मुकेश अंबानीचा परिचय करून देण्याची गरज कोणालाच नाही आहे. आज मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी एक आहे. या जागेवर पोहचायला त्यांच्या वडिलापासून सर्वांनी भयंकर मेहनत केली. रिलायन्स मधील सर्वात जास्त शेअर्स त्यांच्या नावाने आहे. त्यांच्या मेहनती मुळे आज रिलायंस एक नंबर वर आहे. आणि जिओ वाल्यांनी त्यांना किती आशीर्वाद दिले हे सर्वाना माहीतच आहे. तर चला खासरेवर आज बघूया मुकेश अंबानी यांच्या कडील महागड्या ७ वस्तू,
मुकेश अंबानी आपल्या खाजगी आयुष्य ऐशोआरामात जगतात. त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात मागे त्यांच्या पत्नीचा मोबाईल जगातील महागड्या मोबाईल पैकी एक असल्यामुळे चर्चेत आला होता. मुकेश अंबानी कडील अश्या काही खासरे वस्तू बघूया…
1. बोइंग बिज़नेस जेट 2
२००७ साली मुकेश अंबानी यांनी दुसरे विमान खरेदी केले होते. या विमानात कॅबिनमध्ये १००४ स्क़ेअर फुट जागा आहे. एकावेळेस ७८ लोक या विमानात प्रवास करू शकतात. आणि या विमानाची किंमत ७३ मिलियन डॉलर आहे म्हणजे ४,७१,६१,८६,९०० रुपये आहे.
2. Antillia
मुकेश अंबानी यांचे घर जगातील आश्चर्यापैकी एक आहे मनायला हरकत नाही. antillia एका बेटाचे नाव आहे ज्याचा शोध अजूनही लोकांना लागला नाही. हि २७ मजली इमारत आहे पण याची उंची ४० मजली इमारती एवढी आहे. ६०० लोक या घराची काळजी घेण्याकरिता काम करतात. घरात ३ स्विमिंग पूल, कटिंगचे दुकान, स्पा, योगा हॉल, डान्स हॉल, सिनेमा गृह इत्यादी आहे. ६ मजले फक्त पार्किंग करिता वापरल्या जातात. घरात ९ लिफ्ट आहे. आणि घरावर ३ हेलीपैड आहेत. हे घर बांधायला १ बिलियन डॉलर म्हणजे ६४,६०,५०,००,००० रुपये खर्च आला.
3. फाल्कन 900EX
जेट सोबतच अंबानी यांच्या कडे फाल्कन ९००ex हे विमान देखील आहे. यामध्ये मिडलिफ्ट ऑफिस, एक कॅबिन त्यामध्ये म्युझिक सिस्टीम आणि सॅटेलाईट टीव्ही देखील आहे. या विमानाची किंमत ४३.३ मिलियन डॉलर म्हणजे २,७९,७३,९६,५०० रुपये आहे.
4. मेबैक 62
मुकेश अंबानी यांची कार देखील खासरे आहे. त्यांच्या कडे मेबैक ६२ हि बुलेट प्रुफ गाडी आहे. या गाडीमध्ये टीव्ही स्क्रीन आणि कॉन्फरन्स सारख्या सुविधा उपलब्ध आहे. या गाडीची किंमत १ मिलियन डॉलर ६,४६,०४,००० रुपये आहे.
5. मर्सिडीज एस क्लास
हि गाडी सुध्दा बुलेट प्रुफ आहे. फक्त ३ सेकंदात हि गाडी ० ते ६० किमी एवढा वेग पकडू शकते. मुकेश अंबानी यांनी या गाडी करिता जास्तीचे १.५लाख डॉलर खर्च केले आहे. यामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा बसविण्यात आल्या आहे.
6. एयरबस 319 कॉरपोरेट जेट
मुकेश अंबानी कडील आणखी एक विमान या विमानात २५ लोक प्रवास करू शकतात. यामध्ये मनोरंजनाकरिता सर्व व्यवस्था आहे, लक्झरी स्काय बार आणि डायनिंग एरिया देखील या विमानात आहे. या विमानाची किंमत १०० मिलियन डॉलर ६४,६०,४०,००,००,००० रुपये आहे.
7. मर्सिडीज एसएल 500
अंबानी यांच्या गाड्याच्या ताफ्यातील आणखी एक महागडी गाडी मर्सडीझ एसएल ५०० हि एक आहे. या गाडीला गल-विंगचे दरवाजे, लक्झरी इंटेरिअर, एल्युमीनियम बॉडी शेल इत्यादी सुविधा आहे. या गाडीची किंमत $100,000 आहे. आता तुम्ही करा भारतीय रुपयामध्ये हि गाडी कितीची याचा हिशोब !
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अरब देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व यांच्यापुढे अंबानीची संपत्ती आहे चिल्लर…