चारकांनी निद्रेची व्याख्या सांगताना म्हंटले आहे की, यदां कालान्ते कार्मात्मान: काल्मानीत्वाता: l विषयेभ्यो निवर्ततः तदा स्वपिति मानव: ll
अर्थात – अशी अवस्था ज्यामधे इंद्रिय आपआपल्या विषयांपासून निवृत्त होतात व मन देखील पूर्णत: शिणल्याने आपले कार्य करण्यास असमर्थ होते. त्याच अवस्थेला निद्रा असे म्हणतात.
झोप न येण्याची समस्या फक्त तुम्हालाच नव्हे तर आज भारताचे 46 टक्के वयोवृद्ध या समस्येपासून ग्रासीत आहे. आमच्या जीवनात झोप आणि जेवण यांचे बरोबरीचे संबंध आहे. काही खाद्य पदार्थ असे असतात ज्याने फार झोप येते. यांना आम्ही ‘स्लीपर्स’ म्हणतो. दिवसभराच्या उर्जेसाठी रात्रीची झोप आवश्यक आहे. दररोज ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. आरोग्याच्या अनेक तक्रारींचे मूळ झोप आहे.
चला तर मग जाणुन घेऊया झोप पुर्ण न झाल्याने कोणते आजार होऊ शकता…
1. डायबिटीज
रात्री पुर्ण झोप न घेतल्याने सकाळी लोकांना जास्त शुगर आणि जंक फूड खाण्याची सवय होऊन जाते. अपुऱ्या झोपेमुळे मधुमेहासारखे मेटाबॉलिक आजार जडतात. १९८० पेक्षा आता स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे. आणि अनेक आजार विशेषतः टाईप 2 डाएबिटीस जडण्यास स्थूलता कारणीभूत ठरते. वजन वाढीचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. जर तुम्ही जास्त शुगरचे पदार्थ खाल्ले तर तुमचे ब्लड शुगर लेव्हल वाढेल आणि डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असेल.
2. कँसर
पुर्ण झोप न झाल्यामुळे ब्रेस्ट कँसर आणि इतर कँसर देखील होऊ शकता. कँसर निर्माण करणारे फ्री रॅडिकल्स शरीरातून बाहेर निघण्यास असमर्थ होतात आणि शरीरात जंत जमतात. यामुळे इतर आजार निर्माण होऊ शकता
3. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक
झोपताना आपल्या शरीरातुन अस्वच्छता निघते आणि शरीर रिपेयर होऊ लागते. यामुळे सकाळी आपण जास्त पाणी प्यायले पाहिजे, यामुळे लघ्वीच्या माध्यमातून अस्वच्छता बाहेर निघेल. झोप पुर्ण न झाल्यामुळे हाय ब्लड प्रेशरची रिस्क असते ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोट ची शक्यता वाढते.
4. विसरण्याची सवय
झोपेत मेंदू हार्मोन्स, एन्झाइम्स आणि प्रथिनांचे संतुलन राखतो. मेंदूला श्वास घेण्यासाठी झोप ही एकमेव वेळ असते. झोपल्यावर तुमचा मेंदू पुन्हा पुनर्जीवित आणि ताजा होतो. मेंदू यावेळी दिवसभरचा थकवा दूर करत असतो. जर तुम्ही योग्य प्रकारे झोपले नाही तर मेंदू दिवसभर डिस्टर्ब राहिल आणि तुम्हाला विसरण्याचा आजार होईल.
5. जास्त वेळा लघ्वी
झोप पुर्ण न झाल्यामुळे तुम्हाला जास्त वेळा लघ्वी करण्याची इच्छा होईल परंतु लघ्वी होणार नाही.
हि माहिती अवश्य शेअर करा व इतरांना कळू द्या झोप न घेण्याचे दुष्परिणाम…
Comments 1