भूतानचा शाही परिवार, किंग जिग्मे केसर नाम्ग्येल वांगचुक आणि राणी जेतसून पेमा वांगचुक सध्या ३ दिवसापासून भारत दौर्यावर आहे. त्याच्या या दौऱ्याच्या सुरवातीपासून त्यांचा लहान मुलगा, राजकुमार जिग्मे नामग्यल वांगचुक हा अनेकांना भुरळ पाडत आहे.
अंतराष्ट्रीय विषयावर चर्चा बाजूला सारून सगळे हे बाळ किती गोंडस या विषयी चर्चा करायला लागले आहे. आणि आहेही हा राजकुमार तसाच चुणचुणीत आणि गुबगुबीत
असे दिसतेय कि भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर ह्या चिमुकल्या राजकुमाराने जादू केली आहे आणि यापासून नरेंद्र मोदी हि वाचू शकले नाही.
Presented the Prince of Bhutan an official football from the FIFA U-17 World Cup and a chess set. pic.twitter.com/91xLRURPnJ
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2017
त्यांच्या tweet वरून आपल्या लक्षात येईल कि शाही परिवार व चिमुकल्या राजकुमारच्या भेटी दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किती आनंदी आहेत. त्याच्या सोबत खेळायचा मोह सुध्दा मोदि टाळू शकले नाही.
प्रधानमंत्री मोदिजीवर चिमुकल्या राजकुमाराने अशी भुरळ घातली कि त्यांनी या भेटीचा विडीओ हि फेसबुकवर अपलोड केला आहे. आणि त्यावर त्यांनी लिहलेले आहे कि, भूतानच्या शाही परिवारा सोबत चांगली बैठक झाली आणि छोट्या राजकुमारासोबत चर्चा करायला खूप मजा आली.
का बर मजा नाही येणार ? या चिमुकल्याच्या गालावरील खळी कोणालाही भुरळ पाडेलच…