१८ वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द! अठरा वर्षात कोणत्याही वादात नाही. कोणत्याही भानगडीत नाही. प्रसिद्धीच्या मागेमागे नाही. फक्त खेळ, दुखापत आणि त्यातून सावरत पुन्हा खेळ. असे खेळाडू नक्कीच दुर्मिळ असतात त्यापैकी एक आशिष नेहरा… आज खासरेवर बघूया आशिष नेहरा विषयी काही खासरे माहिती…
३८ वर्ष १८६ दिवस वय असलेला नेहरा आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यामधून निवृत्त होणारा दुसरा सर्वात वयस्कर क्रिकेटर आहे. या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर राहुल द्रविड आहे. द्रविड ३८ वर्ष २३२ दिवसात टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. १९९९ मध्ये कर्णधार अजहरुद्दीनच्या भारतीय क्रिकेट संघातून आशिष नेहराने भारतीय संघात प्रवेश केला. नेहरा आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर २००३ पर्यंत भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज बनला.
आपल्या १८ वर्षांच्या करिअरमध्ये नेहराने १७ कसोटीत ४४ बळी घेतले. १२० एकदिवसीय सामन्यांत १५७ बळी आणि २६ टी -20 मध्ये ३४ विकेट्स घेतले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान, वेगवान गोलंदाज नेहरा आपला वेग, अचूकता आणि लाईन लेंथमध्ये बदल यातून फलंदाजांच्या विकेट घेत असे. पण दुखापतीने त्याला संपूर्ण करिअरमध्ये त्रास दिला.
ग्राहम स्मिथ, युसुफ खान, तिलकरत्ने दिलशान यांनी आशिष नेहरा नंतर क्रिकेट मध्ये पदार्पण केले परंतु त्याच्या आधी हे निवृत्त झाले. दोन एकदिवस सामन्यात सहा विकेट मिळविणारा आशिष नेहरा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. २३ रन देऊन ६ विकेट घेणारा आशिष नेहरा वर्ल्ड कप मधील एकमेव भारतीय गोलंदाज आहे. आशिष नेहराचा आवडता फलंदाज सचिन तेंदुलकर व गोलंदाज वसीम अक्रम हा आहे.
आशिष नेहरा हा मोहम्मद अजहरुद्दीन, एम एस धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत खेळलाय. आशिष नेहरा जेव्हा त्याचा पहिला सामना खेळला होता तेव्हा विराट कोहली हा फक्त १० वर्षाचा होता.
२००३ सालचा विश्वचषक सौरवदादाच्या नेतृत्वाखाली आपण जवळपास जिंकलाच होता पण रिकी पॉंटिंगच्या एका वादळी खेळीने स्वप्नाचा चक्काचुर झाला होता, त्यावेळी झहीर खान भरात होताच पण नेहराने इंग्लडविरुध्द केलेली बॉलिंग कायम लक्षात राहिल. २००३चा वर्ल्डकप मध्ये आशिष नेहराला कोणताही क्रिकेटप्रेमी विसरणार नाही. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा खूप महत्वाचा सदस्य होता. त्याने उपांत्यफेरीमध्ये चांगली गोलंदाजी केली परंतु बोटाच्या दुखीपतीमुळे तो अंतिम सामना खेळू शकला नाही. आशिष नेहराची १९ वर्षांची दैदिप्यमान कारकीर्द आज संपली.
निवृत्तीनंतरही आशिष नेहरा क्रिकेटसोबत जोडलेला राहणार आहे. तो मागास भागांतील मुलांना क्रिकेट शिकवणार आहे. जहीर खानसोबत नेहराने बुंदेलखंडमध्ये याची सुरुवात देखील केली आहे. सेवानिवृत्तीनंतर नेहरा क्रिकेट अकॅडमीवर लक्ष केंद्रित करणार आहे.
आशिष नेहराला पुढील कारकीर्दीस खासरे परिवारातर्फे शुभेच्छा…
क्रिकेटमधील काही ऐतिहासिक फोटो व क्षण,प्रत्येक क्रिकेट चाहत्याने बघायलाच हवे
Comments 1