कर्नाटक राज्यातील पहाड, हिरवे भरगच्च जंगल, चाय आणि कॉफीचे बगीचे येथील प्रसिध्द कुर्ग भारतातील अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. कावेरी नदीचे उगमस्थान कुर्ग आपल्या नैसर्गिक सुंदरते सोबत हाइकिंग, क्रॉस कंट्री आणि ट्रेल्स करिता अतिशय प्रसिध्द आहे. चला खासरे वर अजून या प्रसिद्ध ठिकाणाविषयी अजून माहिती घेऊ या, येथील सहल आपल्याला आयुष्यात अविस्मरणीय अनुभव देईल…
नागरहोळे राष्ट्रीय उद्यान
हे उद्यान दक्षिण भारतातील एक प्रसिध्द उद्यान आहे. जुन्या काळात येथे राजे महाराजे शिकार करण्याकरिता येत होते. आज इथे मोठ्या प्रमाणात हत्ती, वाघ, बिबटे मोठ्या प्रमाणात आढळतात. या सोबतच हरणे, रान गवे आणि माकड असे इत्यादी छोटे प्राणीही मोठ्या प्रमाणात आढळतात. वर्षभर येथील वातावरण थंड असते. इथे पोहचणे थोडे कठीण असल्यामुळे इथे पर्यटकांची वर्दळ कमी असते. जंगल सफारीचा चांगला अनुभव इथे मिळू शकतो.
मडीकेरी जिल्ह्यात कुर्ग हे हिल स्टेशन आहे. या ठिकाणाचे नाव येथील पहिला राजा मुद्दुराजा यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. भारताचे स्कॉटलँड म्हणून हे हिल स्टेशन प्रसिध्द आहे. येथील महल, किल्ला , ओंकारेश्वर मंदिर, राजाचे सिंहासन आणि अब्बी धबधबा प्रसिध्द आहे. मडीकेरी मैसूर पासून १२० किमी दूर आहे.
कुशाल नगर- हा सुध्दा एक चांगला पिकनिक स्पॉट आहे. येथील वातावरण कुर्ग येथील अन्य जागेपेक्षा वेगळे आहे. येथील हवामान आद्रता मडीकेरी पेक्षा जास्त आहे. कुशाल नगर येथे आजूबाजूस अनेक प्रेक्षणीय स्थळे आहे जसे वीरभूमि, निसर्गधाम, तिब्बती मॉनेस्ट्री, स्वर्ण मंदिर आणि हरंगी धरण..
वाचा प्रवासाकरिता जगातील सर्वात स्वस्त देश ७० रुपयांत खाणे, २०० रुपयांत हॉटेल
दक्षिण कुर्ग मधील ब्रम्हगिरी पर्वतरांगेत इर्पू नावाचे एक पवित्र स्थळ आहे. येथेच लक्ष्मण तीर्थ नावाची नदी आहे. दंतकथेनुसार सीतेला शोधण्याकरिता राम आणि लक्ष्मण येथून गेले होते आणि प्रभू श्रीराम यांना पाणी पाजण्याकरिता लक्ष्मणाने ब्रम्हगिरी पर्वतास बाण मारून लक्ष्मण तीर्थ नदिचा उगम झाला होता. नदी इर्पू धबधब्यावरून वाहते. प्रत्येकवर्षी शिवरात्रीस इथे हजारोच्या संख्येत भाविक येतात.
कसे पोहचाल या ठिकाणी: जवळील विमान तळ मैसूर १२० किमी आणि मंगलोर १३५किमी आहे. जवळील रेल्वे मार्ग मैसूर स्टेशन, मंगलोर आणि हासन आहे. रस्ता मार्ग बंगलोर-मैसूर रस्त्याने कुर्ग जाऊ शकता. सोबतच बंगलोर वरून नेलमंगल, कुणिगल, चन्नरायपट्ना या रस्त्याने कुर्गला जाता येते. हे तीनीही ठिकाण राष्ट्रीय महामार्गावर आहे. चन्नरायपट्ना येथून राज्यमार्गाने कुर्ग येथे जाउ शकता. सोबतच येथे बस सुध्दा उपलब्ध आहे.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा हा आहे जगातील सर्वात धोकादायक रेल्वे मार्गापैकी एक, तोही महाराष्ट्रात