तुमच्या शरीरातील दुखणे हे नेहमी वयानुसार वाढत असते परंतु याचा कधी विचार केला का हे का बर होत असेल ? एखाद्या दिवशी तुम्ही दुखी असाल तर तुमचे शरीर सुध्दा बरोबर साथ देत नाही ही गोष्ट अगदी सामान्य आहे. परंतु आपण याचा कधीच खोलवर विचार करत नाही. तुमच्या मनात कशाचे शल्य असेल किंवा अगदी ताण असेल तर तुमच्या शरीरावर सुध्दा परिणाम होतो. कारण आपल्या शरीरात नेमके दुखणे कुठे आहे याचा विचार आपण करत नाही. शरीरातील दुखणे हे तुम्हाला काहीना काही इशारा देतात परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करतात.
तर खासरेवर जाणून घेऊया तुमच्या शरिराचं दुखणं नेमकं तुम्हाला काय सांगत असतं….
१) डोक्याचं दुखणं
जर तुम्हाला सततची डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर त्याला कारण आहे तुमच्यावर असलेलं स्ट्रेस म्हणजे ताण. त्यामुळे थोडा ताण बाजूला करता आला तर डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी होईल. त्यामुळे अशावेळी थोडं शांत बसा आणि रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा. जेणे करून ताण कमी करून तुमची डोकेदुखी कमी होईल.
२) नाकं दुखणे
जर तुमचं नाकं दुखत असेल तर हे दुखणं साधं नाही. तुम्हाला वाटत असेल की नाकात काही तरी त्रास आहे. पण तुमच्या नाकात अशी गोष्ट दडली आहे जी जाणं कठिण आहे. मानसिकदृष्टया पाहिलं तर तुमच्या मनात काही तरी दडलं आहे. समोरच्या व्यक्तीला माफ करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टी किंवा त्रास देणाऱ्या गोष्टी विसरून जा. त्यामुळे अशी एखादी घटना घडली तर तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी आठवा जेणे करून तुमचा त्रास कमी होईल.
३) खांदे दुखणे
आपल्याला अनेकदा वाटतं की खांदे दुखी ही एखादं वजन उचलल्यामुळे होत असेल तर असं अजिबातच नाही. फक्त ठोबळमानातील वजन नाही तर तुम्ही भावनिकदृष्ट्या जरी एखादं वजन अंगावर झेललं तरी त्याचा ताण जाणवतो. त्यामुळे अशावेळी व्यक्त होणं हा एक उत्तम पर्याय आहे. कारण बऱ्याचदा असं वाटतं की, जगातलं सर्व ताण आपल्या खांद्यावर आलं आहे.
४) पाठं दुखणे
अनेकदा असं असतं की पाठं दुखतं असेल तर पाठीवर प्रचंड वजन आपण घेतलं आहे. पण हे वजन प्रत्येकवेळी वस्तूनिष्ठ असेलच असं नाही तर ते भावनिक देखील असू शकतं. अशावेळी ही गोष्ट स्पष्ट असते की तुम्ही कुणावर तरी अवलंबून राहण्याचा विचार करत आहात. त्यामुळे अशा परिस्थितीत लवकरच तुम्ही या सगळ्याचा विचार करा.
५) कंबरेखाली दुखणे
कबंरेखालचं दुखणं हे तुमच्यातील फायनान्शिअल चिंता स्पष्ट करते. त्यामुळे अशावेळी बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे बोला आणि मोकळे व्हा. त्यामुळे कुणीही पैशाची चिंता त्याच्या अंगा खांद्यावर फार काळ घेऊ शकत नाही. अशा वेळी तुम्ही याची काळजी घ्या.
६) हात दुखणे
हात दुखण्यामागचं कारण जाणून घ्याल तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तुम्ही एखाद्यापर्यंत पोहोचण्याचा पर्यत्न करत असाल पण तो मार्ग जर चुकीचा असेल तर त्यामुळे हमखास हात दुखण्याची समस्या जाणवू शकते. त्यामुळे काही तरी वेगळा पर्याय निवडा. अशावेळी थोडं स्वतःच्या कोशातून बाहेर पडा. आणि नवे मित्र बनवा जेणे करून तुम्हाला रिलॅक्स वाटेल.
७) कंबर दुखणे
कंबर दुखण्याचा अर्थ असा की तुम्ही कशाला तरी घाबरत आहात. तुम्हाला बदल हवा आहे पण तुम्ही तो नाकारताय. कोणती तरी गोष्ट स्विकारायला तुम्ही नाकारता आहात. पण तो बदल स्विकारायला तयार व्हा. त्यामुळे चुकीच्या आणि खराब गोष्टींचा विचार करू नका. जे आहे ते स्विकारायला शिका.
८) गुडघे दुखणे
आश्चर्य वाटेल पण तुमचा इगो हा तुमच्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला गुडघे दुखीचा त्रास जाणवेल. गुडघे दुखी म्हणजे तुम्हाला स्वार्थी होणं थांबाव लागेल आणि स्वतःबरोबरच इतरांचा विचार देखील करावा लागेल. स्वतःला खूप विनम्र करण्याचा पुरेसा प्रयत्न करा.
९) पोटऱ्या दुखणे
पोटऱ्या दुखण्यामागचं कारण म्हणजे तुमच्यामध्ये असणारा मत्सर. जर तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा दुरच्या व्यक्तीबद्दल काही चुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला हा त्रास भयंकर जाणवतो. त्यामुळे सगळ्यांशी बोलून चालून कनेक्ट राहा. आणि या त्रासा पासून दूर व्हा.
१०) पाय दुखी होणे
तुमच्या मनातील डिप्रेशन हे तुमच्या पाय दुखीला कारणीभूत आहे. त्यामुळे अशा गोष्टी करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या पायात सतत क्रॅम येत असतील तर कोणताही विचार न करता डॉक्टरकडे जा. कारण फिजिकल आणि इमोश्नल सेल्फ अत्यंत महत्वाचा आहे..
Source DavidWolf
हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा रात्रीची झोप पुर्ण होत नसेल तर होऊ शकतात हे आजार…