बाहुबली मुळे प्रभास हा प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. हे सर्व शक्य कठोर परिश्रम आणि जिद्दीमुळे शक्य झाले. त्याच्या अभिनयामुळे आज तो प्रेक्षकाच्या मनावर राज्य करीत आहे. बाहुबलीनंतर सध्यातरी त्याने कोणत्याही सिनेमात काम केले नाही. तर चला आज खासरे वर बघूया अभिनेता प्रभास विषयी काही खासरे गोष्टी…
प्रभासचे पूर्ण नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती हे आहे (Venkata Satyanarayana Prabhas Raju Uppalapati).
प्रभास “Action Jackson” हा सिनेमा २०१४ साली आला होता. त्यामध्ये त्याने Cameoचा रोल केला होता.
प्रभासला जवळील लोक लाडाने वेगवेगळ्या नावाने आवाज देतात उदा. प्रभा, मिस्टर परफेक्ट, पबसी आणि डार्लिंग या नावाने लोक त्याला आवाज देतात.
प्रभासला लोकांना मदत करायला आवडते. प्रभास दरवर्षी गरजू लोकांना लाखो रुपये दान करत असतो.
प्रभासला अभिनेता होण्याचे स्वप्न नव्हत त्याने हैद्राबाद येथून अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. अभिनय क्षेत्रात येण्या अगोदर त्याला एक उद्योजक व्हायचे होते.
वाचा अभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी…
बाहुबली करिता प्रभासने स्वतःमध्ये अनेक बदल केले. पहिले त्याने २२किलोनी स्वतःचे वजन वाढविले आणि त्यानंतर शिवंडूच्या रोल करिता वजन कमी केले. त्या करिता तो रोज ४० अंडी खात होता.
प्रभासला राजकुमार हिराणीचा मोठा चाहता आहे. त्याने ३ इडियट आणि मुन्नाभाई MBBS हा सिनेमा २० पेक्षा अधिक वेळ बघितला आहे.
प्रभासचा आवडता छंद वाचन आहे. त्याचे स्वतःचे खाजगी वाचनालय सुद्धा आहे. तिथे तो निवांत अनेक विषयावर वाचत असतो.
प्रभासला साहसी खेळ खेळायला आवडता त्याला VolleyBall आणि गिर्यारोहण करण्याची आवड आहे. स्वतःच्या घरी त्याने volleyballचे मैदान तयार केले आहे.
तो पहिला दक्षिणात्य अभिनेता आहे ज्याचा मेणाचा पुतळा मैडम तुसाद संग्रहालय बँगकॉक येथे लावण्यात आला आहे.

बाहुबली करिता साली त्याला २०१० Mister World लक्ष्मण रेड्डी याने विशेष प्रशिक्षण दिले होते. त्यामुळे त्याचे शरीर पिळदार बनले.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा स्मिता पाटील निखळ सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्री..