बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. शिवदीप लांडे हे या आधी बिहारमध्ये कार्यकरत होते. त्यांची काम करण्याच्या स्टाईलमुळे ते सर्वत्र दबंग अधिकारी म्हणून प्रसिध्द झाले. आज आपण खास्रेव्र शिवदीप लांडे विषयी काही खासरे माहिती बघूया…
शिवदीप लांडे यांनी बिहारमधील अतिशय धोकादायक समजल्या जाणाऱ्या भागातही सर्व प्रकारच्या माफियांना सळो की पळो करून सोडले होते. शिवदीप लांडे हे मराठी असले तरी त्यांच्या कार्यामुळे ते बिहारमध्ये सर्व सामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. लग्ना अगोदर शिवदीप आपल्या पगारातील ६०% हिस्सा हा सेवाभावी संस्थेस दान करत असे. आत्ताही त्यांनी हे कार्य सुरु ठेवले आहे.
आयपीएस शिवदीप लांडेचा जन्म महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात झाला. शिवदीप हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावचे रहिवासी आहेत. त्यांना रोज शाळेत जाण्याकरिता ४ किमि एवढी पायपीट करावी लागत असे. दोघा भावातील शिवदीप हे थोरले आहे. इंजिनियरिंगच्या पदवी नंतर शिवदीप यांनी मुंबईत प्राध्यापक म्हणून काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांनी युपीएससीची तयारी सुरु केली. २००४ साली त्याची IRS म्हणून निवड झाली आणि २००६ साली ते IPS झाले. शिवदीप शेतकरी कुटुंबातील आहेत, त्यांची आई गीताबाई सध्या अकोला जिल्हा परिषदेत सदस्य आहेत.
युट्युबवर आपण त्यांचे अनेक विडीओ बघू शकता. शिवदीप लांडे यांनी अनेकदा वेशभूषा बदलून सत्य बाब समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पहिली पोस्टिंग बिहारच्या जमालपूर जिल्ह्यातील मुंगेर येथे झाली. त्यानंतर त्यांना पाटणा शहरात पोलिस अधीक्षकपदी नेमण्यात आले. पटना येथील त्यांच्या कार्यकाळात ते संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले तिथला गुन्ह्यांचा दर हा जबरदस्त कमी झाला होता. बिहारमध्ये मुलींना छेडछाड जास्त प्रमाणात चालायची रोडरोमिओ करता शिवदीप लांडे कर्दनकाळ होते. प्रत्येक मुलीकडे त्यांचा नंबर होता तक्रार होताच प्रकरण निकाली लावण्यात येत असे. लांडे यांनी तेथील गुंडगिरी, अवैध व्यवसाय, बेशिस्त वाहतूक, टपोरी युवकांच्या टोळ्या मोडून काढल्या.
Times Of India च्या एका बातमीनुसार शिवदीप यांना रोज मुलींचे लग्नाचे किंवा प्रेम व्यक्त करण्याचे ३००च्या वर मेसेज येत असे. त्यांचे लग्न २ फेब्रुवरी २०१४ मध्ये महाराष्ट्राचे मंत्री विजय शिवतारे यांची मुलगी ममता हिच्या सोबत झाले. शिवदीप लांडेयांच्या बदलीनंतर बिहारमधील लोक रस्त्यावर उतरले होते अनेक मोर्चे निघाले. त्यांना बदलीच्या ठिकाणी निरोप देत असताना रस्त्याच्या बाजूला 3 किमी पर्यंतची रांग लागली होती.
रोहतास येथील अवैद्य खाणीवर कार्यवाही करण्याकरिता गेले असता शिवदीप लांडे आणि त्यांच्या टीमवर स्थानिक माफियांनी गोळ्यांचे ३०० राउंड झाडले. येवढे होऊन सुद्धाही शिवदीप लांडे यांनी न भिता स्वतः जेसीबीमध्ये बसून स्वतः पहिले युनिट पाडले. एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यास पकडण्याकरिता शिवदीप मुलीचा पेहराव घालून गेले आणि त्याला चांगलाच धडा शिकवला.
महाराष्ट्राच्या या सुपुत्रास खासरेचा सलाम.. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा मोक्षदा पाटील खान्देश कन्या ते पोलीस अधीक्षक…
अभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी…