8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. या नोटबंदीला काल म्हणजे 8 नोव्हेंबर 2017 रोजी एक वर्षे पूर्ण झाले आहे. अचानक झालेल्या नोटबंदीमुळे अनेकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. या एक वर्षाच्या काळामध्ये नोटबंदीवरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. नोटबंदीमूळे एक वर्षात के फायदे झालेत हे सरकार सांगत आहे. नोटबंदीवरून विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले होते. अचानक झालेली नोटबंदी आणि यानंतर देशातील ATM मध्ये झालेला खळखळाट लोकांच्या संतापात भर घालणारा होता. नोटबंदीचा निर्णय देशाच्या हिताचा असल्याचं सरकार सांगत आहे तर नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झाल्याचं विरोधक म्हणत आहेत.
नोटबंदीची घोषणा अचानक झाल्याने अनेकांची धावपळ उडाली. पैसे काढण्यासाठी ATM च्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या. पेट्रोलपंप जुन्या नोटा स्वीकारत असल्याने गाड्यामध्ये पेट्रोल भरून घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. नोटबंदीमूळे अनेक फायदे तोटे देशाला झाले आहेत. अनेकांना नोटबंदीमुळे आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे.
काळा पैसा बाहेर येईल, कॅशलेसचे प्रमाण वाढेल अशा अनेक उद्देशाने केलेल्या नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला काही काळ धक्का बसला होता. आता वर्षपूर्तीनंतर हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
त्यातच नोटबंदी नेमकी खरीप हंगामाच्या वेळेस झाल्याने शेतकऱ्यांना तर प्रंचड हाल सोसावे लागले होते. शेतमाल खरेदी विक्रीवर याचा परिणाम झाला. आजही शेतकरी पूर्णतः त्यातुन सावरला नाहीये.
नोटबंदीच्या एक वर्षांनंतर सरकारने एक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत तुम्हीही सहभागी होऊ शकता. या स्पर्धेतील विजेत्याला सरकारकडून 2 लाख रुपयांचं बक्षीस दिले जाणार आहे. एवढंच नाही तर दुसरा क्रमांक पटकावणारऱ्या विजेत्यास 50 हजार रुपयांचं बक्षीस दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाची कुठलीही आत नाहीये. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करायचा आहे.
जाणून घेऊया या स्पधेविषयी संक्षिप्त मध्ये-
कसा कराल अर्ज-
तुम्हाला या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी http://mygov.in या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. या वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर उजव्या बाजूला ऑप्शन टास्क वर क्लिक करा. त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला स्पर्धेविषयी पूर्ण माहिती दिसेल. तिथे लिंकवर क्लिक करून तुम्ही स्पर्धेत भाग घेऊ शकता.
स्पर्धेच्या कॅटेगरी-
या स्पर्धेच्या एकूण चार कॅटेगरी आहेत. कॅटेगरीनुसार वेगवेगळे नियम ठरवण्यात आले आहेत. वेबसाईटवर लॉगीन केल्यानंतर तिथे कॅटेगरीनुसार नियम व अटी दिलेल्या आहेत.
निबंध स्पर्धा-
स्पर्धेमध्ये पहिली कॅटेगरी म्हणजे निबंध लेखन स्पर्धा. यामध्ये तुम्हाला 1200 शब्दामध्ये नोटबंदीवर लिहायचं आहे. यामध्ये नोटबंदीचे फायदे आणि आठवणी सांगायच्या आहेत. त्यासोबत मोदी सरकारच्या फाईट अंगेंस्ट करप्शन आणि ब्लॅकमनी याबद्दलही लिहायचं आहे. तुम्ही लिहीलेल्या निबंधाला फॉन्ट 12 मध्ये पीडीएफ फॉरमॅट मध्ये सेव करून http://mygov.in वेबसाईटवर अपलोड करायचा आहे.
कार्टून आणि पोस्टर-
दुसऱ्या कॅटेगरीमध्य आर्टवर्क चा समावेश करण्यात आला आहे. काळा पैसे आणि भ्रष्टाचार यावर एखादं क्रिएटिव्ह आर्टवर्क, व्यंग्यचित्र, कार्टून पोस्टर तूम्हाला बनवायचं आहे व वेबसाईटवर अपलोड करायचं आहे.
व्हिडीओ-
जर तुम्ही व्हिडीओ बनवण्यात एक्स्पर्ट असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार विरोधातील सरकारचे काम यावर एक 4 मिनिटांचा व्हिडीओ तुम्हाला बनवायचा आहे.
कविता लेखन-
कवींसाठी सुद्धा ही एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही कवी आहात किंवा तुम्हाला कविता लिहायची आवड आहे तर तुम्ही काळा पैसा आणि त्याविरुद्ध सरकारची लढाई यावर एक छान कविता करून पाठवू शकता. सर्व माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: नोटबंदी तिला कळाली नाही, पैसा असूनही गेला जीव…