जी. बाला हे तिरूनेलवेलीतील एक मुक्त कार्टूनिस्ट आहेत. बाला यांनी जिल्हा प्रशासन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडाप्पाडी के. पलानिस्वामी यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबाने केलेल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचे दाखवले होते. या वास्तववादी कार्टूनमूळे त्यांना क्राईम ब्रँच ने अटक केली आहे.
तमिळनाडूतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाला यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. फेसबुकवर त्यांच्या अधिकृत पेजला 65000 जण फॉलो करतात. बाळा यांचे वास्तववादी व्यंगचित्र विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करतात. सोशल मीडियावर विविध प्रश्नांवर होणाऱ्या चर्चामध्ये बाला यांचे कार्टून महत्वाची भूमिका बजावत आहेत.
बाला यांना ज्या व्यंगचित्रासाठी अटक करण्यात आली, ते व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक पेजवरही पोस्ट करण्यात आले होते. मात्र त्यांच्या अटकेनंतर फेसबुक पेजवरून हटवण्यात आले. एका कुटुंबाने काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या केली होती. याच घटनेचा संदर्भ घेत जी बाला यांनी व्यंगचित्र काढले होते. यंत्रणेतील त्रुटी दाखवण्यासाठी हे व्यंगचित्र काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बाला यांनी हे व्यंगचित्र २४ ऑक्टोबर रोजी पोस्ट केले होते. ३८ हजार लोकांनी हे व्यंगचित्र शेअर केले. त्याचमुळे या व्यंगचित्राची दखल घेत जी बाला यांना अटक करण्यात आली.
सावकारांच्या जाचाला कंटाळलेल्या या कुटुंबाने शेवटी आत्महत्या हा पर्याय निवडला. कारण जिल्हाधिकारी आणि पोलिसांना या प्रकरणी दुर्लक्ष केलं होतं. या कुटुंबाने जिल्हाधिकारी आणि पोलीसांना 2 महिन्यात 6 वेळा अर्ज केला होता. याच घटनेवर भाष्य करणारे बाला यांचे कार्टून सध्या तामिळनाडूमध्ये प्रचंड वायरल झालेलं आहे, त्याचबरोबर हे कार्टून विविध सरकारी कार्यालयावर भाष्य करताना दिसत आहे. यामध्ये या कार्यालयावर ताशेरे ओढण्यात आले आहे.
बाला यांनी या कार्टूनमध्ये एक जळनारा मुलगा जमिनीवर पडलेला दाखवला आहे. त्याच्या अवतीभवती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस कमिशनर हे पूर्ण नग्न दाखवले आणि डोळे मिटवून उभे असलेले दाखवले आहेत आणि ते पैशाच्या नोटांनी आपली नग्नता झाकताना दिसत आहेत.
एका उच्च पदावरील शासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बाला यांनी हे कार्टून 24 ऑक्टोबरला रात्री पोस्ट केले होते. या कार्टूनला शेअर करणाऱ्यांची संख्या खूप होती. संपुर्ण तामिळनाडूमध्ये हे कार्टून खूप वायरल झाले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी याची तक्रार मुख्य सचिव यांच्याकडे केली आणि डिजीपी यांनी त्यांना अटक करण्याचा आदेश दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना आयटी ऍक्ट कलम 67 ( इलेट्रॉनिक माध्यमात अश्लील सामुग्री प्रसारित करणे)अंतर्गत अटक केली आहे.
5 दिवसांपूर्वी ही थिरूमुरूगन या 19 वर्षीय अभियांत्रिकी डिप्लोमाधारक विद्यार्थ्याला फेसबुक चॅटिंगमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या एका अपमानास्पद वक्तव्यासाठी अटक करण्यात आली होती.
प्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंची किंमत तुम्हाला माहीत आहे का ?