इतिहासामध्ये अशा अनेक खुनी आणि पापी राजांच्या नोंदी आहेत, जे म्हणायला तर राजा-महाराजा होते पण त्याने काम चोर आणि लुटारु पेक्षा कमी नव्हते. चोर आणि लुटारु या राजांसमोर कमी असायचे बोललं तरी वावगं ठरणार नाही. यामधील एक नाव म्हणजे तैमुरलंग चं, जो चौदाव्या शतकातील एक शासनकर्ता होता. तैमुरलंग ने तैमुरी राजवंशव्ही स्थापना केली होती. त्याचे राज्य पश्चिमी आशिया ते मध्ये आशिया मध्ये पसरलेले होते.
तैमुरलंग चा जन्म एप्रिल 1336 मध्ये ट्रांसोजियानात झाला होता. ट्रांसोजियाना आता उजकेबिस्थान नावाने ओळखले जाते. तैमुर ला त्या काळातील सर्वात शक्तीशाली मुस्लिम शासनकर्ता मानले जायचे. तैमुर स्वतःला ‘स्वार्ड ऑफ मुस्लिम’ मानायचा. तो एक मंगोल शासनकर्ता होता. तैमुर मंगोल विजेता चंगेज खां सारखा पूर्ण जग जिंकायचं स्वप्न बघायचा. जसे चंगेल खान ने मंगोलिया मधून निघून अर्ध्या युरेशिया वाफ कब्जा केला होता.
तैमुर सुध्दा चंगेल खान सारखं स्वतःची बादशाही आणायचा प्रयत्न करत होता. तो सिकंदर सारखे पूर्ण जग जिंकायचे स्वप्न बघत असे. तैमुर ने मंगोल क्षेत्रातील लोकांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास मजबूर केले होते. आपल्या मिलिटरी कॅम्पेन च्या नावाने तैमुरने जवळपास १७ लाख लोकांची हत्या केली होती. हा आकडा आज दुनियेच्या लोकसंख्येच्या जवळपास ५% आहे.
विशेष बाब म्हणजे तैमुरलंग हा लंगडा होता तरी त्याची क्रूरता किंचितही कमी नव्हती. तैमुरलंगचे साम्राज्य पश्चिमी आशिया पासून मध्ये आशिया करत भारतात पसरलेले होते. तैमुर ने आपल्या सैन्याला आदेशच दिलेला होता की, जो पण त्याला भेटेल त्याला थेट मारून टाका. तैमुर च्या सैन्याने पुरूषांना मारलं तर स्त्री आणि मुलांना बंदी बनवले होते. १३६८ साली समरकंदचा मंगोल शासक मेल्यानंतर तैमुरने त्याची गादिवर पण कब्जा जमवला.
तैमुरने त्याची भीती जगभरात पोहचण्यासाठी अभिनयानच सुरू केले होते. बोलले जाते की चंगेज खान सारखेच आपलं सैन्य तयार करून तैमुरने आतंकवाद पसरवण्यास सुरुवात केली. १३८० आणि १३८७ च्या मध्ये तैमुर ने खुरासन, सिस्तान, अफगाणिस्तान, फारस, आजरबैजान आणि कु्र्दीस्तान सारख्या देशांवर आक्रमण करून आपले गुलाम बनवले होते. १३९३ मध्ये त्याने बगदाद पासून मेसोपोटेमिया वर आपलं राज्य तयार केलं.
१३९८ च्या सुरुवातीला पीर मोहम्मद या आपल्या नातवासोबत मिळून तैमुरने भारतावर हल्ल्याची तयारी केली होती. त्यासाठी त्याने मुलतान मध्ये आपले बिस्तान मांडले होते आणि ६ महिन्यात मुलतानवर सुद्धा कब्जा केला. एप्रिल १३९८ मध्ये तो भारताकडे भारताकडे मार्गस्थ झाला आणि सिंधू, झेलम आणि रावी नदी पार करून भारतात आला.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: या हिंदू राजाचे नाव ऐकूनच थर थर कापायचे मुघल, मुघलांसाठी दहशतीचे दुसरे नाव म्हणजे बाप्पा रावल…