भारताचा मोस्ट वांटेड डॉन दाऊद इब्राहिम ची ब्रिटनमध्ये 42 कोटी रुपयांची संपत्ती जप्त झाल्याची बातमी आहे. दाऊद हा जगातील सर्वात मोठ्या गँगस्टर पैकी एक आहे, ज्याने की अवैध मार्गाने आणि गुन्हेगारी मधून अरबो रुपयांची संपत्ती जमवली आहे. बिझनेस इनसायडर च्या रिपोर्ट नुसार दाऊदची पूर्ण संपत्ती 44 कोटी रुपये आहे.तरीही दाऊद हा जगातील सर्वात श्रीमंत डॉन नाहीये.
पण जगामध्ये दाऊद पेक्षाही श्रीमंत डॉन आहेत, ज्यांची एकूण संपत्ती टॉपच्या अरबपती पेक्षा ही जास्त आहे. चला तर मग जाणून घेऊया जगातील असेच काही प्रसिद्ध अपराधी ज्यांनी या गुन्हेगारी विश्वातून प्रचंड संपत्ती कमावली आहे. हे पण जाणून घेऊया की या श्रीमंत डॉन च्या यादीत दाऊदचा कितवा नंबर लागतो. या यादीमध्ये त्याच गँगस्टरचे नावं आहे ज्यांच्या गँग संघटितपणे आणि सिंडिकेट खाली काम करतात.
बघुयात कोणत्या गँगस्टर ची संपत्ती किती आहे-
1. पैब्लो एस्कोबार
पैब्लो एस्कोबार हे संपत्तीच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत. पैब्लो यांची पूर्ण संपत्ती 30 अरब डॉलर म्हणजेच 2 लाख कोटी रुपये आहे. पैब्लो याना जगातील सर्वात श्रीमंत अपराधी मानले जाते. पैब्लो हे कोलंबिया मधील एक कुप्रसिद्ध ड्रॅग तस्कर आहेत. फॉर्ब्स च्या श्रीमंतांच्या यादीत पैब्लो हे सातव्या स्थानी आहेत. पैब्लो यांचा एकेकाळी जगातील 80% कोकेन व्यवसायावर कब्जा होता.
2. सोलंटसेवसक्या ब्रात्वा
सोलंटसेवसक्या यांची एकूण संपत्ती 57000 कोटींच्या घरात आहे. सोलंटसेवसक्या हे मादक पदार्थांची तस्करी करतात. सोलंटसेवसक्या गॅंग 1980 साली सर्जेई मिखाईलोव यांनी बनवली होती. ही गँग रूसची सर्वात मोठी आणि ताकदवान गुन्हेगारी सिंडिकेट आहे. या गँगचे अनेक गट वेगवेगळ्या देशात कार्यान्वित आहेत. या गँगचे 10 वेगळे ग्रुप आहेत जे की रुस, युक्रेन, हंगरी, युके, साऊथ आफ्रिका आणि फ्रांस सारख्या देशामध्ये ऍक्टिव्ह आहेत. या ग्रुपमध्ये एकूण 9000 मेम्बर्स आहेत. ग्रुपची एकूण प्रॉपर्टी 57000 कोटीच्या आसपास आहे.
3. दाऊद इब्राहिम
या सूचीमध्ये दाऊदचा तिसरा क्रमांक लागतो. दाऊदची एकूण संपत्ती 6.7 अरब म्हणजेच 44000 कोटी आहे. खंडणी, खून आणि तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्यातून दाऊदने ही मोह माया जमवली आहे. दाऊद हा मुंबईमधील बॉम्बस्फोट प्रकरणी भारतातील मोस्ट वॉन्टेड आरोपी आहेत. त्याच्यावर शेकडो लोकांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. दाऊद सध्या पाकिस्तानमधील कराची या शहरात लपून बसलेला आहे.
4. यामागुची गुमी
यामागुची गुमीची एकूण संपत्ती 43000 कोटी रुपये आहे. यामागूची हे जुगार आणि खंडणीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने हारुकीची यामागूची या गँगची स्थापना केली आहे. केनीची शिनोदा या गँग चे अनेक गट पडलेले आहेत. ज्यांना एकत्रितपणे ‘याकूचा’ असे म्हंटले जाते, ज्याचा अर्थ आहे माफिया.
5. ओशोआ ब्रदर्स
ओशोआ ब्रदर्स हे संपत्तीच्या बाबतीत या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहेत. ओशोआ ब्रदर्स यांची संपत्ती 6 अरब डॉलर म्हणजेच 39000 कोटीच्या आसपास आहे. ओशोआ ब्रदर्स हे सुद्धा एक कोकेन तस्कर आहेत. ओशोआ ब्रदर्स हे 3 भावांची जोडी होते, ज्यामध्ये पैब्लो एस्कोबार पण सहभागी होते. 1987 साली फॉर्ब्स ने प्रसिद्ध केलेल्या बीलिनीअर्स च्या पहिल्या यादीत या तिन्ही भावांचे नाव होते. 1991 मध्ये मोठ्या भावाने आत्मसमर्पण केले, त्यानंतर 2 भावांनी ही तोच मार्ग स्वीकारला.
6. खुन सा
सहावे सर्वात श्रीमंत डॉन असणारे खून सा यांची एकूण संपत्ती 5 अरब डॉलर आहे. तिचे भारतीय मूल्य 32000 कोटी रुपये आहे. म्यानमार मधील हे डॉन अफीम आणि शस्त्रास्त्र तस्करीसाठी प्रसिद्ध आहेत. खून सा यांनी 2000 माणसांची स्वतःची आर्मी बनवली होती, ज्याचे ते कमांडर इन चीफ होते. सर्वात शुद्ध हिरोईन विकल्यामुळे त्यांनी जगभरात ड्रग्सचा व्यापार केला.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा अंडरवर्ल्ड मध्ये वापरले जाणारे कोडवर्ड तुम्हाला माहिती आहे का?
मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वेची कहाणी