गुजरात राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम 25 ऑक्टोबर तारखेला भले घोषित झाला असेल पण,प्रचाराचा धुरळा आधीच उडाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 1 महिन्यात 5 वेळा गुजरातचा दौरा करून विविध विकास कामाच्या उद्घटनाचा सपाटा लावला, हिमाचल प्रदेशची निवडणूक ज्या दिवशी घोषित झाली त्यादिवशिच गुजरात राज्याची निवडणूक घोषित होणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही मग केंद्रीय निवडणुकी आयोगावार पक्षपाती पणाचे आरोप ही झाले,पण शेवटी काय तो निवडणुकीचा मुहूर्त मिळाला.
182 विधान सभेच्या जागा साठी आता 2 टपय्यात 9 आणि 14 दिसम्बर ला मतदान होणार आहे आणि मत मोजणी 18 डिसेम्बर रोजी होणार आहे,ही निवडणूक बीजेपी साठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे कारण सध्या बीजेपी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हेच लोकांना माहित आहे या दोन्ही नेत्यांचे गृह राज्य असलेल्या राज्यात होवू घातलेल्या निवडणुका बीजेपी पूर्ण ताकदिने उतरणार हे सांगायला कुणा ज्योतिशाची गरज नाही.
Source Indian Express
2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या मोठया विजया नंतर दिल्ली आणि बिहारचा अपवाद वगळता हरियाणा,महाराष्ट्र,आसाम,झारखंड,उत्तरप्रदेश,गोआ, तिकडे पूर्वे कडील अरुणाचल प्रदेश असो प्रत्येक ठिकाणी बीजेपी ने आपले सरकार बनवले काही ठिकाणी बहुमत नसताना ही ताक़दीच्या बळावर कमळ फुलवले, आज देशात 16 राज्यात भाजपा चे सरकार आहे त्यातील महाराष्ट्र,जम्मू काश्मीर, गोवा सारख्या राज्यात मित्र पक्षाला मजबूरी म्हणून का होईना भाजप ने सत्तेत समाविष्ट करून घेतले इतकेच काय बिहार मधे झालेला पराभव विसरून पारदर्शकता या मुद्द्यावर नीतीश कुमार यानां जादू की झप्पी देत भाजप ने सत्ता स्थापित केली.
मोदी आणि शाह या जोड गोळीला निवडणूक म्हणजे फ़क्त विजय एवढेच माहित आहे पण सध्या गुजरात मधील बदलती राजकीय समीकरणे पाहता ही लढाई भारतीय जनता पक्षा साठी वाटते तितकी सोप्पी रहिलेली नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा
सप्टेंबर पासुन आतापर्यंत 5 वेेळा झालेला गुजरात दौरा आणि विकास कामाना लावलेली हजेरी सांगून जाते की भाजप आपल्या विजया बद्दल आश्वासक नाही हे ही तितकेच खरे की जर भाजप ने नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कालखंडात आणि आताच्या 3 वर्ष म्हणजे एकूण 15 वर्षाच्या कालखंडात गुजरात विकासचे जे मॉडल उभे केले ते पाहत भाजप सहज गुजरात जिंकु शकतो पण खरे चित्र हे नाही गुजरात मधे जो काही विकास झाला तो शहरी भागानचा ग्रामीण गुजरात हा अविकसित राहिला.
22 वर्ष भाजप ने गुजरात मधे सत्ता राबवली मागील विधानसभेच्या निवडणुकीत 182 पैकी 115 जागा भाजप ने जिंकल्या तेव्हा नरेंद्र मोदी उमेदवार होते आता मोदी स्टार प्रचारक ची भूमिका वठवणार सोबत अमित शाह ही असणार पण ही निवडणूक मागील निवडणुकी एवढी सोप्पी राहिलेली नाही याचा अंदाज भाजपला आला असणार.
