फेसबुक मेसेंजरवरून आपण कधीही कोणालाही तात्काळ मेसेज पाठवू शकतो. हे आपण मोबाईल मधून टेक्स्ट मेसेज पाठवतो त्या सारखेच आहे. मग प्रश्न पडेल की मेसेजच पाठवायचे असतील तर फेसबुक मेसेंजरची गरज काय? पण मोबाईल मधून टेक्स्ट मेसेज पाठवणे आणि मेसेंजर मधून मेसेज करणे यात मुख्य फरक आहे, तो म्हणजे मेसेंजर वरून मेसेज पाठवताना आपल्याला कुठलाही अधिकचा चार्ज लागत नाही. आपण वापरत असलेल्या डेटा प्लॅनमधून आपण मेसेजेस पाठवू शकतो. प्ले स्टोअरमध्ये सर्वाधिक डाउनलोडच्या यादीत मेसेंजर चा 8 वा क्रमांक आहे.
2011 मध्ये फेसबुकने मेसेंजरला अँड्रॉइड आणि आईओएस साठी एक स्टँडअलोन अँप म्हणून प्रकाशित केले होते. फेसबुकने फेसबुक मेसेंजर वापरणे बंधनकारक ठेवले होते, पण 2014 साली हे बंधन हटवण्यात आले. फेसबुकने पुढे वापरकर्त्यांना फक्त मेसेज पाठवण्यासाठी फक्त मेसेंजर न ठेवता अनेक आकर्षक फिचर देऊन जास्त वापरकर्त्यांना मेसेंजरकडे आकर्षित केले आहे.
जाणून घेऊया फेसबुक मेसेंजरचे काही असे फिचर जे नॉर्मल मेसेंजर युजर्स ना माहिती नाहीयेत.
1. फेसबुक मेसेंजर वापरण्यासाठी फेसबुक अकाउंट असणे आवश्यक नाही-
हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे! 2012 साली फेसबूक ने प्रथम घोषणा केली की तुम्हाला फेसबुक मेसेंजर वापरण्यासाठी फेसबुक अकाउंट असणे बंधनकारक नाहीये. तुम्ही अकाउंट नसेल तरीही मेसेंजरवर साइन अप करू शकता. फक्त त्यासाठी नाव आणि नंबर आवश्यक होता. पुढे 2013 मध्ये फेसबुकने वापरकर्त्यांना कोणासही मेसेज पाठविण्याचा निर्णय घेतला. पुढील व्यक्ती आपल्या मित्र यादीत असो वा नसो तरीही आपण मेसेज पाठवू शकतो, फक्त यासाठी एकमेकांचे नंबर सेव्ह असणे आवश्यक अशी. फेसबुक मेसेंजरवर साइन अप करण्यासाठी तुमचे वय 13 वर्ष असणे आवश्यक आहे.
2. फेसबुक मध्ये लॉगिन न करताही वापरू शकता फेसबुक मेसेंजर-
फेसबुक अँप मधून मेसेंजर काढल्यानंतर मेसेंजर वापरण्याबाबत बराच गोंधळ निर्माण झाला होता. बऱ्याच लोकांना हे 2 अँप वेगवेगळे करण्याचा निर्णय आवडला नाही. लोकांनी मेसेंजर अँप वापरण्याऐवजी मेसेजेस बघन्यासाठी ब्राऊजर वापरणे पसंत करू शकता.
मेसेंजरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मेसेंजरला तुम्ही वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट लॉगिन करू शकता. त्यासाठी तुम्हाला फेसबुकला लॉगिन करण्याची गरज नाही. खाजगी संदेश वापरण्यासाठीही तुम्ही मेसेंजरचा उपयोग करू शकता.
3. मेसेंजर द्वारे पाठवू शकता पैसे-
$ या चिन्हावर क्लिक करून तुम्ही मित्रांना सुरक्षितपणे पैशाची देवाण-घेवाण करू शकता, त्यासाठी डेबिट कार्डची आवश्यकता आहे आणि विशेष म्हणजे यासाठी कोणताही चार्ज लागत नाही. मेसेंजरवर पैसे पाठवणे एनक्रिप्टेड आणि पिनद्वारे सुरक्षित आहे. मेसेंजरद्वारे तुम्ही मित्रांना पैसेही मागू शकता. तुम्ही तुमचे पेमेंट थीम आणि बॅकग्राऊंड चेंज करून अधिक आकर्षक करू शकता.
