अश्विनी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात सहावीत शिकत आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अश्विनीला गौरविण्यात येणार आले. तिचे कामही तसेच होते हा पुरस्कार मिळाला तिच्या शौर्य व धैर्याकरीता चला बघुया खासरेवर तिची ही शौर्यगाथा…
अकोले तालुक्यातील मेहेंदुरी येथे उघडे हे आदिवासी कुटुंब वाटेकरी म्हणून काम पाहते. ९ जून २०१४ रोजी सकाळी अश्विनीचे वडील बंडू उघडे झेंडूच्या शेताला पाणी भरत होते, तर अश्विनी आणि तिची धाकटी बहीण रोहिणी आंबे गोळा करत होत्या.
याच वेळी शेजारच्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने रोहिणीवर हल्ला केला. ती प्रचंड घाबरली व जिवाच्या आकांताने ओरडू लागली. तिचा टाहो ऐकताच ११ वर्षीय अश्विनीने घटनास्थळी धाव घेतली. समोर बिबट्या रोहिणीचा पाय ओढत असल्याचे तिला दिसले. हे दृश्य पाहताच क्षणाचाही विचार न करता अश्विनीने बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. आरडाओरड सुरू असल्याने त्यांच्या वडिलांनीही धाव घेत बिबट्याला हुसकावून लावले. या हल्ल्यात रोहिणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले.
या प्रसंगानंतर गावात व परिसरात अश्विनीच्या धाडस व शौर्याचे कौतुक होत होते. मेहंदुरी येथील अश्विनी शिकत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे सहायक शिक्षक ज्ञानेश्वर वैरागकर यांनी अश्विनीच्या धाडसाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात यावी म्हणून प्रयत्न सुरु केले. त्यासाठी पुरक ठरली बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकात एका धाडसी मुलीच्या पाठातून मिळालेली प्रेरणा आणि काही वर्षांपूर्वी परिसरातील एका मुलाने राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी केलेला अर्ज आणि त्यासाठी जोडलेले उचित कागदपत्र याची माहिती.
अश्विनीचे वडील अशिक्षीत. हातमजूरीवर कुटुंबाचा निर्वाह चालतो. अश्विनी, रोहिणी आणि एक मुलगा व बायको असे त्यांचे कुटुंब. घरी अठराविश्व दारिद्र्य. मग सहायक शिक्षक ज्ञानेश्वर वैरागकर यांनीच पुढाकार घेत केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत दिल्लीस्थित राष्ट्रीय बालकल्याण परिषदेकडे यासंबंधित पत्रव्यवहार केला. या कामी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळाली. परिणामी अश्विनीची यावर्षीच्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले. याचा आनंद अश्विनीच्या शाळेत व पंचक्रोशीत साजरा करण्यात आला.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…
महाराष्ट्रातील असा एक किल्ला ज्याची माहिती ९९% लोकांना नाही…