तुम्ही फ्राईज आणि बर्गर, पिझ्झा आणि पास्ता किंवा भारतात गेलं तर तंदुरी चिकन आणि पनीर टिक्का, भेळ पुरी आलू चाट म्हणा कसे चविष्ट आणि मोहक असतात ना. पण आज आपण जगभरातील काही अशा डिशेस दाखवणार आहोत, ज्या पाहून तूम्हाला रात्रीचं जेवणही करण्याची इच्छा होणार नाही.
प्रत्येक जण नेहमी सांगत असतो की आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून काही तरी करायला हवे, नवनवीन गोष्टी ट्राय करायला हव्यात. खरं तर या डीशेसची यादी पाहीन आपण म्हणाल की जगात अन्न संकट आलं आहे का.
चला तर पाहूया मग, जगातील सर्वात अपमानकारक, अनोख्या आणि विचित्र डिशेस कोणत्या आहेत
1. हकार्ल- शार्कच्या शरीराचे आंबवलेले तुकडे
शार्क हा भयंकर मासा लोक शिकार करून खातात. हे तुकडे आंबवले जातात आणि त्यानंतर मृत जनावरांचे तुकडे खाल्ले जातात. तुम्ही म्हणाल गंमत तर नाही करत आहात ना?
2. फ्राईड ब्रेन सँडविच
लिव्हर आणि किडनी पर्यंत ठीक आहे. पण तूम्ही विचार केला आहे का की ब्रेन चे पण सँडविच असू शकते. अर्धवट डोकं असेल तरी तुम्ही खाणार नाहीत.हे सँडविच मिळते अमेरिकेत.
3. रॉकी माऊंटन ऑईस्टर्स
कॅनडामध्ये मिळणारी ही डिश कशाची आहे याची कल्पना ना केलेलीच बरी. विचार करा तुम्ही जेवण ऑर्डर केलं आणि तुमच्या समोर माणसाच्या शरीराचे भाग असलेली प्लेट आणून ठेवली तर? तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी परत कधीही जाण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत.
4. ड्राइड लिझार्ड (सुखी पाल)
आपण साधं आपल्या घरातील भिंतीवर पाल असेल तरी तिला थांबू देत नाहीत, तर जेवणाच्या ताटात ती आपल्याला जेवायला वाढली तर काय होईल याचा विचार न केलेलाच बरा. ही डिश तुम्हाला चीनमध्ये मिळेल.
5. किड्यांचे चॉकलेट
आपल्याला फक्त चॉकलेटच आवडत असते. आपण त्यात काही फळे किंवा अजून काही टाकलं तरी खात नाहीत. मग पोलंडमध्ये मिळणारी ही डिशचा विचार पण डोक्यात अनु नका. कारण ही आहे किड्यांनी भरलेली चॉकलेट डिश.
6. टूना आयबॉल
जपान मध्ये हि दिश प्रसिद्ध आहे जपानी लोक हे चवीने खातात. जपानमध्ये मिळणारी ही डिश बघितल्यावर कोणीही टेस्ट करायची इच्छा पण व्यक्त करणार नाही.
7. फ्राईड ग्रासहॉर्पर
ही डिश तुम्हाला थायलंड मध्ये मिळेल. चीन आणि थायलंड मध्ये ही हिरव्यागार प्राण्यापासून बनवलेली डिश अत्यंत लोकप्रिय असल्याचे बघायला मिळेल. पण तूम्हाला हे पाहून प्रश्न पडेल की हे कसं शक्य आहे?
8. ड्रंकन चिम्पांझी
चीनी लोक काहीही खातात हा फोटो बघून तुम्हाला विश्वास बसेल. चीनमध्ये खरच या जेवणातील वेगवेगळ्या डिश अत्यंत भयानक आहेत. चिनी लोकं कसं हे खात असतील हा प्रश्न पडतो.
9. भाजलेले उंदीर
चीनमध्ये लोकप्रिय असणाऱ्या या डिश पाहून मी तर ठरवलं आहे की मी कधीच चीनमध्ये जाणार नाही. एवढ्या भयानक डिशेस कुठे असतात का? उंदीर कुणी भाजून खातं का?
10. सन्नाकजी- कच्चे ऑक्टोपस
जिवंत ऑक्टोपस बापरे हो खरं आहे की ऑक्टोपस खूप चविष्ट असतात खायला पण कच्चे? ते खूप चिकट, लज्जतदार आणि रबरासारखे असतात खायला. कच्चे खाण्याचा विचार करू शकता का तूम्ही?
11. बर्ड नेस्ट सूप
एखाद्या पक्षाचे घरटे खाण्यालायक ? तुम्हाला या डिश बद्दल आश्चर्य वाटेल पण सांगू इच्छितो की यामध्ये पक्षाचे मास नसते तर पक्षांची कडक झालेली लाळ पासुन ही डिश बनवतात.
12. फ्राईड स्पायडर
तुम्ही मला सांगा कधी कोणी स्पायडर(कोळी) खाण्यासाठी पैसे देईल का? पण कंबोडिया मध्ये लोकं फ्राईड स्पायडर ची ही डिश आवडीने खातात. इथे आपण स्पायडर ला घाबरतो खाणे तर दूरची गोष्ट.
13. खाश- मेंढीचे उकळलेले पाय-
मेंढीचे खुर ते हि उकडलेले खाश हि दिश खूप प्रसिद्ध आहे जगातील काही भागात, ही डिश पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की कुणी उलटी केली की काय? आणि तुम्ही पाय का खाल? तेही मेंढीचे.
14. बलुट उकडलेले बदकाचे गर्भ
हा फोटो पाहून तुम्हाला एकच गोष्ट सांगु शकतो ही गोष्ट बिल्कुलच खाण्याच्या लायकीची नाहीये. यामध्ये बदकाचे अंडे अर्धे उकडलेले लोक आवडीने खातात.
15. याक पेनिस
चीनमध्ये ही डिश तुम्हाला मिळेल. ज्यामध्ये याकचे पेनिस फ्राय करून तुम्हाला खायला देण्यात येते. तुम्हाला 100 डॉलर दिले तरी तुम्ही ही डिश खायला नाही म्हणाल.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
तारुण्य टिकवायला काही सोपे घरगुती उपाय नक्की वापरा..