आसाममधील बोडो अतिरेक्यांच्या हृदयात धडकी भरवण्यास संजूक्ता पराशर हे नाव पुरेसे आहे. या बहादूर आईपीएस अधिकाऱ्याने मागच्या 15 अहिन्यात 16 अतिरेक्यांना यमसदनी पाठवले आहे तर 64 अतिरेक्यांना अटक केली आहे.
2006 च्या बॅच च्या बहादूर आयपीएस अधिकारी संयुक्ता पराशर या आपल्या धैर्य आणि साहसामुळे नेहमी प्रकाशझोतात असतात. बोडो अतिरेक्यांविरोधात त्या अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरी व्यतिरिक्त त्या आसामच्या पहिल्या महिला आयपीएस आहेत. AIR 85 रँक मिळवून त्यांनी आपल्या आवडत्या म्हणजेच पोलीस सेवेत प्रवेश केला. त्या पोलीस सेवेत दाखल झाल्यापासून आसाममधील अतिरेक्यांना आणि गुन्हेगारांना एक कुस्वप्नच बनल्या आहेत.
संयुक्ता यांचे प्राथमिक शिक्षण आसाममध्येच पूर्ण झाले आहे आणि त्या इंद्रप्रस्थ विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयाच्या पदवीधर आहेत. त्यानंतर त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून स्नातक पदवी मिळवली.
चला तर जाणून घेऊया या बहादुर अधिकाऱ्यांविषयी काही माहिती नसलेल्या रंजक गोष्टी-
1. लहानपणापासून संजूक्ता याना खेळांमध्ये रुची होती. त्यांनी आपल्या शालेय जीवनात अनेक क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. त्यांनि पोहणेही शिकले आहे व त्या नाटकामध्ये ही भाग घेत असत.
2. 2006 सालच्या आयपीएस अधिकारी पराशर याना 2008 मध्ये प्रथम आसाम मध्ये माकूम येथे सहायक कमांडंट म्हणून नियुकी मिळाली.त्यानंतर लगेचच त्यांना बोडो अतिरेकी आणि अवैध बांगलादेशी घुसखोरांदरम्यान होणाऱ्या संघर्षाला मिटवण्याची जबाबदारी मिळाली.
3. 15 महिन्यात 16 अतिरेक्यांना ठार आणि 64 जणांना अटक केल्याबद्दल त्या सर्वत्र खूप चांगल्या ओळखल्या जातात. त्यांनी अनेक वेला शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्याची कारवाई केली आहे.
4. संजूक्ता यांनी दिल्ली विद्यापीठातील आय.पी. कॉलेज मधून राजकारणात पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय संबध या विषयात आपले मास्टर पदवीचे चे शिक्षण पूर्ण केले. एवढेच नाही तर त्यांनी एम फिल नंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात पीएचडी ही मिळवली आहे. त्यांना आपण अभिमानाने डॉ. संजूक्ता म्हणू शकतो.
5. संजूक्ता यांनी आसाममधील एका आयपीएस अधिकाऱ्याशी विवाह केला. देशसेवा बजावणारे हे जोडपे कधी कधी महिनाभर ही भेटत नाही.
6. कामच्या धावपळीत संजुक्ता तिच्या मुलाची काळजी घ्याला विसरत नाही. संजूक्ता यांना एक चार वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांची आई मुलाची काळजी घेते.
7. दहशतवादग्रस्त भाग असलेल्या सोनितपुर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून काम बघताना त्या सीआरपीएफ च्या जवानांच्या तुकडीचेही नेतृत्व करतात आणि त्या एक अत्यंत कठोर अधिकारी म्हणून त्यांची बोडो अतिरेक्यांमध्ये दहशत आहे.
8. आयपीएस अधिकारी असून सुध्दा त्यांचा स्वभाव नम्र आहे. त्या एक अत्यंत नम्र आणि प्रेमळ व्यक्ती आहेत. त्या म्हणतात फक्त गुन्हेगारानीच त्यांना घाबरावे.
9. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून काम बघताना त्या छावन्यामध्ये आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या व्यक्तींना भेटतात व विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांना त्या चॉकलेट ही वाटतात.
10. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड(एनडीएफबी) बऱ्याच वेळा धमक्याही मिळाल्या आहेत. पण यामुळे त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वावर थोडाफारही परिणाम झाला नाही.
खासरे कडून या आयपीएस अधिकारी संजूक्ता पराशर यांच्या कर्तुत्वाला सलाम. माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: अभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी…
वाचा: निम्म्याहून अधिक पगार गरजूंना दान करणारे दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे…