मुलींना डोक्यावरचा भार समजणाऱ्या लोकांच्या थोबाडावर मारण्या करिता हि पोस्ट आहे. एकीकडे भारतात विकृत मानसिकता निर्माण झाली आहे कि मुलगी हे दुसऱ्या घरची बापाला आधार देतो तर तो फक्त मुलगाच या सर्व लोकापर्यंत अवश्य हि पोस्ट पोहचवा. जेव्हा बाप मरत होता तेव्हा कामी आली ती मुलगीच तिने स्वतःचे यकृत देऊन वाचविले वडिलाचे प्राण वाचा खासरेवर
डॉक्टर रचित भूषण श्रीवास्तव यांनी हि माहिती फेसबुकवर सर्वांसमोर आणली आहे. त्यांच्या पोस्ट मध्ये ते लिहतात कि जे लोक मुलींना भर समजतात किंवा स्त्रीभ्रूण हत्या करतात त्यांनी हे नक्की बघावे. पूजा बिजार्निया या मुलीने आपल्या वडिलांना वाचविन्याकरिता आपल्या यकृताचा एक भाग दिला आणि व्दिलाहे प्राण वाचविले आहे. तिच्या या कार्यास सलाम असे ते म्हणतात. रंचीत भूषण हे झारखंड येथील सदर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहे.
पूजा बिजार्निया हि मुंबई येथे राहते. तिच्या वडिलांना यकृताचा आजार जडला होता त्यामुळे त्यांचे यकृत खराब झाले वाचणे अशक्य होते त्यावर उपाय घरातील व्यक्तीच्या यकृताचा भाग लावणे. पूजाला आणखी दोन बहिणी आहेत. परंतु पूजाने हा साहसी निर्णय घेतला आणि वडिलाचे प्राण वाचविले. लिवर ट्रान्सप्लंट अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि तिने हि प्रक्रिया पूर्ण केली आहे.
रचित भूषण यांनी पोस्ट केलेली फेसबुक पोस्ट सध्या फेसबुकवर वायरल झाली आहे तिच्या करिता लोक #BraveDaughter हा hashtag वापरत आहे. त्यांच्या पोस्टला आत्तापर्यंत १० हजार पेक्षा जास्त शेअर आले आहे आणि प्रत्येक माणूस हा पुजाची स्तुती करत आहे. ५ नोव्हेंबरला हि पोस्ट फेसबुकवर पहिल्यादा अपलोड करण्यात आली.
पूजा व तिच्या वडिलाची प्रकृती लवकर बरी व्हावी याकरिता खासरेच्या शुभेच्छा व हि पोस्ट अवश्य शेअर करा आणि कळू द्या सर्वाना मुलगी हि भार नाही.
लोकांची धुणीभांडी करून, भाजी विकून मुलीला बनवले डॉक्टर, वाचा प्रेरणादायी कथा…