जग हे एक पुस्तक आहे. जे प्रवास करीत नाही त्यांनी या पुस्तकाचे एकच पान वाचले आहे. ही ओळ ध्रुव ढोलकिया नेहमी सांगतात. आणि त्यांचे आयुष्य या गोष्टिस खरे ठरवत आहे. चला बघुया खासरेवर ध्रुव ढोलकिया यांच्या अफलातुन आयुष्याविषयी काही खासरे माहिती….
काही दिवसाअगोदर या माणसाने १६ महिन्यात भारतातील २९ राज्यांचा प्रवास केला आहे तो ही बुलेट वर… अत्यंत कठिण, खडतर, थकवीणारा हा प्रवास होता. परंतु तो म्हनतो या प्रवासामुळे त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला आहे. आता तो पुर्वी सारखा राहीला नाही नविन ध्रुव सर्वासमोर आहे.
परंतु या साहसी प्रवासाची सुरवात फार चांगली नव्हती. ह्याची सुरवात त्याच्यामध्ये जमा झालेल्या काही नकारात्मक गोष्टिपासुन झाली. पत्नी सोबत त्याचे जमत नव्हते घटस्फोट झाला, नोकरी सुध्दा चालली गेली आणि एका अपघातात त्याच्या कंबरीला दुखापत झाली. तो सांगतो की तो फसला होता. मनुष्य म्हनुन त्याने कधी आयुष्य जगलच नाही.
हि गोष्ट,तेव्हाची आहे जेव्हा ३४ वर्षीय युवकाने ठरविले हे सर्व बदलवायचे, घराच्या बाहेर पडायचे आणि हिच ती खरी संधी होती त्याच्या अंतरात्म्याचा शोध घेण्याची. हि प्रेरणा त्याला मिळाली स्टिव जाॅब्स कडुन त्यानेही ॲपल मधुन काढुन टाकल्यावर भारतातील काही ठिकाणाचा शोध घेतला होता.
त्याने या प्रवासात बघितले की जग किती भयंकर आहे. बिहारमध्ये प्रवास करताना त्याची गाडी बंद पडली तर एका दुकानात गेले असता तिथल्या स्थानिक गुंड त्याला भेटले व त्यांनी केलेल्या खुनाची माहिती त्याला सांगु लागले.
परंतु या व्यतिरीक्त त्याने प्रेम हे पैस्यापेक्षा किती मोठे आहे याचाही शोध लावला. ईशान्य भारतात त्याला मिळालेले प्रेम तो सांगतो की मि हे शब्दात वर्णन करु शकत नाही. तो एक मुंबईकर त्याच्याकरीता पैसा महत्वाचा परंतु त्रिपुरा येथिल एका गरीब व्यक्तिने त्याला झोपडीत आश्रय दिला , हाताने स्वयंपाक केला व राहण्या खाण्याचे पैसेसुध्दा घेतले नाही. ही गोष्ट त्याला खुप काही शिकवुन गेली.
ध्रुव ढोलकिया याने भारताच्या संपुर्ण लांबी व रुंदिचा प्रवास केला त्यावरुन आपल्याला एक गोष्ट कळते, कि आयुष्यात एक ट्रिप आवश्यक आहे.
तुम्ही त्याला ईथे फाॅलो करु शकतात
सर्व फोटो हे Bullet Yatra वरुन घेण्यात आले आहे.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका…
वाचा या तरुणाने वाचवली बुलेट(Royal Enfield) कंपनी इतिहास जमा होण्यापासून…