आर्टिफिशियल इन्टेलीजेन्स हा शब्द आपण नेहमी एकत असतो. बिना ड्रायव्हरची गाडी आपण बघितली असेल हि गाडीसुध्दा आर्टिफिशियल इन्टेलीजेन्स द्वारे चालविल्या जाते. आता हे तंत्र आपल्या दैनदिन जीवनात हि येणार आहे. असाच एक रोबोट आज खासरेवर बघूया जो करतो चक्क देवाची आरती…
हिंदू धर्मात बिना पूजा आणि आरती कुठल्याही देवाची प्रतिष्ठापना पूर्ण होत नाही. हे सर्व पंचागात सांगितलेल्या विधीनुसार पूर्ण होतात. परंतु यातही आता डिजिटल टेक्नोलॉजीचा वापर करून हि प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येत आहे. खाली दिलेल्या विडीओमध्ये आपण बघू शकता कि रोबोट कसा आरती करतो.
मंदिरामध्ये रोबोट द्वारा आरती ऑटोमेशनचा एक हिस्सा मानल्या जात आहे, ज्याने आपल्या आयुष्यात एक स्थान बनविले आहे. या विडीओ मध्ये अनेक लोकामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. हा विडीओ पुणेमधील आहे. येथील एका मंदिरात आरती करिता रोबोट वापरण्यात आला. या रोबोटची निर्मिती पुणे येथील कंपनी पाटील ऑटोमेशन प्रायवेट लिमिटेड PAPL द्वारा तयार करण्यात आली आहे.
तसाच एका विडीओमध्ये अच्युतम केशवम दामोधरम या गाण्यावर आरती करतानासुध्दा एक विडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे. हा विडीओ वेल्डिंग लाईन करिता बनविण्यात आला होता परंतु याद्वारे आरती सुध्दा करण्यात येत आहे.
हा विडीओ बघितल्यावर तुम्हाला विश्वास होईल कि आता ऑटोमेशन फक्त इंजिनियरच्या कामा पर्यंत नाही तर दैनदिन जीवनात हि कामी येणार आहे. मुख्य प्रश्न हा आहे कि ऑटोमेशन द्वारे आरती तर होईल परंतु भक्तीभाव मनात राहील काय ?