प्रत्येक जनाला नेहमी हा प्रश्न पडू शकतो की भारतीय रेल्वेचे डिझेल इंजिन नेमके किती एव्हरेज देते. ही गोष्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीही नसते. बरेच वेळा आपण आपल्या मोटरसायकल म्हणा किंवा कारच्या एव्हरेज मुळे त्रस्त असतो आणि विचार करत असतो की काही तरी असे करावे ज्यामुळे आपल्या गाडीचं एव्हरेज वाढेल पण गाडीची जेव्हडी क्षमता आहे तेव्हडच एव्हरेज गाडी देणार त्यापेक्षा जास्त तर शक्य नाहीये.
स्वस्तात मस्त आहे रेल्वेचा प्रवास-
भारतीय रेल्वे आपल्याला अगदी कमी भाड्यामध्ये आपल्याला जायचं त्या ठिकाणी पोहोचवते. आपणही रेल्वेने अगदी आरामात सीटवर बसून प्रवास करू शकतो. आपल्या मनात रेल्वेविषयी अनेक प्रश्न असतात पण आपल्याला त्याचे उत्तर माहिती नसते.
आपण अनेकवेळा भारतीय रेल्वेच्या इंजिनविषयी विचार करत असतो. भारतीय रेल्वेच्या इंजिनमधे तीन प्रकारच्या टाक्या असतात. ज्यामध्ये पहिल्या टाकीची क्षमता 5000 लिटर, दुसऱ्या टाकीची क्षमता 5500 लिटर तर तिसऱ्या टाकीची क्षमता 6000 लिटर असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की गाडीमध्ये जेवढे जास्त वजन असेल तितकेच कमी एव्हरेज गाडी देत असते. हेच भारतीय रेल्वेच्या डिझेल इंजिनच्या बाबतीतही तसेच आहे.
डिझेल इंजिनच्या गाडीचा प्रति किमीचे एव्हरेज गाडीत असणाऱ्या वजनावर अवलंबून असते. जर गाडी ही 24 डब्याची असेल तर जवळपास 6 लिटर डिझेलमध्ये 1 किमीचं एव्हरेज मिळते. याशिवाय 12 डब्याच्या पॅसेंजर गाडीमध्येही सारखेच म्हणजे जवळपास 6 लिटरमध्ये 1 किमी अंतर पार केले जाऊ शकते, कारण पॅसेंजर गाडी प्रत्येक स्टेशनवर थांबते.
ब्रेक लावल्याने आणि वेग वाढवल्याने खर्च होते जास्त डिझेल-
गाडी जर प्रत्येक ठिकाणी थांबत असेल तर ब्रेक लावल्याने व वेग वाढवल्याने जास्त डिझेल खर्च होते. एक्सप्रेस गाडीविषयी बोलायचं झालं तर 4.50 लिटरमध्येच 1 किमीचं एव्हरेज मिळेल. कारण एक्सप्रेस रेल्वे गाड्या पॅसेंजर गाडीच्या तुलनेत खूप कमी स्टेशनवर थांबतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतीय रेल्वे आता हळू हळू डिझेल इंजिन कमी करून त्या जागी नवीन विजेवर चालणारे इंजिन आपल्या ताफ्यामध्ये सामील करून घेत आहे.
जर भारतीय रेल्वेचे इंजिन पुर्णपणे विजेवर चालणारे तयार झाले तर यामुळे डिझेलचा वापर कमी होईल व त्यामुळे होणारं नुकसानही टाळता येईल. ज्याप्रकारे भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे, त्यानुसार लवकरच भारतीय रेल्वेचे सर्व इंजिन विजेवर चालणारे असतील याचे नवल वाटू देऊ नका.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: गाडीमध्ये केला थोडाच बदल आणि एव्हरेज बनले 153 किलोमीटर…