सत्तरी च दशक होत ते….पूर्वीचा निषानेबाज राज्य वर्धन सिंह राठोड यांच्या जन्म जानेवारी महिन्यातील २९ तारखेला १९७० रोजी झाला. एकाच वेळी माणूस,एकाच जन्मात इतके काही करू शकतो हे राज्य वर्धन सिंह राठोड यांनी समाजसेवा तसेच देशसेवा करून दाखवून दिले. खरच राज्य वर्धन सिंह राठोड म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. खासरेवर आज त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकूया…
नुकत्याच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक मंत्र्याना नाव नवे मंत्रालये, खाते प्राप्त झाले त्यात अवघे ४७ वय वर्ष असलेले राठोड याना ‘खेल मंत्रालय’ तसेच ‘युवक कल्याण’ मंत्रालय हाती लागले. राठोड हे उर्जावान, तडफदार, बहुरंगी, अष्टपैलू, कर्तृत्ववान, व तेजस्वी असे व्यक्तिम्त्व तर आहेतच. तसेच ते आमच्या सारख्या लाखो, करोडो तरुणांचे प्रेणास्रोत सुद्धा होऊ शकतात.
जर आपण राठोड यांचे पूर्वीचे आयुष्य जर बघितले तर ते लाखो करोडो तरुणाईला प्रेरणादायी तसेच जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करू शकतात. एका छोटया शहरातील व्यकती पुढे जाऊन जगात काय काय करू शकते, आपले व्यक्तिमत्व कसे घडवून आणतो व आज देशाचा खेळ मंत्री कसा बनतो हा प्रवास अत्यंत रोचक व स्फर्तिदायी आहे राठोड यांचे बालपण राजस्थानमधील जैसलमेर येथे गेले. बिकानेर,जैसलमेर येथे त्यांचे प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षण पूर्ण झले. पुढे जाऊन त्यानी “NDA”मध्ये जाण्याचा निर्णय घेतला पण त्या आधी लहानणापासूनच क्रिकेट ची आवड असलेला राज्यवर्धन पुढे जाऊन क्रिकेट चे धडे घेत जातो.
मोठा क्रिकेटर बनणार असतो त्याला संधी हवी असते आणि एके दिवशी तो खरोखरच मोठा क्रिकेटर बनतो. मध्यप्रदेश क्रिकेट संघाकडून त्याची रणजी ट्रॉफी साठी निवड होते त्यावेळी त्याचे वय असते अवघे १६ ते १८ वर्ष आणि बस्स ! राज्यवर्धन साठी टीम इंडियाचा दरवाजा म्हणजे अगदी समोरची पायरी असते. पण आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते हे अगदी खरं म्हटलं आहे मित्रानो ! पण नियाती च्या मनात काही औरच असत. राज्यवर्धन सिंग राठोड हा हार मानणाऱ्यातून नवता. तसेच त्याच्या आईचा वीरोध व त्या वेळची एकुण परिस्थिती राठोड यांच्या बाजूनी नसल्यामुळे क्रिकेट ह त्यांच्यासाठी नुसता खेळ राहून गेला. पण राठोड यांच्या नशिबात काही औरच लीहील होता.
अजुन तर गरुडानी झेप सुद्धा घेतली नव्हती. पण डोळ्यातील आत्मविश्वास व मनगटातील ताकत त्यांच्या या प्रवासाला,खूप पूढे पर्यानता नेंनार होता! हे नक्कीच! शिवाय त्यांचे वडील” कर्नल लक्ष्मण सिंह राठोड” हे भारतीय सैन्यदलात होते. तसच आई शिक्षिका होती. मित्रांनो यातूनच त्यांच्या घरी संस्कार कसे असतील,दिले गेले असेल याचा अंदाज आपण लवु शकतो. शिस्तप्रिय, संस्कारी, आदरयुक्त, मातीशी जुळलेले लोक, हे सगळे गुण त्यांच्यात आहेतच. पुढे राठोड NDA पुणे येथून शिक्षण, योग्य प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्यदलात रजू होतात. तसेच सन १९९० च्य काळात ते “मेजर राज्यवर्धनराठोड”ही जबाबदारी पार पाडतात सैन्य दलातील प्रशिक्षण,शिबिर यामुळे राठोड यांचे वक्तीमतव विकसीत होत असते.
