एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काय काय नाही करत. सेलेब्रिटीकडून आपले प्रॉडक्ट विकतो. 80 रुपयांची एखादी गोष्ट 100 सांगून 20% डिस्काउंट देतो. सरकारच्या घोषनापत्रा सारखेच जाहिरातीही खोटे आश्वासन देत असतात. काही काही वेळा या जाहिराती एवढ्या चांगल्या असतात की लोकं त्याकडे आकर्षित होण्यास सुरुवात होते. पण काही काही वेळेस या जाहिराती मध्ये क्रिएटिव्हिटी च्या नावाने निव्वळ मूर्खपणा केलेला असतो.
आज आपण अशाच काही जाहिराती बघणार आहोत, ज्यामध्ये काही न काही मूर्खपणा केलेला आहे. भले ही या जाहिराती मुर्खपणाने भरलेल्या असल्या तरी या जाहिराती पाहिल्यावर तुमचे हसून हसून चक्क पोट दुखू शकते. आणि या जाहिराती बघितल्यावर रस्त्याने जाताना प्रत्येक जाहिरातीकडे बघण्यास सुरुवात कराल.
काय बनणे पसंत कराल तुम्ही?
या शाळेमध्ये केमिस्ट्री च्या शिक्षिकेला पगार 7000 रुपये तर चौकीदाराला 8000 रुपये अशी माहिती टाकलेली आहे. आपण यावरून समजू शकतो की इथे काम करण्याची ईच्छा असणाऱ्या व्यक्तीला नोकरी निवडणे किती अवघड जात असेल. हि जाहिरात प्रत्येक व्यक्तीला खूप गोंधळून टाकेल यात शंकाच नाही.
वाह काय ऍड आहे-
जिंदगी ना मिलेगी दोबारा. युज करो गुब्बारा.. कंडोम च्या जाहिरातीसाठी एवढ्या भारी ओळी शोधणाऱ्या त्या व्यक्तीची तारीफ तर बनतेच. कोण कुठे कशा प्रकारे डोकं लावेल याची कल्पना न केलेलीच बरी. हि जाहिरात वाचल्यानंतर तुम्ही स्वताला हसण्यापासून रोखू शकाल म्हणून वाटत नाही.
एक इमोशनल टॅगलाईन-
जब सब आपकी ले रहे है तो आप भी कूछ ले लो, ही टॅगलाईन एव्हडी इमोशनल आहे की हे बघून माणूस काही ना काही तर घेईलच. ही बनवणाऱ्या व्यक्तीला हृदयापासून प्रणाम. आपण या दुकानापासून जात असू अन आपल्याला काही घ्यायचं नसेल तरी आपण हि टॅगलाईन वाचूनही काही न काही घेण्याच्या विचारात पडू शकता.
शौचालयाची सर्वात खतरनाक जाहिरात-
तुम्ही शौचालयाची जाहिरात अनेक वेळा बघितली असेल पण तुम्ही इतकी खतरनाक जाहीरात कधीच बघीतली नसेल. या जाहिरातीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक गुंड बाहेर शौचास गेलेल्या एक स्त्रीला उचलून घेऊन जाताना दाखवला आहे. अशा प्रकारच्या धोक्यासहस्त्रियांना अनेक समस्यांना तोंड द्याव लागत.महत्वाची बाब म्हणजे या जाहिरातीपासून प्रेरित होऊन अनेकांनी आपल्या घरी शौचालय बांधले असणार.
एव्हडी खतरनाक गॅरंटी कोणी देत नाही-
चांगल्या ऑफर्स देऊन म्हणा किवा विविध प्रकारच्या कल्पना लावून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. कधी कधी लोकं ग्राहकांना लोभीत करण्यासाठी अनेक वेळा चक्क त्यांची सीमाच पार करतात. हे महाशय स्वतःला चौकात जाळून घेणासही तयार झाले आहेत. गणित आणि रीसनिंग मध्ये चांगला अनुभव असणारे हे डॉक्टर त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता नाही झाली तर? तर यांनी लावलेले डोकं पाहून प्रश्न पडेल कि कसे कोणी एवढ्या पुढच्या थराला जाऊ शकत.
केसांवर जबरदस्त उपाय-
या जाहिरातीला लक्षपूर्वक बघा. या जागेवर इतकी जबरदस्त ट्रिटमेंट केली जाते की, माणसाच्या नाकावर पण केसं येतात. जाहिरात चांगली असेल तर लोकं आकर्षित होतात हे माहितीये पण अशाप्रकारे कोणी कस एव्हड चुकीच्या पद्धतीने जाहिरात करू शकतो.
कॉन्फिडन्स तर बघा-
फिजिक्स हा विषय तास फार अवघडच आहे.पण या जाहिरातीमध्ये ज्या प्रकारे दावा केला आहे ते पाहून तुम्ही डोक्याला हाथ लावल्याशिवाय राहणार नाही. या क्लास च्या जाहिरातीमध्ये एका रिक्षाचालकाला ही फिजिक्स शिकवण्याचा दावा करण्यात आला आहे.
तुम्ही काय पिणार-
चहाचे नावं जर एवढे मजेशीर असतील तर कोणीही हा चहा प्यायला नाही म्हणणार नाही. चहाच्या नावासोबत खालची लाईनही वाचायला विसरू नका.
कधी चालू नाही होणार उधारी-
यांनी तर चक्क राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावरच उधार देण्यात येणार आह अशी जाहिरात लावली आहे. या लाईननुसार या महाशयांच्या दुकानात आता कधीच उधारी चालू नाही होणार आहे.
हे काहीच कळलं नाही-
बहुतेक हे महाशय गाईचे प्रमोशन करत असावेत. मला माहिती नव्हत की देशी गायीचे असेही प्रमोशन केले जाऊ शकते. ही कोणी तरी जिनीअस माणसाची आयडिया असणार.
या जाहिराती पाहून हसला असाल तर अवश्य शेअर करा आणि आपले पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: विक्सच्या जाहिराती मधील तृतीयपंथी आई गौरी सावंतची सत्य घटना….