पुणे जिल्ह्यातील कारला हे गाव प्रसिद्ध आहे आई एकविरा देवी करिता परंतु आता या शहराला आणखी एक ओळख मिळाली आहे. हि ओळख आहे पप्या गायकवाडची कोण आहे तो काय करतो तो हा प्रवास बघूया आज खासरेवर
पप्पु गायकवाड वय २३ वर्ष शिक्षण: BCA या नावाने त्याला कोणीच ओळखणार नाही. फेसबुकवर एक वेगळ जग आहे बऱ्याच लोकांना याबाबत माहिती नाही. या जगाचा सर्व खेळ चालतो फोटो आणि लाईकवर तुम्ही नेहमी बघत असाल कि स्टेस्टस येतात भावांनो फोटो सोडलाय धूर करा, राडा करा, कमेंट ब्लॉक करा या जगाचा बादशाह पप्या गायकवाड हा आहे. तब्बल ९ लाख लोक पप्याला फेसबुकवर फॉलो करतात. एका सामान्य कुटुंबातील व खेड्यातील मुलगा एवढा प्रसिद्ध कसा झाला ? हा प्रश्न सहाजिकच तुम्हाला पडणारा आहे.
या प्रवासाची सुरवात ५ वर्षा अगोदर झाली. मॉडेलिंग फोटो हा प्रकार महाराष्ट्रात चालत नव्हता. तो चालायचा केरळमध्ये या क्षेत्राला वेगळ्या उंचीवर आज पप्या व त्याच्या मित्रांनी नेऊन ठेवले आहे. सुरवातीच्या काळात पप्याकडे DSLR कॅमेरा किंवा एडिटिंग करिता लॅपटॉप वगैरे असे काही साहित्य नव्हते परंतु शिकण्याची इच्छा मनात होती. स्वतः गुगलची मदत घेत काही स्वतःच्या पद्धती वापरत त्याने फोटो एडिटिंग सुरु केले आणि मोबाईलमध्ये फोटोग्राफी चालत असे. या सर्वाचा रिझल्ट आज आपण बघतच आहो.
आज पप्याने फोटो फेसबुकवर अपलोड केला कि ५९ मिनटात ५० हजार पर्यंत लाईक येतात. सध्याच्या त्याच्या फोटोला तब्बल ४.५लाख लाईक आहे. एखाद्या हिंदी चित्रपटातील सेलिब्रिटीपेक्षाही पपप्याच्या फोटोला जास्त लाईक असतात. पप्या फक्त फेसबुकवरच राडा करतो अस काही नाही तर मागे तो सोलापुरला गेला त्याला बघायला आलेले त्याचे चाहते व उडालेली झुंबड बघून तुम्ही हैराण होसाल. पप्या गायकवाडला फेसबुकवर मित्र यादीत कशे अॅड करावे ? या विडीओला फेसबुकवर लाखो लोकांनी बघितले आहे यावरून तुम्ही पप्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता.
पहिले फेसबुकवर स्पर्धा चालत असे कि कोणाच्या फोटोला जास्त लाईक मिळेल यामध्ये ठराविक वेळेत लाखो लाईक येत होत्या परंतु या स्पर्धामुळे भांडणाचे प्रकार होत होते. त्यामुळे पप्यासांगतो आता हा प्रकार बंद केला आहे. आयडी रेफ्रेश ज्या वेळेस होतो त्या वेळेस लाख लाईक तासात येतात असा तो सांगतो. आयडी रिफेश म्हणजे काय ? तर तो सांगतो कि सर्व मित्रांना फेसबुक मित्र यादीत घेता नाही त्यामुळे जुन्या मित्रांना अनफ्रेंड करून नवीन मित्र अॅड करणे याला म्हणतात आयडी रिफ्रेश तो दर चार महिन्याला हे काम करतो. आणि लोक त्याच्या यादीत येण्याकरिता वाट बघत असतात काही तासातच पप्याची फ्रेंडलिस्ट फुल होते.
या सर्व प्रवासात त्याच्या सोबत त्याचा मित्र रवी नाईक हा होता तो सुध्दा फेसबुकस्टार आहे. सुरवातीच्या काळात मित्राकडून कॅमेरा उधार घेऊन तो शिकत गेला. आज यांना बिहार, उत्तरप्रदेश, कर्नाटक, केरळ,सुरत, झारखंड, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातून मित्र त्यांना भेटायला येतात. आज तो प्रोफेशनल फोटोग्राफी व एडिटिंग करतोहजारो मुले त्याच्याकडे फोटो काढायला येतात हा त्याचा व्यवसाय बनला आहे. पप्याच्या कुटुंबात तो त्याची आई, पत्नी व दीड वर्षाचा मुलगा लहान मुलगा श्रेयस एवढे कुटुंब आहे.
पप्या सांगतो कि या छंदातून त्याला व्यवसाय तर मिळालाच परंतु एक ओळख निर्माण झाली. आज त्याचे असंख्य चाहते संपूर्ण देशात आहे आणि स्टाईल काय आहे कस वागय्च्ज हे शिकलो ते फेसबुकमधून असा पप्या सांगतो.
असा आहे हा मराठी फेसबुक स्टार पप्या गायकवाड आणि त्याचे धूर करणारे, राडा करणारे मित्र मंडळ हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
मराठी फेसबुकचे काही चेहरे, छंदाला बनविला व्यवसाय घरबसल्या कमवतात लाखो…
https://www.facebook.com/samakadkar
Req tak Pappya bhau
only pappya gaikwad ????
नुसता धुररररर ??????
PAPPYA BHAU ???
Bhau ajun Kahi Mahiti Sangh na
Kahi pan million followers tar celebrity che ahe