दरम्यानच्या काळात भारतातील विविध छोटया मोठया भागात जाण्याची राठोड यांना संधी मिळते. भारतातील विभिन्न जाती, प्रदेश,विचार, संस्कृती, हवामान,पाणी याची खरी ओळख त्यांना सैन्यदलतील कळतंच होते. तसेच “देशसेवा सर्वोच्च सेवा”हा त्यांचा बाणा म्हणजे पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची अजुन एक बाजु आपल्याला दिसून येते. पहाडी भागात काम करताना कधी बर्फात, कधी वाळवंटात,उन, वारा,पाऊस,याची पर्वा न करता, राठोड डोळ्यात तेल ओतून शत्रूशी समर्थपणे सामना करण्यास सदैव तयार असत. तसेच १९९९ च्या कारगिल युध्दात सुद्धा राज्यवर्धन सिंह राठोड यांचा सहभाग होता हे विशेष.
काश्मीर मधील आतंकवाद्यांशी झुझ देताना त्यांनी आक्रमक कामगिरी बजावली. त्यातच त्याची ओळख झाली ती बंदुकी आणि निशाणीशी. भारतीय सैन्यदलातील हा जवान पुढे वडिलांच्या पायावर पाऊल ठेवत कर्नल राज्य वर्धन सिंह राठोड झाला त्यांनी आपल्या निशाणीची छाप संपुर्ण सैन्यदलात दाखवून दिली त्याबद्दल सैन्या तर्फे त्यांना पुरस्कार देखील देण्यात आला होता. तेथेच त्यांना त्यांच्या अर्जुनाची ओळख झाली. आणि पुढे राज्य वर्धनने स्वतःला ओळखले व त्याने निशनेबाज होण्याचा निर्णय घेतला. तेथून त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली व राठोड यांच्या एका सोनेरी आयुष्याची सुरुवात झाली.
पुढे त्यांनी अतो:नात मेहेनत करून अनेक स्पर्धंमध्ये भाग घेत घेत वर्ष उगवले २००४ अथेन्स ओलंपिक त्यातून त्यांनी पुरुष दुहेरी मध्ये रजतपदक मिळवून भारताची शान वाढावली. त्या दिवशी भारताची शान संपूर्ण जगात वाढवण्याच काम राठोड यांनी केले. भारताला एक नवा सुपरस्टार त्या दिवशी भारतातील असंख्य अशा खेळाडुना व तरुणांना मिळाला. बस्स एक मॅच! बस्स एक! आणि अतो:नात मेहनीत त्यांचे नशीबच पालटुन गेली.
पुढे त्यांनी आशिया कप, कॉमनवेल्थ गेम्स व बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बरीच पदक भारताच्या नावावर जिंकून दीली. पुढे जाऊन त्यांना पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न, अर्जून असे नामांकित पुरस्कार मिळाले.
२०१३ मध्ये सैन्यदल व खेळातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. आणि वर्ष उगवले २०१४ हे वर्ष पुन्हा राठोड यांच्या जीवनात नवी कलाटणी आणून गेले. १४व्या लोकसभा निवडणुकीत राठोड हे भारतीय जनता पक्षातर्फे राजस्थानातून ग्रामीण भागात खासदार म्हणुन उभे राहिले व निवडून सुध्दा आले. आणि नवी मॅच त्यांचा जीवनप्रवासात सुरू झाली. आज त्यांच्यकडे माहिती प्रसारण, युवक कल्याण,व खेळ ही ही खाते आहे.
आज सर्वदुर भारता मधे अनेक, ऐका पेक्षा एक, चांगले खेळाडू आहेत. आणखीनही छोट्या छोट्या गावांमधून तयार होत आहे. तरीही त्यांना आवश्यकता आहे ती संधींची. त्यातूनच खेळाडूंचे उद्याचे स्वप्न पुर्ण होऊ शकते. उद्याच्या सोनेरी किरणांचा प्रकाश राठोड यांनी टाकावा ही राठोड यांच्या कडून अपेक्षा!
आज खेळ मंत्रलयाचे वार्षिक बजेट एकुण १९४४ कोटी ₹ इतके आहेत. त्यातूनच आजी माजी, खेळाडूंचे भवितव्य व वर्तमान तयार होत असतात विविध संस्था जसे NADA,तसेच डोपिंग संबंधी NDTL, तसेच स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातील आढवा व बैठकी सुरळीतपणे पार पाडाव्या याची अपेक्षा राठोड यांच्या कडून आहे. खेळाडूंचे देशांतर्गत व आंतरराष्ट्रिय दौरे, ओलंपिक दौरेची तयारी करणारे खेळाडू तसेच त्यांच्या जीवनाला दिशा, स्थिरता, आनंद, नेतृत्व देण्याचं काम राठोड सरांनी करावं बस एवढीच एक अपेक्षा….
साभार:- कपिल जोशी
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा अरब देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व यांच्यापुढे अंबानीची संपत्ती आहे चिल्लर…
वाचा भारताला ऑलम्पिकसहित पाच अंतराष्ट्रीय किताब मिळवून देणारा “गुंगा पहलवान”