना शरद पवार, भा.कृ. देसाई, आणि शशीशेखर वैद्यक या तीन तरुणांची साथ मिळाली. खूप विचार-विनिमय करून सर्व नियोजन झाल्यानंतर त्यांनी ‘राजनीती’ या नावाने मासिक सुरू केले. या मासिकावर चौघांची समान मालकी होती.
कसे होते मासिकाचे नियोजण-
अगदी जोमाने नियोजन करून या चौघांनी हे मासिक सुरू केले. मासिकामध्ये दरवेळेस मजकूर छापण्याआधी दार वेळेस चौघांनी मजकूर तपासून घायचे ठरले. यात नेमकी कोणती सदरे घायची यासाठी त्यांनी मिळून अनेक बैठका घेतल्या. मासिकासाठी समान भांडवल उभा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यांनी त्यानुसार 55 हजार रुपयांचे भांडवल जमा केले. मासिकाचे सर्व महत्वाच्या गोष्टी त्यात मार्केटिंग, डिझाईन यावर तासनतास त्यांनी चर्चा केली. मासिक तयार झाल्यानंतर ते स्वतः वितरित करायचे का वितरकावर याची जबाबदारी द्यायची यावर खूप चर्चा झाली आणि शेवटी वितरकावर याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी त्याकाळातीळ अग्रगण्य वितरकांच्या भेटी घेतल्या. ते चौघे जण या मासिकावर इतकी मेहनत घेत होते त्यावरून त्यांना हे मासिक लवकरच देशात पाहिल्या स्थानावर जाईल याची खात्री होती.
बाळासाहेबांचा शब्द असायचा अंतिम शब्द-
मासिकाच्या पहिल्या अंकाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या प्रकाशनाचा विषय आला. त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांच्या बहिणीच्या विचाराने ठरवू असे सांगितले. यावर पवार साहेबांनी थोडा विरोध केला पण निर्णय प्रक्रियेत बाळासाहेबांचा शब्द ह अंतिम शब्द होता. मग ते मुहूर्त बघण्यासाठी बहिणीकडे गेले व ठरलेल्या मुहूर्तावर मासिकाचे प्रकाशन झाले. मासिकाचा प्रकाशन सोहळा मोठी प्रसिद्धी करून करण्यात आला.
मासिकाचे शेवटी काय झाले-
पहिला अंक छापल्यानंतर तो वितरकाकडे गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी विक्रीचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या गावांना भेटी दिल्या. त्यात त्यांना एकही अंक शिल्लक नसल्याचे कळले. त्यांनी अत्यंत खुशीने वितरकांना संपर्क साधला पण वितरकाणे केलेल्या खुलाशाने ते हैराण झाले. या मासिकाचा एकही अंक विकला ना गेल्याने ते वितरकांनी जमा करून कपाटात ठेवून दिले होते. मासिकाची अशी दुरवस्था झाल्याने हा या मासिकाचा पहिला आणि शेवटचा अंक ठरला. हे मासिक पुन्हा कधीही प्रकाशित झाले नाही.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे खासरे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: बाळासाहेबाच्या ह्या आदेशामुळे दादा कोंडके सगळ्यापर्यंत पोहचले..
वाचा: शरद पवार या नावाच ज्यांना पित्त आहे त्यांनी जरूर वाचावा असा लेख…