रोज एक सीताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामधील न्यूट्रिएंट्ससारखे अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु काही वेळा हे जास्त खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता जाते. सीताफळाला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, हिंदीमध्ये सीताफल, इंग्रजीमध्ये कस्टर्ड अॅपल तर शास्त्रीय भाषेत आमोना रेटीकूलहा असे म्हणतात. आज आपण खासरे सीताफळ खाण्याचे फायदे जाणुन घेणार आहोत…
सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुला-मुलींना सीताफळ दिल्यास त्यांची वाढ उत्तम रीतीने होऊन शरीर सुदृढ बनते.
काळे, घनदाट केस कोणाला आवडत नाहीत. मात्र हल्ली धावपळीच्या जीवनात मात्र केसांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कलपणा या समस्या वाढतात. हल्ली जगातील अनेक जण केसांशी संबंधित समस्याने त्रस्त आहेत. यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे सीताफळ. या फळाच्या सेवनाने अनेक फायदे होतात.
केस गळती रोखण्यासाठी सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधामध्ये उगाळून लावल्यास फायदा होतो. त्याचबरोबर सीताफळामध्ये भरपूर मात्रेमध्ये असणारे अ जीवनसत्व केस, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्याकरिता उत्तम आहे. सीताफळाच्या बिया उगाळून लावावयाच्या झाल्यास बिया लावून डोके एखाद्या जाडसर कपड्याने बांधून टाकावे. या बिया डोळ्यांना लागू देऊ नये कारण त्यामुळे डोळ्यांची आग होण्याचा संभव असतो.
स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर तसेच चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे. याचा वापर वर्षभर करता येतो.
ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.
सहसा सीताफळ हे दुपारच्या वेळेमध्ये खावे. मुच्र्छा आली असल्यास सीताफळाची पाने वाटून त्यांचा रस काढावा व रसाचे थेंब नाकात टाकावेत. रुग्ण शुद्धीवर येतो.
सीताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात व डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात व उवा व लिखाही होत नाहीत.
सीताफळ हे पित्तशामक, तृषाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृद्यासाठी फायदेशीर असे आहे. पित्ताचा त्रास होत असल्यास सीताफळ खाल्ल्याने फायदा होतो.
ज्या व्यक्ती शरीराने दुबळ्या किंवा किडकिडीत असतील, त्यांनी सीताफळाचे सेवन जरूर करायला हवे. सीताफळ हे शरीराचा दुबळेपणा कमी करणारे आणि पौरुषवर्धक आहे.
ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे, अशा व्यक्तींनी सीताफळ खाऊ नये. तसेच ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनीही सीताफळ खाऊ नये. अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे बठेकाम करणाऱ्यांनी तसेच स्थूलता असणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…