सध्या इंटरनेटवर एका मुलीच्या व्हिडिओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. व्हाट्सएप, फेसबुक सहित सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गाण्यावर एक्सप्रेशन देणाऱ्या मुलीचे व्हिडीओ चांगलेच वायरल झाले आहेत. अक्षरशः या एक्सप्रेशननी लोकांना भुरळ घातली आहे. ते लोकांना एवढे आवडले आहेत मी त्याला हजारो शेअर आणि views मिळत आहेत.
स्वतःच्या हाव-भावाने मोहित करणारी मुलगी आहे तरी कोण हा प्रश्न सर्वाना पडला आहे. माहिती आहे का तुम्हाला या मुलीबद्दल? नाही ना चला तर मग खासरेवर जाणून घेऊया या एक्सप्रेशन क्वीन बद्दल
व्हाट्सएप, फेसबुक आणि युट्युबवर धुमाकूळ घातलेल्या या एक्सप्रेशन क्वीनचं नाव आहे शिल्पा ठाकरे आणि ती आहे एक मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री. होय शिल्पा ठाकरे एक ही मराठी नवोदित अभिनेत्री आहे. शिल्पाचा जन्म नागपूर या शहरात झालेला आहे. शिल्पाही अभिनयाबरोरब एक चांगली लेखिका व डान्सर आहे. शिल्पा ठाकरे सध्या पुण्यात राहते. शिल्पाचे शालेय शिक्षण एमकेवी स्कुल नागपूर येथे झालेले आहे.
शिल्पा लवकरच प्रेमा या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिल्पाने सुम्मी या चित्रपटासाठी डायलॉग आणि कथानक लिहिलं आहे. प्रेमा या चित्रपटात शिल्पा आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शिल्पा व्यतिरिक्त मानसी नाईक ही आपल्याला दिसणार आहे. मार्कन्डेय फिल्म्स च्या या चित्रपटाचे प्रोड्युसर रमेश गुरराम हे आहेत तर सदानंद इप्पक्कायाल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
शिल्पा ठाकरे आपल्या युट्युब चॅनेल साठीही खूप प्रसिध्द आहे. तिच्या युट्युब चॅनेल वर तुम्हाला सर्व व्हिडीओ बघायला मिळुबसहजफाट. तिने एक्सप्रेशन दिलेले सॉंग व्हाट्सएप, फेसबुक प्रचंड प्रसिद्ध आहे. माहिती सर्च केली तर लगेच मिळतील. शिल्पाचे व्हिडिओ युट्युब, व्हाट्सएपच्या माध्यमातून प्रंचड वायरल झालेलं आहेत. शिल्पा यांच्या या अत्यंत चांगल्या अभिनयाने त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झालेली दिसते. या प्रसिध्दीसोबत शिल्पा च्या युटूबच्या चाह्त्यामध्ये प्रचंडवाढ झालेली आपल्याला बघायला मिळते.
“इचार काय हाय तुमचा ओ पाहून इचार काय हाय तुमचा” या गाण्यावर दिलेले एक्सप्रेशन बघितल्यावर तुम्हाहि या अभिनेत्रीच्या एक्सप्रेशनच्या प्रेमात पडण्याचो खात्री मला आहे.
बघूया काही शिल्पाचे सुप्रसिद्ध व्हिडीओ
क्लासिकल शिल्पा नक्की बघा
आणि आता हे सलमानचे गाणे पेहला पेहला प्या है…
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
नाना पाटेकर यांचे सिनेमातील काही अप्रतिम डायलॉग नक्की वाचा…
सरकारी नौकरीचे फायदे म्हणून तुम्ही याला करताय ट्रोल बघा हा कोण आहे…