जेव्हा त्याने समाजाकरीता काम करण्यास सुरवात केली तेव्हा त्याला धड मिसरुडसुध्दा आली नव्हती. आत्ताही त्याचे वय अगदी कमि आहे परंतु त्याचे राजकीय व सामाजिक वजन पाहता तो चांगल्या चांगल्यांना पाणि पाजत आहे. विरोधक त्याला कसे थांबवावे याचा विचार करुन सध्या परेशान आहेत. हार्दिक पटेल एक सामान्य २३ वर्षिय युवक परंतु ह्या युवकाने गुजरातच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलवुन टाकला आहे. पटेल समाजास इतर मागास वर्गिय आरक्षण द्यावे ही मागणी करुन तो प्रकाश झोतात आला आणि त्या दिवसापासुन त्याची लोकप्रियता वाढतच आहे. आज आपण खासरेवर हार्दिक पटेल विषयी माहिती नसलेल्या गोष्टी बघुया.
हार्दिक भारत व उषा पटेल यांचा मुलगा जन्म २० जुलै १९९३, हार्दिकचे कुटूंब २००४ साली विराग्राम गुजरात येथे मुलांच्या शिक्षणाकरीता आले. इथेच हार्दिकने प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. हार्दिक अभ्यीसात सर्वसाधारण होता परंतु लहानपणापासुन त्याला क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. पुढे B.Com. चे शिक्षण हार्दिकने पुर्ण केले २०१० साली काॅलेज व वडिलाच्या सबमर्सिबल मोटर दुरस्ती व विक्रीचा धंदा तो संभाळु लागला. हार्दिकला पदवी परीक्षेत ५०% पेक्षाही कमि गुण आहे.
हार्दिकला बंदुक व हत्यार जमा करायचा सुध्दा छंद आहे. वयाच्या १७ व्या वर्षापासुन हार्दिक पाटीदार अनामत संघटनेकरीता काम करतो. हार्दिक पटेल स्वत:ला अराजकीय म्हनतो परंतु त्याचे वडील भारतीय जनता पार्टिचे सक्रीय सदस्य होते. आनंदीबेन पटेलला तो मुद्दाम काकी म्हणतो त्याचे कारण संग्तानी हार्दिक सांगतो कि त्यांच्या पुतण्याच्या समस्या समजाव्यात याकरिता मी त्यांना काकी म्हणतो.
हार्दिक करिता प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभ भाई पटेल आहे. त्याच्या ऑफिसमध्ये शिवरायांचा अर्धाकृती पुतळा नेहमी त्याच्या टेबल वर दिसेल. त्याच्या लेटरपॅडवर सुध्दा जय छत्रपती शिवाजी महाराज, जय सरदार हि अक्षरे आहेत. जुलै २०१५ मध्ये झालेल्या शक्तीप्रदर्शनात तब्बल ४.५ लाख पटेल समाज हार्दिकच्या आंदोलनात सामील झाला होता. विराग्रम, गांधीनगर, वडोदरा, राजकोट इत्यादी ठिकाणी या नंतर त्याने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले होते. सध्या त्याची तथाकथित सेक्स विडीओ सीडीमुळे हार्दिक विषयी परत वाद निर्माण झाला आहे. लवकरच हार्दिक राजकारणात काय भूमिका निभवणार हे सर्वाना कळेलच…
माहिती आवडल्यास शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..