८ नोव्हेंबर २०१६ ची ती रात्र अचानक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. आजपासून ५०० व १००० च्या नोट चलनातून बाद करण्यात येईल. आणि संपूर्ण भारतात एकच गोंधळ उडाला. अनेक लोकाच्या नौकर्या गेल्या, धावपळ झाली, तासनतास लाईनमध्ये उभे राहणे वेगळे हे सर्व सहन केले भारतीयांनी फक्त देशातून भ्रष्टाचार दूर करण्याकरिता, काळा पैसा संपविण्याकरिता. नोटबंदी मुळे भारतास काय फायदा झाला माहिती नाही परंतु या नोटबंदी मागील खरा चेहरा कोण आज खासरेवर बघूया…
पुणे येथील अर्थक्रांतीचे प्रसिद्ध चेहरे अनिल बोकील यांना तुम्ही ओळखतच अससाल. टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमी नुसार अर्थक्रांतीचे अनिल बोकील हे नोटबंदी मागील चेहरा आहे.
वृत्तानुसार मोदी आणि बोकील यांची भेट झाली होती. बोकील यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोलण्याकरिता फक्त ९ मिनिट दिले होते. परंतु त्यांचे अर्थशास्त्रावरील विचार आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर विचार ऐकून हि ९ मिनिटाची भेट तब्बल १२० मिनिट म्हणजे २ तासापर्यंत चालली.
बोकील यांच्या मते भारतात २,७०,००० व्यवहार रोज होतात ज्यांची एकूण किंमत ८०० करोड रुपये आहे. यापैकी ८० टक्के व्यवहार हे रोख स्वरुपात होतात आणि २० टक्के व्यवहार हे बँकेमार्फत होतात. आणि भारतातील ७८% लोक हे रोज २० रुपयापेक्षा जास्त खर्च करत नाही. त्यामुळे त्यांना या मोठ्या नोटांची आवश्यकता नाही. त्यामुळे मोठ्या नोटावर बंदी आणावी हा सल्ला बोकील यांनी मोदींना दिला आणि तो त्यांनी ऐकला सुध्दा आता वर्षपूर्ती होत आहे. बघूया या नोटबंदीचा किती फायदा अथवा तोटा झाला आहे.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका..
नोटबंदी तिला कळाली नाही, पैसा असूनही गेला जीव…