ताजमहाल मध्ये असे अनेक रहस्य आहेत ज्याचा शोध कोणीच लावू शकलेले नाहीये, असाच एक बंद दरवाजा आहे ज्याला उघडायला सरकार सुद्धा घाबरते.
ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुना नदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. मुघल बादशाह शाहजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे सुंदर शुभ्र संगमरवरात स्मारक उभारले. ताज महालाचे बांधकाम इ.स. 1653 मध्ये पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 20,000 कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले. ताज महाल ही वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे.
युनेस्कोने ताज महाल या वास्तूला इ.स. 1983 मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. प्रतिवर्षी सुमारे तीस लक्ष (30,00,000) पर्यटक ताज महालाला भेट देतात. ताजमहालची वास्तूशैली फारसी, तुर्क, भारतीय आणि इस्लामी वास्तुशैलीचे अनोखे मिलन आहे.
भारताला एक रहस्यमय देश मानले जाते, करण भारतामध्ये अनेक असे रहस्य दडलेले आहेत ज्याचा शोध शास्त्रज्ञांना सुद्धा लावता आलेला नाहीये. बऱ्याच जणांनी प्रयत्नही केला की हे दडलेले रहस्य बाहेर काढावेत पण कोणालाच यामध्ये यश मिळवता आलेले नाहीये. सर्वांच्या हाताला निराशाच लागली आहे. ताजमहाल च्या बाबतीत आपण बऱ्याच गोष्टी अगदी बालपणापासून ऐकत आलो आहोत. तरीही आपल्यापैकी खूप कमी जणांना या गोष्टीबाबत माहिती आहे.
मित्रानो तुम्हाला ताजमहाल च्या तहखानाविषयी एक असे रहस्य आहे जे आतापर्यंत सरकारला सुद्धा समजले नाहीये. सरकार ताजमहालच्या तहखान्याचा दरवाजा उघडायला घाबरते हे बोललं तरी वावगं ठरणार नाही. ताजमहाल बांधायला 1631 मध्ये सुरुवात झाली होती तर काम 1653 साली संपून ताजमहाल तयार झाला.
खाली दिलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नेमके काय राज आहे या दरवाज्याचे जो खोलायला सरकार सुद्धा घाबरते. कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा-
ताजमहाल ची निर्मिती हे कौशल्याचे एक प्रमाणच बनले आहे. शोधकर्त्यांनी ताजमहाल वर अनेक शोध लावले आहेत, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की ताजमहालच्या खाली हजारो खोल्या आहेत आणि त्यांचं हे पण म्हणणं आहे की वर जेव्हढा ताजमहाल आपल्याला दिसतो तेव्हढाच तो जमिनीच्या खाली सुद्धा आहे.
ताजमहालच्या निर्मितीच्या वेळी त्यातून बाहेर निघायचा आणि आत जायचा रस्ता बनवला गेला होता जो खूप दूर बाहेर निघत होता. परंतु शहाजहान च्या कार्यकाळातच हा दरवाजा बंद करण्यात आला.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: ताजमहल विषयी तुम्हाला ह्या गोष्टी नक्की माहिती नसेल..