भारतासहित जगभरातील अनेक देशांमध्ये व्हाट्सएपचे सर्व्हर डाऊन झाले होते. रिपोर्ट्स च्या नुसार जवळपास 1 तासासाठी व्हाट्सएपमधून ना मेसेज जात होते ना कॉल. नंतर थोड्या वेळाने परत चालू झाले आहे. व्हाट्सएपच्या अशा अचानक बंद पडण्याने जगभरातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक जण व्हाट्सएपचा उपयोग काही महत्वपूर्ण काम जसे की, आपल्या ऑफिस च्या लोकांशी संपर्क, फाईल शेअर करण्यासाठी, फोटो ची देवाण घेवाण करण्यासाठी करत असतात. सर्वर डाऊन झाल्यानंतर तासाभरात अँप डेव्हलपर्सनी या समस्येवर मात करत व्हाट्सएप पुन्हा चालू केले आहे. हे पहिल्यांदा झाले असे नाही, याअगोदर पण व्हाट्सएप मध्ये अशा प्रकारच्या अडचणींचा सामना वापरकर्त्यांना करावा लागला आहे. सप्टेंबरमध्ये अशाच प्रकारची एक समस्या निर्माण झाली होती. त्यावेळेसही वापरकर्त्यांनी अँप चालत नसल्याची तक्रार केली होती. मे महिन्यात सुद्धा व्हाट्सएप काही तासाकरिता जगभरात बंद झाले होते. यामध्ये मलेशिया पासून स्पेन, जर्मनी आणि अजून काही युरोपीय देश ही सामील होते. सर्वात जास्त प्रभावित झालेल्या देशात बेल्जिअम नेदरलँड आणि ब्रिटन चा समावेश होता.
#FLASH: Whatsapp services reportedly non-functional at present in many parts of India. pic.twitter.com/BQsNaHxmcU
— ANI (@ANI) November 3, 2017
लोकांनी घेतली भरपूर मजा-
जगभरातील लोकांनी व्हाट्सएपच्या या समस्येवर ट्विटर वर जाऊन बरेच ट्रोलिंग केले. अनेकांनी याचा विनोदी भाषेत समाचार घेतला तर काहींनी चांगलाच संताप व्यक्त केला. एका रिपोर्टनुसार या क्रॅश चा सर्वात जास्त प्रभाव भारत, मलेशिया आणि युरोप मध्ये पडला. यानंतर दुनियाभरातील लोकांनी याचा चांगलीच मजा घेतली. सोशल मीडियामध्ये जसे की फेसबुक ट्विटर वर अनेक कमेंट्स चा वर्षाव बघायला मिळाला.
#Whastappdown हा हॅशटॅग तर अवघ्या काही वेळातच ट्रेंडिंग ला आलेला बघायला मिळाला. भारतामध्येही अनेक लोकांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली.
का बंद पडले व्हाट्सएप-
सिंगापूरमध्ये फेसबुकच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार कंपनी याची चौकशी करत आहे. अजूनही याचे नेमके कारण समोर आले नाही. हा हल्ला होता का सिस्टीम क्रॅश हे लवकरच कळेल…
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: Whatsapp विषयी काही अपरिचित खासरे गोष्टी…