Saturday, January 28, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

रखवालदार ते सोनेरी आमदार, दिवंगत आ.रमेश वांजळे यांचा संघर्षमय प्रवास…

Mukund Solanke Patil by Mukund Solanke Patil
November 5, 2017
in राजकारण, नवीन खासरे
0
Goldman Ramesh wanjale

महाराष्ट्राच्या राजकारणात एक सोनेरी अध्याय लिहिला गेला. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीनच तयार झालेल्या पक्षाकडून निवडणूक लढवत एक अत्यंत सर्वसाधारण घरातील, स्वकर्तुत्वाने नाव कमावलेला एक व्यक्ती पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजयी झाला. हे व्यक्ती होते दिवंगत आमदार रमेश वांजळे. रमेश वांजळे यांचा आमदार होईपर्यंत चा प्रवास खूप खडतर होता. रमेश वांजळे हे मूळचे अहिरे गावचे. गावातच त्यांचे बालपण गेले. वांजळे यांच्या कुटुंब गावातील एक प्रतिष्ठित कुटुंब. त्यांचे वडील हे गावचे सरपंच असल्याने राजकारणाचे बाळकडू त्यांना फार घरातूनच मिळाले. रमेश वांजळे यांना 3 भावंडांमधून थोरले. रमेश वांजळे यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. त्यांना लहानपणी तालमीत जाण्याची फार आवड होती, ते नियमित तालमीत जात असत. त्यांचे शरीरसौष्ठव चांगले असल्याने पुढे त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत रखवालदार म्हणून नोकरी मिळाली. महापालिका कामगार म्हणून त्यांनी वाकड येथील स्मशानभूमीत काही काळ रखवालदार म्हणून नोकरी केली. परंतु त्यांची ही नोकरी जास्त काळ टिकली नाही.

Ramesh Wanjale

पुढे रमेश वांजळे यांच्या आयुष्यात खरा टर्निंग पॉईंट आला. वांजळे यांना रामकृष्ण मोरे यांच्या रुपात राजकिय गुरू मिळाले. मोरे यांच्यासमवेत काम करत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. त्यांनी प्रथम अहिरे गावची सरपंचपदाची निवडणूक लढवत विजय मिळवून ते सरपंचपदी विराजमान झाले. इथेच न थांबता त्यांनी काँग्रेस पक्षाकडून पंचाय समितीची निवडणूक लढवली व ते विजयी होऊन पंचायत समितीच्या उपसभापती पदी विराजमान झाले. राजकिय वाटचालीत माघार न घेणे हा त्यांच्या मूल मंत्र होता. पुढे जिल्हा परिषद गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी तिथे आपल्या पत्नी हर्षदा वांजळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले व मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या.

Golden mla

पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर वांजळे यांनी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत त्यांच्या खडकवासला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्यांना पक्ष बदलणे हा एकमेव पर्याय होता. त्यांनी सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली पण राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्यांनी शिवसेना व भाजपाकडेही उमेदवारी मागितली पण त्यांच्याकडूनही उमेदवारी मिळाली नाही. अखेर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्ता धरला आणि राज ठाकरे यांना उमेदवारी मागितली. ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि त्याच वेळी खडकवासला मतदारसंघात ते आमदार होणार अशी चर्चा चालू झाली.

Wanjale

ते अजून एक गोष्टीसाठी प्रसिद्ध होते, ते म्हणजे त्यांच्या अंगावरील सोने. वांजळे यांना तर चक्क वृत्तवाहिन्यांनी गोल्डमॅन ही पदवी बहाल करून टाकली. हळू हळू ते पूर्ण महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रमध्ये गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध झाले. रमेश वांजळे यांची खरी ताकद म्हणजे त्यांच्याकडे असलेले कार्यकर्त्यांचे जाळे. त्यांच्या उत्कृष्ट भाषण शैलीमुळे मतदारसंघात खूप चांगली पकड होती. प्रचारातही त्यांची आगळीवेगळी पध्दत होती. सुरवातीला अंगभर सोने असल्याने त्यांच्यावर टीका ही केली गेली. परंतु वांजळे यांनी आपल्या वाणीने विरोधकांवर मात केली. रमेश वांजळे यांना तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वरांचे अभंग मुखपाठ होते. वांजळे यांचा निवडणूकित मोठ्या मताधिक्याने विजयची झाला.

Goldman wanjale

पुढे विधिमंडळात त्यांचे विक्राळ रूप पूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाले. कारण अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधात मनसेने केलेल्या आंदोलनात त्यांनी अबू आझमी यांच्यासमोरील माईकचे पोडीअम उखडून टाकले होते.

वांजळे यांनी व्यवसायातून साधले होती आर्थिकवृद्धी-

Remesh wanjale

रमेश वांजळे यांचा राष्ट्रीय संरक्षण प्रभोदिनी मध्ये मोठा दबदबा होता. लष्करी अधिकाऱ्यांसोबत असलेल्या चांगल्या संबंधामुळे त्यांनी ज्युसबार टाकला होता. यातून त्यांना आर्थिकवृद्धी साधता आली. त्यांनी यातून मिळालेला पैसा जमिनीत गुंतवला . जमीन खरेदी विक्रीतून त्यांनी पुढे बरीच संपत्ती मिळवली. त्यांनी आपली संपत्ती घरात न ठेवता ती त्यांनी गरजूंना बरीच मदत केली. त्यांनी गरीब लोकांसाठी काशियात्रा घडवण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. यातून त्यानी हजारो नागरिकांना स्वखर्चाने काशियात्रा घडवली. तसेच दलित समाजाला दीक्षाभूमीचे दर्शन, तर मुस्लिमांना अजमेरची यात्रा त्यांनी घडवली.

Goldman Ramesh w

या गोल्डमॅनचा 2011 मध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने पुण्यासह पूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. त्यांच्यासारख्या एका चांगल्या नेत्यास, उत्कृष्ठ वक्त्यास महाराष्ट्र मुकला होता.

Wanjale death

पुढे त्यांचे भाऊ शुक्राचार्य वांजळे हे राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी नुकतेच पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही भूषवले आहे. रमेश वांजळे यांचा राजकीय वारसा आता सायली वांजळे या चालवतात. त्या पुण्याच्या विमलबाई गरवारे कॉलेजमधून पोलिटिक्स विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. आता यावर्षी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून विजय मिळवला आहे.

Sayali wanjale

वांजळे यांची इच्छा होती की, झोपडपट्टीयांचं पुनर्वसन, वंचित विद्यार्थ्यांसाठी शाळा अशा सुविधा द्यायच्या होत्या. सायलीनी या वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: सलग ११ वेळा विधानसभेत निवडून येऊन गिनीज बुक मध्ये नोंद असलेले महाराष्ट्रातील एकमेव राजकारणी

Loading...
Tags: goldmanmlaramesh wanjale
Previous Post

२६ वर्षीय भारतीय “चहावाली” तरुणी बनली ऑस्ट्रेलियन बिझनेस वूमन ऑफ द इअर..

Next Post

हे खाल्ल्याने तल्लख होतो मेंदू, जाणुन घ्या याचे असेच सीताफळाचे फायदे…

Next Post
हे खाल्ल्याने तल्लख होतो मेंदू, जाणुन घ्या याचे असेच सीताफळाचे फायदे…

हे खाल्ल्याने तल्लख होतो मेंदू, जाणुन घ्या याचे असेच सीताफळाचे फायदे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In