दुबई मधील लोकांना हॉलीवूडमधील सीन साधारण वाटतात कारण ते नेहमीच्या आयुष्यात ह्या सर्व गोष्टी बघतात आणि जगतात. त्या सोबतच दुबईत अश्या अनेक वस्तू आणि लोक आहेत ज्यावर विश्वास करणे आपल्याला कठीण आहे चला तर खासरेवर बघूया आज दुबई मधील असेच काही खासरे फोटो,
बुर्ज खलिफा जगातील सर्वात मोठी इमारत या इमारतीचे हवाई दृष्य कधी बघितले तर दुसऱ्या जगातील आभास नक्की तुम्हाला होणार.
येथील लोक राजा सारखे आयुष्य जगतात त्यांच्या रोजच्या वापरातील गाड्या देखील किंग साईझ आहे त्याचा हा एक नमुना तुम्ही खाली बघू शकता.
तुमच्याकडे पैसा आहे आणि कमी वेळेत नवीन जागेवर जायचं असेल तर हि सवारी तुम्हाला दुबई मध्ये मिळू शकेल.
भारतिय पोलिसांना मिळणाऱ्या गाड्या तर तुम्हाला माहितच आहे परंतु दुबई मधील पोलिसाकडे असणाऱ्या शासकीय गाड्या बघून तुम्ही अवाक होणार कारण तिथे मिळतात सुपरकार Bentleys, Ferraris, Lamborghinis या गाड्या.
आपण चॉकलेट वेंडिंग मशीन बघितली असेल पण दुबई येथे तुम्हाला सोन्याची वेंडिंग मशीन भेटणार ज्या मशीन मधून सोन्याची बिस्किटे मिळतात. दुबईमध्ये सोने खरेदीवर शून्य कर आहे.
येथील लोकांना सोने एवढे प्रिय आहे कि त्यांनी गाड्या सुध्दा सोन्यानी मढविल्या आहेत. खालील फोटोत तुम्ही त्याचा एक नमुना बघू शकता.
शौकाखातीर अनेक लोक कुत्रे, मांजर पाळतात परंतु अरबांचे शौकच न्यारे त्यांचे पाळीव प्राणी तुम्ही खालील फोटोत बघू शकता…
दुबई येथील लोकांचा अंदाजच न्यारा आहे येथे उंटाची शर्यत होत असते आणि उंटाला पळवणारे लोक आहे रोबोट त्यामुळे हि शर्यत अजूनच न्यारी आहे.
तुमच्याकडे खूप पैसा आहे तर तुम्हाला इथे सोने सुध्दा खाण्याकरिता मिळू शकते. येथील हॉटेलमध्ये सोनेमिश्रित ह्या डिश फेमस आहे. १००० डॉलर पासून या डिशची सुरवात आहे.
दुबईचे हे टेनिस मैदान बघून चांगले चांगले लोक तोंडात बोट घालतात.
दुबई मधील समुद्रात सर्फिंग करताना अरब लोकांचा एक फोटो..
वाळवंट असलेल्या दुबईत तुम्हाला बर्फाचा पहाडसुध्दा पाहायला मिळू शकतो…
दुबई येथील हॉटेलमध्ये तुम्हाला असाही नजारा बघायला मिळेल.
दुबई हि एक जागा आहे, जिथे ह्या सर्व वस्तू अगदी सामान्य आहे. हे फोटो बघितल्यावर तुम्हाला एकवेळ तरी दुबईला फिरून येण्याचे मन करेल…
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
वाचा हे आहे भारताचे स्कॉटलँड, एक वेळेस अवश्य भेट द्या…