जगातील सर्व खेळांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे. भारतात तट प्रत्येक मुलाच्या हातात बत असते आणि ह्रदयात सचिन तेंडुलकर. आज आपण बोलत आहोत भारतीय क्रिकेटपटू विषयी ज्यांना प्रत्येक मैदानात आपली विजयी पताका फडकवण्याची अक्षरशः सवयच लागली आहे. भारतीय क्रिकेटपटूंची लोकप्रियता प्रचंड आहे. पण मैदान गाजवणारे काही भारतीय खेळाडू जेलची हवा पण खाऊन आले आहेत. त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का?
खेळपट्टीवर या काही खेळाडूंचे तुम्ही खूप वेगवेगळे रेकॉर्ड ऐकले असतील. पण या चार खेळाडूंवर जेलमध्ये जाण्याचा सुद्धा रेकॉर्ड आहे. आपल्या देशात भलेही क्रिकेटला धर्म आणि खेळाडूंना देव मानले जात असले तरी, भारतात सर्वोच्च आहे देशाचा कायदा आणि संविधान, जो की प्रत्येक नागरिकांसाठी समान अधिकार देतो. आणि कायद्यात प्रत्येक गुन्हेगाराला सारख्याच नजरेने पाहिले जाते. मग तो एखादा क्रिकेटपटू असो वा एखादा अभिनेता किंवा एखादा राजकिय नेता.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारतात क्रिकेटपटू होणे म्हणजे एखादा सुपरस्टार झाल्यापेक्षा कमी नाहीये. परंतु हे खेळाडू सुद्धा एक माणूसच आहेत आणि माणसाकडून चूक होतेच. असेच काही या 4 खेळाडूंच्या बाबतीतही झाले आहे, ज्यामुळे त्यांना चक्क जेलची हवा खावी लागली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या 4 क्रिकेटपटू विषयी ज्यांना जेलची हवा खावी लागली आहे.
भारतीय टीम च्या या खेळाडूंच्या नावावर आहेत पोलीस केस-
1. नवज्योत सिंग सिद्धू-
पूर्व क्रिकेटपटू व राजकिय नेते नवज्योत सिंग सिद्धू हे जेलमध्ये जाऊन आले आहेत. ही बाब 1988 ची आहे जेव्हा सिद्धू आपल्या मित्रांसोबत होते व त्यांचा एका जेष्ट माणसासोबत वाद झाला. ज्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे सिद्धू यांना 3 वर्षे सजा झाली. परंतु काही दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांनी न्यायालयात अपील केले जे कोर्टाने स्वीकारले व त्यांची सुटका झाली.
2. विनोद कांबळी-
क्रिकेटपटू विनोद कांबळी हे सुद्धा जेलमध्ये जाऊन आले आहेत. 2015 मध्ये त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेसोबत हाणामारी झाली. त्यामध्ये विनोद कांबळी व त्यांच्या पत्नीला अटक झाली होती.
3. अमित मिश्रा-
भारताचा फिरकीपटू गोलंदाज अमित मिश्रा सुद्धा जेलची हवा खाऊन आला आहे. बोलले जाते की त्याने आपल्या एका मित्राच्या अंगावर केटली फेकली होती. ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. नंतर बेलवर अमित मिश्राची सुटका झाली होती.
4. एस श्रीशांत-
भारताचा पूर्व जलदगती गोलंदाज एस श्रीशांत बराच वेळ जेलमध्ये राहून आला आहे. श्रीशांत ला दिल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग च्या आरोपाखाली अटक केली होती. या प्रकरणामूळे श्रीशांतवर क्रिकेट खेळण्याससुद्धा आजन्म बंदी घालण्यात आली आहे.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
क्रिकेटमधील काही ऐतिहासिक फोटो व क्षण,प्रत्येक क्रिकेट चाहत्याने बघायलाच हवे