सांगली जिल्ह्यात जे सागरेश्वर अभयारण्य उभा आहे ते ज्यांच्या प्रयत्नातून उभा आहे ते धों.म. मोहिते(अण्णा)यांच्यावर साहेबांच खूप प्रेम होतं. साहेबांना या कार्यकर्त्यांचं खूप कौतुक वाटायचं. अण्णांचा मुलगा सु धों मोहिते यांनी मला एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले “संपत, एकदा साहेब कराडला कार्यक्रमास आले होते. त्या कार्यक्रमास अण्णाही गेलेले. कार्यक्रम संपल्यावर अण्णा सहज साहेबांना म्हणाले,
साहेब,माझ्याकड कधी येणार? “आजच जाऊया” साहेब म्हणाले. अण्णा आश्चर्यचकित होत म्हणाले, साहेब गंमत करताय काय? त्यावर साहेब म्हणाले. नाही,आज आपण नक्कीच जायचं हुरडा आला असेल ना? आज हुरडा खाऊया…
मग साहेबांनी अण्णांना गाडीत घेतले. सातारा जिल्ह्यात जे कार्यक्रम होते, ते पूर्ण झाले. मग त्यांची गाडी अण्णांच्या गावाकडे वळली. हा दौरा कोणासही माहिती नव्हता.त्यामुळे गर्दी झाली नाही. फक्त सु.धों आणि एक दोन कार्यकर्ते होते. साहेब मळ्यात आले. त्यांनी बांधावर बसून हरभऱ्याचा हुरडा खाल्ला. अण्णांशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. अनेक विषयांवर चर्चा केली.त्यानंतर साहेब निघून गेले.
या प्रसंगानंतर साहेब पुन्हा एकदा अण्णांच्या मळ्यातल्या वस्तीवर आले होते. साहेब जेव्हा जेव्हा सांगलीच्या दौऱ्यावर आले तेव्हा अण्णांची भेट व्हायची.
अण्णा गेल्यानंतरची गोष्ट
साहेब एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगलीला आलेले.त्यांनी अचानक संयोजकांना सांगितले’मला धों.म.मोहिते यांच्या घरी जायचं आहे’मग कार्यक्रम संपल्यावर साहेबांच्या गाड्याचा ताफा अण्णांच्या घरी आला.साहेबांनी त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा मारल्या. अगदी रानात काय आहे इथपासून ते विहिरीला किती पाणी आहे. हे बारकावे समजून घेतले,उठताना म्हणाले,”पोरांनो तुम्ही माझाकड येत नाही, तुमचं कस चाललंय हे बघायला आलोय. काहीही अडचण आली तर जरूर कळवा”ते ऐकून अण्णांची पोरं गहिवरली.
कोणी काहीही म्हणो पण कार्यकर्ता जोडावा साहेबांनी आणि जपावाही साहेबांनी. साहेब गेल्या महिन्यात कराडला आले होते, तेव्हा अडचणींवर मात करत लढणाऱ्या अविनाश मोहिते यांच्या घरी भेट देत’मी अविनाशच्या सोबत आहे’असा संदेश त्यांनी दिला.नेत्यांवर जीवापाड प्रेम करणारे, नेत्याच्या प्रेमासाठी स्वतःच्या संसाराची फिकीर न करणारे कार्यकर्ते आणि त्यांना विसरणारे नेते आपण पाहिले आहेत. पण कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे साहेब म्हणजे खरोखरच साहेब आहेत.माणसं जोडावी कशी आणि जपावी कशी हे साहेबांच्याकडून शिकण्याची गरज आहे.
कार्यकर्त्यांच्या पश्चातही त्याच्या घरी जाऊन आधार देणारे शरदचंद्र पवार म्हणूनच सगळ्या महाराष्ट्राचे साहेब आहेत. शरदचंद्र पवार साहेब आज सांगली जिल्हातील कुंडल गावी अरुण अण्णा लाड यांच्या सत्कार सभारंभासाठी येत आहेत. त्यानिमित्तानं या आठवणीना उजाळा दिला आहे.
साभार संपत मोरे
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.
शरद पवार या नावाच ज्यांना पित्त आहे त्यांनी जरूर वाचावा असा लेख…