“मी शहीद” मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी…
महिनाभराची सुट्टी शनिवारी 26/11 रोजी संपली आणि मी माझ्या पोस्टिंग नागरोटा सांबा सेक्टरकडे परिवारा सहित निघालो. पुण्याच्या विमानतळापर्यंत आई ही सोबत आली होती.आम्हाला निरोप देते वेळी तीझ्या डोळ्यातील पाणी बघुन “मी लवकर माघारी येतो आई” अस मी तीला म्हणालो होतो…पण ते आता शक्य नाही !
त्या रात्री अचानक एक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. मी माझ्या पत्नीला आणि छोट्या मुलीला घरात ठेवून माझ्या साथीदारांच्या मदतीला बाहेर धावलो पण घाईघाईत मी बुलेटप्रूफ जॅकेट घालायला विसरलो. बाहेर त्या काळ्याकुट्ट अंधारात अंदाधुंद गोळीबार चालु होता आणि आणि अचानक एक गोळी येऊन थेट माझ्या काळजात घुसली अन मी या भारत मातेच्या कुशीत विलीन झालो… या शेवटच्या क्षणात मला आठवत होती माझी आई आणि माझी छोटी चिमणी,मला माझ्या चिमणीला सोडुन जायच नव्हत पण या भारत मातेसाठी मला देह त्याग करावा लागला. तस आम्हा सैनिकांच हे स्वप्नच असत या भारत मातेसाठी बलीदान देण्याच…
मी स्वर्गातून माझी अंतीम यात्रा पाहीली.सगळ्यांच्या डोळ्यात देशभक्तीच्या गर्वाचे अश्रू होते, अख्या पंढरपूराला माझ्या वरती गर्व होता. माझ्या बाबांना मी त्यांना सोडुन गेल्याच जेवढ दुःख आहे त्याहून किती तरी जास्त त्यांना माझा माझ्या बलीदानाचा अभिमान आहे.
माझ्या बलीदानाने सर्वत्र देशभक्तीची लाट पसरली आहे,माझ्या बद्दल हजारो जनांच्या मनात आदर निर्माण झाला आहे. ही खरच माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे पण… माझ्याच सारखे कित्येक सैनिक त्या सिमेवरती आजही आपला प्राण पणाला लावून आपल्या या भारत मातेची सेवा करत आहेत.
तुम्ही त्यांच्या बद्दल कधी विचार केला आहे का..? नाही ना… नसेल केला तर एक गोष्ट लक्षात घ्या माझ्यात आणि त्या सैनिकात काहीच फरक नाही. जे मी केल आहे तेच तेही करत आहेत. तुमच्या मनात माझ्या बद्दल जेवढी इज्जत आहे तेवढीच इज्जत त्यांच्या बद्दलही दाखवा. रिटायर्ड झालेल्या सैनिकांचा आदर करत चला… बस एवढच माझ ऐका !
जय हिंद
लेख- अमर सोपनर
पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…
वाचा कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय सैन्याचा शेर शहा..