करले जुगाड करले… कर ले कोई जुगाड. हे गाणं खूप नंतर आलं आहे. परंतू भारतीय या गोष्टींमध्ये फार पूर्वीपासून पारंगत आहेत. जुगाड नावाचा प्रकार भारतातच तयार झालाय हे बोलले तरी वावगं ठरणार नाही. या जुगाडाने भारतीय लोक काहीही करू शकतात.
आता हेच बघा ना उत्तर प्रदेशातील या युवकाने असे काही जुगाड केले आहे की, यामुळे त्याची मोटरसायकल1 लिटर पेट्रोल मध्ये 153 किमी चं एव्हरेज देत आहे. तुमची गाडी किती एव्हरेज देते? फक्त 70 चे ना. यानुसार तर हे एव्हरेज दुप्पटच झाले आहे.
आता तुम्हाला विश्वास ही बसत नसेल की एखाद्या गाडीच एव्हरेज एव्हडं होऊ शकतं. पण हे खरं आहे. अशाच एका जुगाडाला एक टेक्निक मध्ये बदलण्यात आले आहे. आणि आणखी विशेष बाब म्हणजे याला उत्तर प्रदेश कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोबतच एका राष्ट्रीय इन्स्टिटय़ूट ने प्रमाणित केले आहे.
हे जुगाड एवढे स्वस्त आहे की फक्त काही रुपयांमध्ये एक छोटासा बदल करून 153 किमीचं एव्हरेज मिळू शकते. पण तुम्हाला कसे हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर ही माहीती शेवटपर्यंत वाचल्यावर कळेल.
कोण आहे हा माणूस-
हे आहेत उत्तर प्रदेशचे कोशांबी जिल्ह्यातील गुदडी गावचे रहिवासी विवेक कुमार पटेल. ते अनेक वर्षापासून बाईक इंजिनवर काम करत होते. आता कुठे त्यांना यामध्ये यश मिळाले आहे.
काय केले बदल-
गाडीच्या इंजिनमध्ये विवेक कुमार यांनी थोडासा बदल केला. त्यानंतर गाडीचे एव्हरेज जवळपास 153 किमी प्रति लिटर देण्यास सुरुवात केली. विवेक कुठल्याही मोटरसायकलच्या इंजिनमध्ये आपल्या पद्धतीने हलकासा बदल करून त्या गाडीचे एव्हरेज 30-35 किमी. वाढते.
2 संस्थांनी केलं प्रमाणित-
नवभारत टाइम्सनुसार विवेकचा हा जुगाड फक्त एक जुगाडच नाहीये तर ती एक टेक्निक म्हणून पुढे येत आहे. कारण की याला उत्तर प्रदेश कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोबतच एका राष्ट्रीय इन्स्टिटय़ूट ने प्रमाणित केले आहे.
आयडियाला मिळाले आहे अप्रुवल-
रिपोर्ट्सनुसार विवेक या शोधाला मान्यता देण्यासाठी मोतीलाल नेहरू नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या मॅकेनिकल इंजिनीरिंग डिपार्टमेंट मध्ये टेस्टिंग केली. महत्वाची गोष्ट म्हणजे या टेस्टिंग मध्ये हा शोध खरा ठरला आहे.
काय आहे हे तंत्रज्ञान-
या तंत्रामध्ये फक्त कार्बोरेटर ला बदलावं लागतं. विवेक गाडीमध्ये बसवलेले कार्बोरेटर काढून आपले कार्बोरेटर लावतात. यांनातर गाडीचे एव्हरेज चांगलेच वाढते. बोलले जात आहे की यामध्ये फक्त पाच रुपये खर्च येत आहे. मीडियामध्ये आलेल्या माहितीनुसार या तंत्रामध्ये कार्बोरेटर ला सेट केले जाते.
पेटंट साठी केला आहे अर्ज-
यूपीएसटी ने या तंत्राचे पेटंट रजिस्टर करण्यासाठी अर्ज केला आहे. पेटंट झाल्यानंतर याचा व्यावसायिक उपयोग केला जाऊ शकतो. तेव्हाच ही टेक्निक सर्वांसाठी उपलब्ध होईल.
पुढे काय होऊ शकते-
या तंत्रज्ञानाचे पेटंट झाल्यानंतर मोटरसायकल बनवणाऱ्या कंपन्याही ते खरेदी करू शकतात. या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन जास्त मायलेजच्या गाड्या विकून कंपन्या आपला नफा चांगलाच वाढवू शकतात. दुसरीकडे या गाड्या बाजारात आल्या तर पेट्रोलची विक्री कमी होण्यास मदत होईल. 2015 च्या एका माहितीनुसार देशभरात एकूण 15 कोटी मोटरसायकल आहेत. आता दोन गाड्यांच्या बरोबर एव्हरेज एक गाडी देत असेल तर पेट्रोल कंपन्याचे हाल तुम्ही समजू शकता.
बनला आहे स्टार्टअप प्रोजेक्ट-
कटरामधील श्री माता वैष्णवी देवी युनिव्हर्सिटी च्या टेक्नॉलॉजी बिझनेस एक्युबेशन सेंटर विवेक च्या या तंत्रज्ञानाला एक स्टार्टअप म्हणून रजिस्टर केले आहे. यासाठी सेंटरकडून स्टार्टअप प्रोजेक्टसाठी 75 लाख रुपयांची मदत ही मिळाली आहे.
गाडीच्या पिकअप मध्ये नाही पडत थोडा ही फरक-
मीडिया रिपोर्टनुसार यूपीएसटी च्या जॉईंट डायरेक्टर इनोव्हेशन यांनी सांगितले आहे की या तंत्रज्ञानाने पेट्रोल कमी लागतेच सोबत गाडीच्या स्पीड आणि पिकअप मध्ये कुठलाही बदल होत नाही.
काय म्हणतो विवेक-
विवेक ने सांगितले की त्याने या तंत्रज्ञानाचा उपयोग मोटरसायकल, जनरेटर सोबतच अन्य काही गाड्यांच एव्हरेज वाढवण्यासाठी ही प्रयोग केला आहे. यानुसार त्यांना हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जवळपास 2 वर्षाचा कालावधी लागला आहे.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अबब चक्क 4 कोटी 53 लाखाच्या गाडीला मालकांनी जुंपली गाढवं…