गुजरात सध्या आरोप प्रत्यारोपानी ढवळून निघाला आहे गुजरात मधील 3 युवकानी भाजपला धूळ चारण्याचा निश्चय केला आहे. त्यामधे पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल,दलित समाजाचा नेता जिग्नेश मेवाणी आणि ओबीसी,दलित,आदिवासी एकता मंचाचे संयोजक अल्पेश ठाकोर सामिल आहेत अल्पेश ठाकोर ने कांग्रेस मधे प्रवेश करत निवडणूक लढनार आहे हे तीघे गुजरात राज्य पिंजुन काढत आहेत व ओबीसी, दलित,आदिवासी यांची स्थिति भाजप काळात किती खलावली आहे यांची उदाहरणे देत हिंडत आहेत,मुख्यमंत्री विजय रुपाणी या तिघाना कांग्रेस एजेंट म्हणत आहेत, हार्दिक पटेल याचे कांग्रेस नेत्यांना भेटण्याचे सीसीटीवी फुटेज वृत्तवाहिनीना भाजप पुरवत आहे,भाजपला वाटत आहे की या तीन युवकांना बदनाम केले तर आपले अर्धे काम झाले,आज गुजरात मधे 32% ओबीसी समाज आहे 12% पाटीदार,7% दलित तर 9% मुस्लिम समाज आहे हा समाज गुजरातचे राजकरण बदलू शकतो.
पटेल समाजाच्या नेत्यांना फोडण्यासाठी कशी आमिषे दाखवली जात आहेत हे भाजप मधे गेलेले जाऊन परत आलेले पाटीदार समाजाचे नेते सांगत आहेत,त्यात हार्दिक पटेल ने आरोप केला पटेल समाजाच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी 500 कोटी रुपयाचे बजट तैयार केले आहे,त्यामुळे गांधी आणि सरदार पटेल यांचा गुजरात कोणत्या दिशेने जात आहे हे समजने अवघड झाले आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी राहिलेली कसर ज्याला शहजादा म्हणून भाजप ने हिणवले तो राहुल गांधी पूर्ण करत आहे,”विकास गांडो थए गयो” म्हणजे विकास वेडा झाला आहे या हैशटैग आणि वाक्या ने भाजपची गोची झाली आहे आता त्यामधे” GST गब्बर सिंह टैक्स ने ही ” सोशल मीडिया वर धूमाकुळ घातला आहे,गाँधीनर येथे झालेल्या राहुल च्या सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद कांग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवू शकतो पण हे ही एवढेच खरे आहे की मृतप्राण झालेल्या कांग्रेसला पाटीदार आणि इतर समाजाची संजीवनी मिळत आहे.
गुजरात मधे भाजप बहुमाताचा 93 जागंचा आकडा गाठेल ही पण हा विजय असून ही भाजप पराभूत झालेली असेल,कांग्रेस ला 80 हुन अधिक जागा मिळाल्या तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कांग्रेस पुनरागमन करेल एवढे नक्कीच
आज तुम्ही कोणत्या ही गुजराती माणसाला विचारा गुजरात मधे कोण जिंकणार तो लगेच उत्त्तर देईल मोदी तुम्ही का विचारले तर तो बोलेल जेव्हा गुजराती अस्मिता एक गुजराती सर्व जगात गाजतो आहे, तेव्हा एक गोष्ट मुद्दामुन सांगावी वाटते की बलिया मतरदार संघातुन विजयी होवून चंद्रशेखर पीएम झाले तेव्हा तेथील जनता आणि चंद्रशेखर यांच्या जाती मधील लोक म्हणायचे, काही ही म्हणा काही काम नाही केले,पण बलिया मधुन कोणी पीएम झाले का,बलियाचा मान पूर्ण देशात वाढवला आहे म्हणूनच फक्त चंद्रशेखर” कदाचित लोक माझ्या मताशी सहमत नसतील.
विनोद जगदाळे
लेखक,न्यूज़ 24 या वृत्तवाहिनीत,ब्यूरो चीफ महाराष्ट्र पदावर कार्यरत आहेत
प्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंची किंमत तुम्हाला माहीत आहे का ?