4. पाठवू शकता सीक्रेट मेसेज-
तुमच्या लक्षात आहे का स्नॅपचॅटने फेसबुकची मेसेंजर विकत देण्याची ऑफर नाकारली होती? फेसबुकने मेसेंजरमध्ये बरेच बदल करून त्याला पुर्णपणे स्नॅपचॅटचा अनुभव येईल असे बनवले आहे. फेसबुकने 2016 मध्ये एंड-टू-एंड एनक्रिप्शन दिले आहे ज्याद्वारे आपण सिक्रेट मेसेज पाठवू शकतो. हा मेसेज ठरवलेल्या वेळेनंतर आपोआप डिलीट होतो.
5. मेसेंजर मध्ये इन्स्टाग्राम सारखी स्टोरी ठेवणे हे फेसबुक मध्ये स्नॅपचॅट सारखे आहे-
स्नॅपचॅटसारखे फक्त सिक्रेट मेसेज पाठवणे मेसेंजरला स्नॅपचॅटसारखे ठरवू शकत नाही. फेसबुकने नुकतेच मेसेंजर डे फिचर लाँच केले ज्यामध्ये तुम्ही स्नॅपचॅट सारखं दिवसभरासाठी फोटो आणि व्हिडीओ स्टोरी मध्ये ठेवू शकता. मेसेंजर कॅमेरामध्येही तुम्ही वेगवेगळे स्टिकर्स, मास्क, फ्रेम आणि फिल्टर वापरून तुमचे फोटो गमतीशीर बनवून पाठवू शकता.
6.तुम्ही मेसेंजरद्वारे उबेर किंवा लिफ्ट ऑर्डर करू शकता-
फेसबुकने उबेर आणि लिफ्ट सोबत भागीदारी करून वापरकर्त्यांना मेसेंजर अँप मधून थेट गाडी मागवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी तुम्हाला मेसेंजर अँप मध्ये ‘+’ हे बटन क्लिक करून ‘Request a Ride’ चिन्हावर क्लिक करावे लागेल. तुम्ही मेसेंजर अँप ना सोडता राईड करण्याची विनंती करू शकता.
7. आपले लोकेशन शेअर करण्यासाठी वापरू शकता मेसेंजर-
तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही मेसेंजरचा वापर तुमचे लोकेशन शेअर करण्यासाठी वापरू शकता. हे एकप्रकारे अँपल किंवा गूगल मॅप मध्ये पिन टाकण्यासखे आहे, फक्त मेसेंजरचा उपयोग करून. लोकेशन शेअर केले की ते एक तासासाठी राहते व तुम्ही मेसेंजरमधून बाहेर पडलात तरी ते चालूच राहते. हे तुम्ही प्रवासात असाल तर अत्यंत उपयोगी पडू शकते.
8. तुम्ही मेसेंजर मध्ये खेळू शकता वेगवेगळे गेम्स-
मेसेंजर चे अजून एक छान वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मेसेंजर मध्ये ‘Space invaders’ आणि ‘Pac-Man’ सारखे गेम सहजपणे खेळू शकता. 2016 मध्ये फेसबुकने गेम ही घोषणा केली. त्यामध्ये अजून काही गेम्स ऍड करण्याची आवश्यकता आहे.
आपल्याला माहिती नसलेल्या या सर्व फिचरसह फेसबुक आपल्याला मेसेंजर वापरण्यासाठी आकर्षीत करत आहेच. पन फेसबुक मेसेंजरला सर्वच बाबतीत एक उत्तम स्टँडअलोन अँप बनवण्याचा फेसबुक चा उद्देश आहे.
हि माहिती आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे खासरे पेज लाईक करायला विसरू नका….
जाणून घ्या, फेसबुक मध्ये काम करणारी पहिली महिला…
जाणून घ्या, तुमचे फेसबुक अकाउंटला कोण वारंवार भेट देतो…