भारताच्या इतिहासात अनेक असे राजे महाराजे होऊन गेलेले आहे ज्यांच्या विषयी फार कमी लोकांना माहिती आहे. इतिहासातून यांचे नाव पुसट झालेले आहे परंतु आज हि पाकिस्तान मधील रावलपिंडी शहराचे नाव निघाल्यास आठवण येते ती एकमेव हिंदू राजा ज्याला मुघल थरथर कापायचे बाप्पा रावल यांच्या विषयी आज खासरेवर काही माहिती बघूया..
छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राज दाहीर इत्यादीचे नाव तुम्हाला नेहमी ऐकायला मिळतात परंतु वीर बाप्पा रावल असे राजे आहेत ज्यांच्या विषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल कि बप्पा रावल असे हिंदू राजा होते, ज्यांचे नाव ऐकताच क्षत्रुचे हातपाय थंडे पडत असे. इसवी सन ७३४ मध्ये जेव्हा भारतावर अरबाननि आक्रमण केले तेव्हा भारतातील राजस्थानमध्ये बप्पा रावल हा वीर योद्धा जन्मास आला ज्याने अरबांना धूळ चारून वापस हाकलले होते. बप्पाची एवढी दहशत होती कि त्यानंतर ४०० वर्ष मुघलांनी भारताकडे ४०० वर्ष डोळे उचलून सुध्दा बघितले नाही.
बप्पा रावल यांचे वडील महेंद्र रावल यांची क्षत्रुने हत्या केली होती ज्यामुळे त्यांची आईसुध्दा वडिलासोबत सती गेल्या. लहानपणीच आई वडिलाचे छत्र हरविल्याने बप्पांचे पालन पोषण इतरांनि केले. बप्पा एकलिंगजी चे मोठे भक्त होते. समस्त युध्द प्रकारात ते निपुण होते. ज्यामुळे बप्पानी त्यांच्या पासून गेलेले राज्य २१व्या वर्षी वापस मिळविले आणि एक कुशल शासक म्हणून राहिले.
बप्पांनी अरब,तुर्की, फारसी परदेशी आक्रमण करणाऱ्या टोळ्यांना अनेकदा धूळ चारली होती. यामुळे बप्पाची एवढी दहशत निर्माण झाली कि मुघलांनी ४०० वर्ष भारतात पाय ठेवला नाही. मेवाड वंशाचे संस्थापक, काल्भोज चे राजकुमार “बाप्पा रावल” हे वीर हिंदू राजा होते. ज्यांना शिवाची एकलिंग रुपाची भक्ती आणि चित्तोडच्या किल्ल्याच्या निर्माण करण्याकरिता ओळखल्या जाते.
भारतात ह्या राजाबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही हि गोष्ट दुखदायक आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल कि पाकिस्तान मधील रावलपिंडी ह्या शहराचे नाव बाप्पा रावल यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. या अगोदर तो गजनीचा प्रदेश म्हणून ओळखल्या जात असे. गजनीच्या प्रदेशात बाप्पाच्या सैनिकाची छावणी होती जेथून ते अरबांच्या गतीविधी वर लक्ष देत असे. मेवाड मध्ये यांना बापा म्हणून सुध्या ओळखल्या जाते.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा शिवाजी महाराज आणि समुद्रशास्त्र विषयी उत्तम लेख नक्की वाचा…