भारतात एकतर्फी प्रेमातून होणारे अॅसिड हल्ल्याचे प्रमाण अधिक आहे. हे अॅसिड हल्ले नेहमी करिता तरुणीचे जीवन उध्वस्त करून टाकतात. विकृत मानसिकतेतून हे प्रकार घडतात. असच काही झाले प्रमोदिनी सोबत आज तिची कथा बघूया खासरेवर
प्रमोदिनी राउल वय होते फक्त १५ वर्ष नेहमी प्रमाणे ती साधारण आयुष्य जगत होती. परंतु या आयुष्यात एक दिवस असा आला कि तिचे संपूर्ण आयुष्य पालटून गेला. तिच्यावर वक्रदृष्टी पडली २५ वर्षीय अर्धसैनिक दलातील एक युवक एक दिवस तो मोटरसायकल वर आला आणि तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून पळून गेला आणि होत्याचे नव्हते झाले. कारण होते एकतर्फी प्रेम त्याने तिला लग्नाकरिता विचारले व तिने नकार दिला बस एवढ्यासाठी तो तिचे आयुष्य उध्वस्त करून गेला.
या हल्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा होरपळून निघाला आणि दोनीही डोळ्याची तिची दृष्टी गेली जीवनात संपूर्ण अंधकार पसरला. तिला लाडाने सर्व राणी म्हणत होते. या हल्यानंतर तिला बरे होण्याकरिता ५ शस्त्रक्रियेतून जावे लागले परंतु तिचा चेहरा आणि दृष्टी नेहमी करिता चालली गेली. पुढील चार वर्ष तिने ह्या नरकयातना भोगल्या. ४ वर्षापर्यंत ती तिच्या घरात ओडीसा येथे पलंगावर पडून राहायची तिची काळजी घेण्याकरिता फक्त तिची विधवा आई होती.
परंतु नशिबात वेगळ काहीतरी लिहून असते तिला नेहमी दवाखान्यात जावे लागत असे तेव्हा तिची ओळख झाली सरोज कुमार साहू सोबत आणि आयुष्यास परत दिशा मिळाली. सरोज कुमार साहू तिच्या नर्सचा मित्र या कठीण काळात तिला व तिच्या आईला आधार देणारा तोच होता.
राणी म्हणते कि सरोजला भेटल्यानंतर तिला परत जगण्याची इच्छा निर्माण झाली. दोघाची नुकतीच सोयरिक झाली आणि दोघेही सोबत दिल्ली येथे राहतात या वर्षी दोघांचे लग्न आहे. सरोजने राणीची काळजी घेण्याकरिता तिला मदत करण्याकरिता स्वतःची नौकरी सोडली आहे.
खासरे तर्फे दोघांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा..
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
Source IndiaTimes
बायकोही सोडुन गेली, नौकरी वरुनही काढण्यात आले, सगळ संपल्यात जमा झाले वाटत असतानाच बुलेटने दिली आयुष्याला कलाटणी..