प्रथम पूज्य श्री गणेश म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाच्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे बाप्पाची सोंड. पौराणिक कथांनुसार महादेवाने गणेशाचे शीर कापल्यानंतर गणेशाला हत्तीचा चेहरा लावण्यात आला होता.
मानले जाते की, गणपतीची सोंड ही भविष्यवक्ता असते व गणपती बाप्पा भविष्यात होणाऱ्या गोष्टी अगोदरच जाणतो.
देशभरात गणपती बाप्पाचे अनेक अद्भुत आणि दैवी मंदिर असले तरी आज आपण गणपतीच्या अशा मंदिराविषयी सांगणार आहोत, जिथे बिना सोंडीचे गणपती बाप्पा विराजमान आहेत.
बिना सोंडीचे गणपती बाप्पा- नाहरगड च्या डोंगरावर वसलेले आहे हे मंदिर.
खरेतर जयपूरच्या नाहरगड टेकडीवर वसलेले हे मंदिर फार जुने आहे आणि हा किल्ला श्री गणेशाच्या नावाने देशभर प्रसिध्द आहे. या मंदिरात बिना सोंडीचा गणपती बाप्पाची प्रतिमा लावलेली आहे.
350 वर्षे जुने असलेल्या या मंदिरात गणपतीची बालपणाची मूर्ती लावलेली आहे. बोलले जाते की जयपूरच्या नाहरगढ च्या या टेकडीवर महाराजा सवाई जयसिंह यांनी अश्वमेध यज्ञ करून भगवान गणेशाच्या बालपणाच्या मूर्तीची स्थापना केली होती.
असे म्हणतात की जयपूर शहराचा पाया हा या मंदिराची स्थापना झाल्यानंतरच स्थापित झाला.या मंदिराची खासियत म्हणजे या मंदिराजवळ उभा राहून जयपूर शहराचे सुंदर दृश्य सहजपणे बघता येते.
या मंदिरातील गणपतीची मूर्ती अशा प्रकारे बसवण्यात आलेली आहे की ती थेट जयपूरच्या इंद्र पॅलेस मधून दुर्बिणीतून बघितली जाऊ शकते.
या मंदिरामध्ये 365 पायऱ्या आहे. या पायऱ्यांच्या बाबतीत बोलले जाते की रोज एल पायरी बांधण्यात आली आणि या पायऱ्यांचे बांधकाम एक वर्षात पूर्ण झाले.
या मंदिराची एक खासियत म्हणजे या मंदीरात केवळ गणपती बाल रूपामध्ये विराजमान नाहीत तर या मंदिराच्या रस्त्यावर शिवमंदिरही आहे,ज्यामध्ये संपूर्ण शिव कुटुंबाचे चित्र ठेवलेले आहेत.
या मंदिरातील 2 उंदराच्या कानात सांगितलेली भक्ताची इच्छा लवकर पूर्ण होते. गणपतीच्या या स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी लोकं दुरून येतात आणि आपल्या प्रार्थनांची झोळी भरून वापस जातात. परंतु गणपतीच्या या अदभूत स्वरूपाचे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.
हि माहिती आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे खासरे पेज लाईक करायला विसरू नका….
वाचा: गणपती बाप्पा साठी करुया तेवीस प्रकारचे मोदक …!!
वाचा: महाराष्ट्रातील अष्टविनायक ठिकाणाची संपूर्ण माहिती…
वाचा: गणपती बाप्पांनी दिलेल्या आरोग्य टिप्स नक्की वाचा…