आजच्या आधुनिक युगात प्रत्येक जण पैसे कमावण्याचा मागे लागला आहे. दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या काही ना काही गोष्टींमध्ये रासायनिक पदार्थांचा उपयोग माणूस आपल्या फायद्यासाठी करत आहे. याचे मुख्य कारण आहे अधिकचा लोभ पण यामुळे होणारे दुष्परिणाम सहन करावे लागणार आहेत. रासायनिक पदार्थामुळे मनुष्याच्या शरीरास वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होण्याची शक्यता असते.
सध्याच्या बदलत्या काळात आपल्याला बहुतेक वेळा बघायला मिळते की खूप कमी वयाच्या मुलामुलींना केस पांढरे होण्याच्या समस्येने ग्रासले आहे. केस पांढरे होण्याचे अनेक कारणे असू शकतात. काही कारणं नैसर्गिक तर काही वयक्तिक असू शकतात किंवा काही चुकीचा आहार घेतल्याने आणि काही व्हिटॅमिन ई च्या कमीमुळे कमी वयातच केस पांढरे होऊ शकतात. या समस्या जास्त असतील तरीही केस पांढरे होऊ शकतात. परंतु या समस्येपासून सुटका करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.
हा व्हिडिओ एकदा बघा-
पांढरे केस काळे करण्यासाठी काही घरगुती उपचार-
1. ब्लॅक कॉफी
ब्लॅक कॉफीेने बिना काही साईड इफेक्ट आपण पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवू शकतो. त्यासाठी तुम्हाला ब्लॅक कॉफी पूर्ण केसांना अर्धा तासासाठी लावून ठेवायची आहे. यानंतर शाम्पू न लावता केसांना धुवून काढायचं आहे. काही हप्त्यासाठी तुम्ही हे केलं तर तुमचे केस नैसर्गिकरित्या पांढरे होतील.
2. आवळा
पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आवळा हा फार पूर्वीपासून वापरला जात आहे. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी सर्वप्रथम आवळा पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून घ्या उकळल्यानंतर त्याचे पेस्ट बनवून ते कमीत कमी अर्धा तास केसांच्या मुळाला लावुन ठेवा. ही पद्धत तुम्ही महिन्यामधध्ये 4 वेळा तरी अवलंबली पाहिजे. यानंतर थोड्याच दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागेल आणि केस नैसर्गिकरित्या काळे आणि अजून आकर्षक दिसायला लागतील.
3. ओट्स
ओट्स चा उपयोग आपण आपण खाण्यासाठी करतो, परंतु त्यामध्ये बायोटिन तत्व असतात जे की आपल्या केसांना पांढरे ठेवण्यासाठी मदत करतात आणि एवढेच नाही तर तुमचा डँड्रफ सुद्धा कमी होऊ शकतो. ओट्स ने पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी ओट्स ला तुम्ही उकळून केसांवर लावले तर काही आठवड्यात तुम्हाला तुमचे केस काळे झालेले दिसतील.
4. चहाचे पानं
चहाच्या पानांनी पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी पाने चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये उकळून घ्या आणि त्या पाण्याने केसांना धुवा. चहाच्या पानांनी केसं काळे होण्यास वेळ लागू शकतो पण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि आपल्या एक एक केसाला काळे करण्यास मदत होते. यामुळे केसांमध्ये पूर्णपणे नैसर्गिक चमक तयार होते आणि तुमचे केस खूप आकर्षक वाटू लागतात.
5. मेहंदी
हप्त्यामध्ये एकवेळ केसांना मेहेंदी लावल्याने तुमचे जवळपास 2 महिन्यात तुमचे केस तुम्हाला काळे झालेले दिसू लागतील. आणि यापेक्षाही चांगले म्हणजे तुम्ही केसांना काळे करण्यासाठी त्रिफळा, शिकेकाई, आवळा आणि ब्लॅक कॉफीचा उपयोग करू शकता. यामूळे मेहेंदीची इलाज करण्याची क्षमता दुप्पट होते. आणि यांचे मिश्रण लावल्याने केस खूप मऊ होतील.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: केस लांब, सिल्की, चमकदार राहण्यासाठी सोपे व घरगुती उपाय