आजकाल प्रत्येकाच्या घरी वर्तमानपत्र येतात. वर्तमानपत्र प्रत्येक घरातील एक गरजेची वस्तू आहे म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचून जगाच्या कानाकोपऱ्यात घडत असलेल्या प्रत्येक गोष्ट सहजासहजी माहिती होते. अन सहसा आपण प्रत्येक बातमी अगदी मन लावून वाचत असतो. पण असे खूप कमी व्यक्ती असतील की त्यांचे लक्ष वर्तमानपत्रात असणाऱ्या 4 ठिपक्यांकडे गेले असेल व त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे का असतात. आणि तुमचे लक्ष त्या ठिपक्यांकडे गेले तरी तुम्हाला त्याविषयी माहिती नसेल. आज आम्ही तुमच्या माहितीसाठी खासरेवर माहिती देत आहोत या ठिपक्यांविषयी.
वर्तमानपत्रातील 4 ठिपक्यांचे महत्व-
प्रत्येक वर्तमानपत्रात खाली 4 ठिपके एका ओळीमध्ये असतात. तुम्हाला वाटलेही असेल की तर ठिपके ट्राफिक सिग्नल सारखे असतील, पण असे नाही. पण याचा काय अर्थ आहे हे खूप कमी लोकांना माहिती असेल. या चार रंगाचे वर्तमानपत्रात खूप महत्व आहे. तुम्हाला माहिती असेलच ली मुख्य रंग तीनच आहे. ज्यामध्ये लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचा समावेश आहे. या ठिपक्यामध्ये सुद्धा या 3 रंगाचा समावेश आहे आणि त्यात अजून एक काळा रंग ऍड झालेला आहे. या ठिपक्यामध्ये रंगाचा क्रम सर्वात अगोदर निळा, गुलाबी, पिवळा आणि शेवटी काळा रंग येतो.
वर्तमानपत्रातील हे चार ठिपके रेजिस्ट्रेशन मार्क्स असतात, जे की वर्तमानपत्रांची छपाई व्यवस्थित झालीये का नाही हे तपासण्यासाठी उपयोगी पडतात. हे ठिपके एका लाईनमध्ये असतात त्यामुळे वर्तमानपत्रात छापल्या जाणाऱ्या बातम्या आणि इमेज वेगवेगळया रंगात अचूकपणे छापल्या का नाही हे सुद्धा कळते. या रंगामध्ये थोडीही गडबड झाली तर समजून जायचं की वर्तमानपत्राच्या छपाई मध्ये सुद्धा गडबड झालेली आहे. या ठिपक्याचे एक स्थान अगोदरच ठरलेले असते. त्या स्थानावर जर हे ठिपके छापले नाही गेले तर छपाई मध्ये चूक झालेली समजते.
प्लसचे चिन्ह सुद्धा कधी कधी वापरले जाते-
या ठिपक्यासोबत तुम्हाला बरेच वेळा प्लस(+) चे चिन्ह सुध्दा बघितले असेल. या चिन्हालाही या ठिपक्यासारखे महत्व आहे. या चिन्हामुळे वर्तमानपत्रातील माहिती व्यवस्थित ठरलेल्या रेषेत छापली गेली आहे का नाही कळते. या चिन्हामुळे वर्तमानपत्राचे कॉर्नर सुद्धा कळतात.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: ट्राफिक पोलीसांनी अडविल्यास हे नियम तुम्हाला नक्की कामी पडतील