थ्री इडियट हा सिनेमा फार नावाजला त्यामधील एक संवाद आहे बेटा काबील बनो कामयाबी तो साली झक मारके तुम्हारे पीछे आयेगी. हे अगदी खरे ठरवले आहे कोल्हापूरच्या रांगड्या मातातील हरहुन्नरी कलाकार प्रशांत चव्हाण याने शून्यातून सुरवात करून घरचा कुठलाही पाठींबा नसताना प्रशांत चव्हाणने केलेली अफाट मेहनत आज त्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन बसवले आहे. आज हाच प्रवास आपण आपण खासरे वर बघणार आहोत.
भारतात कलाकारांची कमी नाही कोल्हापूरला कलानगरी हि सुध्दा ओळख आहे परंतु मुलांना मिळत नाही ते योग्य व्यासपीठ आणि समाज अथवा कुटुंबात असणारे अज्ञान परंतु या सर्वावर मात करत प्रशांतने स्वतःचा मार्ग निवडला होता. लहानपणापासून प्रशांतला चित्रकलेची आवड होती. १० वी १२ वी झाली समोर मोठा पेच प्रसंग होता करावे काय ? प्रशांत चे वडील मोटर मैकीनिकल एका सामान्य कुटुंबातील तो, घरची परिस्थिती बेताची वडिलांची इच्छा होती कि त्याने अकान्टंटचा कोर्स कराव आणि कुठली तरी छोटी मोठी नौकरी करून घरच्यांना आधार द्यावा.
नेमकच २००६ साली अनिमेशन,थ्रीडी,माया इत्यादी कोर्सेस सुरु झाले होते परंतु त्या कोर्सची फी न परवडणारी होती. जी डी आर्ट डिप्लोमा असतो हे सुध्दा माहिती नव्हते. तेव्हा त्याने डीटीपीसहित अनेक प्रशिक्षण असणाऱ्या कोर्सला प्रवेश मिळवला आणि १ वर्षाचा कम्प्युटर कोर्स पूर्ण केला. २००७ मध्ये tally झाल्यामुळे त्याने अकान्टंटची नौकरी एका स्पेअर पार्टच्या दुकानात मिळवली. परंतु त्याचे मन इथे रमत नव्हते. नजरे समोर फिरायच्या रेषा,रंग याच जगात तो असायचा.
अचानक एक दिवस त्याला कळले कि एका दुकानात ग्राफिक्स डिझायनरची जागा आहे. महिना १५०० रुपये मिळणार मग काय पठ्याने ताडकन हि नौकरी सोडली आणि लागला कामाला. या नौकरीत पगार कमी मिळत होता परंतु आनंद कोटीत मिळत होता कारण त्याचे ध्येय होते हे या कामातच त्याला समाधान आणि ख़ुशी मिळत होते. प्रशांतचे काम हि त्याच तोडीचे होते त्यामुळे नवीन नवीन ठिकाणी नौकरीची ऑफर त्याला मिळू लागली. २०११ साली तो फेसबुकवर आला. इथे त्याचा अजून एक प्रवास सुरु झाला. फेसबुकवर वेगवेगळे फोटो मुले अपलोड करत तिथे त्याने क्रिएटीव फोटो अपलोड करण्यास सुरवात केली आणि आपोआपच त्याचे काम सर्व लोकापर्यंत पोहचू लागले.
२०१२ साली त्याने डिजिटल कॅलिग्राफी कोर्स केला आज महाराष्ट्रात अनेक नामवंत कॅलिग्राफर मध्ये प्रशांतचे नाव आदराने घेतल्या जाते. फेसबुक पुरते मर्यादित न राहता प्रशांतने Divine Art या कलाकाराची पांढरी असलेल्या वेबसाईटवर त्याचे काम अपलोड करणे सुरु केले यातून त्याचे नावतर झाले सोबत त्याची ओळखीही झाली दुसऱ्या राज्यातून त्याला काम मिळू लागले. आंध्र प्रदेश,राजस्थान,पश्चिम बंगाल,गुजरात इत्यादी राज्यातून त्याला अनेक क्लायंट काम देतात आणि भेटून सुध्दा गेले आहे. फार कमी वयात प्रशांतने आपल्या कामाच्या जोरावर आणि आवडत्या छंदातून स्वतःचा बिझनेस उभा करण्याचा पाया पक्का केला आहे. आज तो ढोल ताशा पथक, बिझनेस लोगो इत्यादी करिता डिझाईन करतो.
प्रशांतने अनेक नामांकित कंपन्या करिता या अगोदर काम केले आहे. स्वच्छ भारत लोगो तो ज्या कंपनीत काम करत होता त्याच कंपनीने बनविला आहे यामध्ये अनेक प्रसिद्ध कामात प्रशांतचे हि योगदान आहे. यापुढे काहीतरी स्वतःच्या नावाने करायचे याकरिता त्याने आता पाउले उचलली आहे. आणि त्याची सर्वात मोठी झेप म्हणजे प्रशांतने या वर्षी कोल्हापूरमध्ये स्वतःचा डिझाईन स्टुडीओ सुरु केला आहे. खासरे सोबत बोलताना तो सांगतो कामाच्या शोधात कुठल्यातरी मोठ्या शहरात न जाता स्वतःच्या कुटुंबाला वेळ देऊन शहराएवढे इन्कम तो मिळवतो. यातच त्याला समाधान आहे. तो सांगतो कि त्याला भविष्यात या क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्वतःचा मोठा डिझाईन स्टुडीओ बनवायचा आहे आणि तो बनवणारच यात कुठलीही शंका नाही कारण एकच खुदको कबिल करो सक्सेस झक मारके पीछे आयेगी…
प्रशांतला आमच्या खासरे परिवाराकडून भरपूर शूभेच्छा.. तुम्हाला हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.
मराठी फेसबुकचे काही चेहरे, छंदाला बनविला व्यवसाय घरबसल्या कमवतात लाखो…