शहिदांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे सरसवणाऱ्या अक्षय कुमार आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यंदाची दिवाळीमध्ये शहीद कुटुंबासाठी एक खूप चांगला उपक्रम राबवला आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पना होती की, ज्यांच्या घरातील वडील किंवा मुलगा शहीद झाले आहेत अशा कुटुंबातील सदस्यांबरोबर दिवाळी साजरी करायची. त्यांनी यासाठी अशा 103 कुटुंबाची यादी ही तयार केली. या उपक्रमाबाबत जेव्हा अक्षय कुमारला माहिती समजली तर त्यानेही या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
एरव्ही कायम व्यस्त असणाऱ्या विशेष म्हणजे दिवाळीच्या सनात चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलीस खात्याने ही दिवाळी शहीद कुटुंबासोबत साजरी करून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 103 शहिदांच्या कुटुंबासोबत ही दिवाळी साजरी करण्यात आली आहे. अक्षय कुमारने या उपक्रमात पुढाकार घेत शहीद कुटुंबियांना 25 हजाराचा चेक व एक शुभेच्छा पत्र पाठवले आहे. विश्वास नांगरे पाटील आपल्या सहकाऱ्यांसह या शहीद कुटुंबियांच्या घरी पोहचले तेव्हा कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.
कोल्हापूर परिक्षेत्रातील अशा कुटुंबाची यादी करण्याच्या सूचना विश्वास नांगरे पाटील यांनी दिल्या होत्या. यावेळी शहीद कुटुंबातील सदस्यांना मिठाईचेही वाटण्यात आली. अक्षय कुमारकडून प्रत्येकी 25 हजाराचा चेक मुलांचा शिक्षणासाठी देण्यात आला आहे.
काय लिहिलेय अक्षय कुमारने आपल्या पत्रात-
” आपल्या घरातील शूर शहीद विराने देशासाठी दिलेलं बलिदान हे सर्वोच्च आहे. आम्हा सर्व भारतीयांना या सुपुत्राचा अभिमान आहे. मला पूर्ण कल्पना आहे की, या दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्या सानिध्य आणि प्रेमाच्या आठवणींना उजाळा देत असाल.
आपल्यावर कोसळलेले दुःख हे अपार आणि कठोर आहे. मात्र यातून आपण सावरून धैर्य आणि संयमाने नवीन वर्षात पदार्पण करावे, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
मी या दिवाळीच्या प्रसंगी आपल्या घरातील बालकांसाठी मिठाई आणि त्यांच्या पुस्तकासाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो. आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा, ही नम्र विनंती.”
अक्षय कुमार
हि माहिती आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे खासरे पेज लाईक करायला विसरू नका….
वाचा: दिवाळी निमित्त कॅन्सर पेशंटना टाटाकडून १००० कोटीची भेट
वाचा: जाणून घ्या ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी
वाचा: जगभरात या प्रॉडक्ट्सवर बंदी, मात्र भारतीय बाजारात होत आहे खुलेआम विक्री