आजकाल प्रत्येक जण स्वतःचा काही तरी बिझनेस चालू करू इच्छितो पण प्रत्येक जण असं नाही करू शकत. अशात नोकरी करणे हा शेवटचा रस्ता असतो. नोकरीमध्ये ही चांगल्या पगाराची अपेक्षा प्रत्येक व्यक्ती करत असतो. पण प्रत्येक व्यक्तीला चांगल्या पगाराची नोकरी मिलेलंच असं नाही. पण काही व्यक्ती चांगला पगार मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे धोकादायक मार्ग स्वीकारतात.
आज आम्ही आपणास काही अशा नोकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये धोका खूप आहे पण पगार वाचून तुम्ही थक्क व्हाल.
धोकादायक नोकऱ्या-
1. कमर्शियल डाइवर्स-
पाण्यामध्ये जाऊन फोटोग्राफी पासून काही दुरूस्तीचे काम असो किंवा काही विस्फोटक लावण्याचे काम असो, हे खूप धोकादायक असतात. आणि या कामांना पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना कमर्शियल डाइवर्स म्हणतात. हे कामं पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप पैसे मिळतात. काही रिपोर्ट्सनुसार कमर्शियल डाइवर्सची वर्षभराची कमाई ही 30 ते 40 लाख असते.
2. ऑइल वेल ड्रीलर-
हे काम अत्यंत अडचणींनी भरलेले असते. तेल काढणे ऐकायला जेवढे सोपे वाटते तितके ते सोपं नाहीये, ते खूप कठीण काम आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ड्रीलर्स ना खूप वेळ काम करावे लागते आणि त्यांना अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो. ऑइल वेल ड्रीलरची वार्षिक कमाई ही 30 ते 40 लाख रुपये असते.
3. एअरक्राफ्ट मैकेनिक-
हे काम खूप आव्हानात्मक असते. विमानाच्या इंजिनाचे निराकरण अनेक धोके असतात, मैकेनिकला खूप धोक्यांचा सामना यासाठी करावा लागतो आणि एका चुकीमुळे जीव जाण्याचीही शक्यता असते. एअरक्राफ्ट मैकेनिकचा वार्षिक पगार 30 लाखांपासून 40 लाखांपर्यंत असतो आणि या क्षेत्रातल्या अनुभवी आणि कुशल कामगारांची पगार 45 लाखांपेक्षा ही अधिक असते.
4. लोकोमोटिव इंजिनीअर-
लोकोमोटिव इंजिनीअरचे काम प्रामुख्याने रेल्वेच्या इंजिनची दुरुस्ती, देखभाल किंवा नवीन इंजिन बनवणे असते. या धोकादायक कामामध्ये वार्षिक पगार 35 लाख रुपये आहे.
या आहेत जगातील 4 सर्वात धोकादायक नोकऱ्या ज्यामध्ये जीव जाण्याचा धोका ही असतो.
तुम्हाला ही माहिती आवडल्यास कंमेंट करा, शेअर करा आणि पेज अवश्य लाईक करा.
वाचा: नोकरी न सोडण्यासाठी मिळाले 305 कोटी रुपये, हा आहे Google चा सर्वात शक्तीशाली भारतीय
वाचा: सरकारी नोकरीचा सोडून शेतीद्वारे कोट्यावधी रुपये कमावणारा तरुण..
वाचा: रोजंदारी महिना १५०० ते वार्षिक उलाढाल १० कोटी, नांदेडच्या युवकाचा थक्क करणारा प्रवास…