भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावरून ज्या दिवशी धोनीने निवृत्ती घेतली त्याच दिवशी त्याने आपली हि जवाबदारी भारताची रन मशीन, विराट कोहली कडे सोपवली. कोहली आज जगात एक नाव झाले आहे. जगात असा कुठलाही देश नाही जिथे कोहलीचे चाहते नाही आहे. तो यशाच्या सर्वोच्च शिखरावर सध्या आहे. सध्या प्रकाशित झालेल्या फोर्ब्सच्या यादीत विराट कोहली हा जगातील सर्वात जास्त कमाई असणाऱ्या १०० खेळाडूपैकी एक आहे.विराटने या यादीत जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीला सुध्दा त्याने मागे पाडले आहे. चला तर खासरेवर बघूया विराटच्या विराट यशामागे कोण आहे ?
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ ला दिल्ली मध्ये झाला त्याला त्याच्या कोच अजित शर्मा चिकू या टोपण नावाने हाक मारयांचे त्यामुळे हे त्याचे टोपण नाव पडले विराट च्या कुटुंबात आई (सरोज कोहली) मोठी एक बहिणी (भावना कोहली) तसेच एक मोठा भाऊ (विकास कोहली) आहे. २००६ साली तो रणजी सामना खेळत असताना अचानक इकडे विराटच्या वडिलांचे (प्रेमाजी कोहली ) आकस्मिक निधन झाले.
कोहलीला जे लोक पहिले पासून ओळखतात त्यांना माहिती आहे कि हा प्रवास कोहली करिता सोपा नव्हता. त्याने केलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे. आज आपण कोहलीला मोठ्या मोठ्या जाहिरातीत बघतो किंवा संघास विजयश्री खेचून आणताना त्याची धडपड बघतो. परंतु एक काळ होता जेव्हा कोहली नुकताच संघात आला होता आणि त्याला बघून असे विशेष कोणाला आकर्षण वाटत नसे.
तुम्हाला विश्वास नाही बसणार परंतु विराट कोहलीला संघात आणल्यामुळे एका व्यक्तीला आपली नौकरी गमवावी लागली…
विराट कोहली सध्या एक प्रसिद्ध नाव आहे परंतु त्याला क्रिकेट संघात स्थान दिल्यामुळे एका व्यक्तीस खूप त्रास शन करावा लागला. त्या व्यक्तीचे नाव काय आहे ? कोहलीला निवडणारे हे फार मोठे खेळाडू होते परंतु त्यांचा हा निर्णय अनेकांना चुकीचा वाटत होता CatchNews ने दिलेल्या बातमीनुसार हे व्यक्ती आहे BCCI निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसकर यांना कोहलीच्या निवडीमुळे पदावरून काढून टाकण्यात आले होते.
विराट कोहलीची निवड त्याने दाखविलेल्या अप्रतिम खेळामुळे झाली होती जो त्याने अंडर 19 संघाचे नेतृत्व करत वर्ल्ड कप २००८ मध्ये भारतात आणला होता. वेंगसकर यांच्यामुळेच विराटने त्याच वर्षी अंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच वर्षी पदार्पण केले. त्याची निवड भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याकरिता करण्यात आली होती. आज कोहलीच्या चाहत्यांनी वेंगसकर यांचे आभार मानायला हवे कारण क्रिकेटमधील हा हिरा त्यांनी नौकरी गमावून क्रिकेटमध्ये आणला.
हा प्रसंग सर्वासमोर ‘Democracy’s XI’ या पुस्तकात प्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आणला आहे. ते सांगतात कि सर्वाची पहिली पसंदी एस. बद्रीनाथ हि होती जो तामिळनाडूचा होता. परंतु वेंगसकर यांना टीममध्ये कोहली हवा होता. हे प्रकरण नंतर त्यावेळेसचे बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नेण्यात आले परंतु वेंगसकर यांनी कोहलीला संघात स्थान मिळवून दिले.
कोहलीला सुरवातीच्या काळात सेट होण्या करिता वेळ लागला आणि त्याचा स्वभाव या गोष्टीमुळे त्याची निवड अडली होती असे अनेक लोक सांगतात. २०१२ सालचा आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूचा मान दिला गेला तसेच २०१३ साली भारत सरकारने विराट ला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला !
पुढील कारकीर्दीस कोहलीला खासरेतर्फे शुभेच्छा ! माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ‘आशिष नेहराचा’ अलविदा…!