भिकारी या शब्दाचा अर्थ असा होतो कि ज्याच्याकडे स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची कुवत नाही तो व्यक्ती म्हणजे भिकारी हा आहे. परंतु भिक मागणे हा धंदा बनवून करोडो कमविले म्हटल तर तुम्हाला नवल वाटेल ना ? तर आज खासरे वर बघूया असा भिकारी जो शंभर व्यापाऱ्यावर भारी आहे…
पटना येथील एका भिकाऱ्याकडे करोडोची संपत्ती आहे हे नुकतेच समोर आलेले आहे. या भिकाऱ्याचे नाव आहे पप्पू कुमार… शारीरिक अपंग असलेल्या पप्पू कडे एकूण १,२५,००,००० रुपयाची संपत्ती आहे. त्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब National बँक, बँक ऑफ बरोडा आणि अलाहबाद बँक या सर्व वेगवेगळ्या बँकेत ४ खाते आहेत ज्या मध्ये ५ लाख रुपये सध्या जमा आहे आणि २००० Sq.Ft.चा प्लॉट आहे.
या व्यतिरिक्त तो स्थानिक छोट्या व्यापाऱ्याना पैसे उधार देतो आणि व्याजासहित त्याची वसुली करायचा हा त्याचा धंदा आहे. पप्पू कुमारचे वय ३३ वर्ष आहे आणि हा भिक मागण्याचा धंदा सध्या तरी बंद करण्याचा त्याचा विचार नाही आहे.
ह्या सर्व गोष्टीचा पत्ता कसा लागला तर अचानक एक दिवस पप्पू कुमारचा पटना स्टेशनवर अपघात झाला. दवाखान्यात RPF द्वारा त्याला भरती करण्यात आल्या नंतर त्याच्याकडील ४ एटीएम कार्ड सापडली त्यानंतर ह्या सर्व गोष्टीचा शोध घेतल्यानंतर सर्वाना आश्चर्याचा धक्काच बसला. पप्पू दिव्यांग आहे शस्त्रक्रियेद्वारा तो बरा होऊ शकतो पण तो शस्त्रक्रियेकरिता नकार देतो.
पप्पू सुशिक्षित आहे दहाव्या वर्गात तो ५७% मार्काने तो पास झालेला आहे. गणित विषयात त्याला १०० पैकी ७७ मार्क होते असा तो अभिमानाने सांगतो. त्याला इंजिनियर व्हायचं होत परंतु त्याच्या शरीरास अचानक लखवा मारल्यामुळे त्याच्यावर भिक मागण्याची वेळ आली. त्यानंतर त्याने पटना रेल्वे स्टेशनवर भिक मागण्यास सुरवात केली. ७ वर्षापासून तो भिक मागत आहे आणि त्याच्या अंगी असलेल्या व्यावसायिक गुणामुळे सध्या तो भारतातील श्रीमंत भिकाऱ्यापैकी एक आहे.
तर हि आहे कथा १.२५ करोड रुपये संपत्ती असलेल्या करोडपती भिकाऱ्याची आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
Source:- Deccan Herald
वाचा ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश