५ फुट ८ इंच उंची व ६४ किलो एवढे वजन परंतु ताकद एवढी कि १ इंच अंतरावरून जरी बुक्की मारली तर मोठ्यात मोठ्या पेहलवान आरामात खाली पडणार. इतिहासातील सगळ्यात जलद माणूस म्हणून कोणी नाव काढले तर एकच नाव पुढे येईल ते म्हणजे मार्शल आर्टचा बादशाह ब्रूस ली… तर चला आज खासरे वर बघुया ब्रूस ली संबंधित काही अपरिचित खासरे गोष्टी…
ब्रूस ली ला मार्शल आर्ट शिकण्यामागची प्रेरणा म्हणजे रस्त्यावर नेहमी होणाऱ्या हाणामाऱ्या त्याकरिता त्याने या क्षेत्रात पाउल टाकले.
ब्रूस ली एवढे जलद होते कि त्यांचे फाईट सीन दाखविण्याकरिता विडीओ स्लो मोशन मध्ये दाखवायचं काम पडत असे. कॅमेरा करिता ब्रूस लीला त्या काळात चित्रित करणे अशक्यच राहायचे.
१९६२ साली झालेल्या एका फाईटमध्ये त्यांनी केवळ ११ सेकंदात १५ बुक्क्या आणि १ लात मारण्याचा रेकॉर्ड केला होता. आत्तापर्यत तेवढ्या जोरात आणि तेवढ्या गतीने कोणीही हा रेकॉर्ड तोडू शकले नाही. हा सामना फक्त ११ सेकंदच चालला होता.
संपूर्ण जगात ब्रूस ली चे चाहते आहे परंतु ब्रूस ली हा ग्रेट गामा पहिलवानाचा फार मोठा चाहता होता ग्रेट गामा हा त्यांच्या संपूर्ण ५० वर्षाच्या व्यावसायिक आयुष्यात अपराजित राहिलेला आहे.
त्याच्या संपूर्ण व्यावसायिक आयुष्यात ब्रूस ली हा केवळ एक वेळा मार्शल आर्ट स्पर्धेत हरलेला आहे. बाकी संपूर्ण आयुष्य तो अपराजित राहिला.
ब्रूस ली हा अर्धा जर्मन होता कारण ब्रूस लीची आई जर्मन होती आणि वडील चायनीज त्यांनी सुध्दा बऱ्याच सिनेमात काम केलेले आहे.
वाचा भारताला ऑलम्पिकसहित पाच अंतराष्ट्रीय किताब मिळवून देणारा “गुंगा पहलवान”
तुम्हाला वाटेल कि ब्रूस ली कशालाच घाबरत नसेल पण ब्रूस ली ला पाण्यापासून नेहमी भीती वाटायची कारण त्याला पोहणे येत नसे.
ब्रूस ली एक उत्तम चा चा डान्सर सुध्दा होता. होंग कॉंग येथील १९५८ साली झालेली चाचा स्पर्धा त्याने जिंकली होती.
त्या सोबतच ब्रूस ली हा एक उत्तम ड्रायवर, एक कवी होता. तो स्वतः कविता लिहून त्यावर अभिनय करत असे. वयाच्या २० व्या वर्षीच त्यांचे हॉंग कॉंग मध्ये १८ सिनेमे प्रदर्शित झाले होते.
१९६३ साली त्याने अमेरिकन सैन्यात दाखल होण्याचा प्रयत्न हि केला होता तुम्हाला वाचून नवल वाटेल परंतु त्याच्या कमजोर दृष्टी आहे हे कारण सांगून त्याला सैन्या करिता अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर त्याने Contact Lenses चा वापर सुरु केला होता.
१९६० च्या काळात मार्शल आर्ट शिकविण्याची ब्रूस लीची फी २५० डॉलर एवढी होती. त्या काळात हि रक्कम खूप मोठी होती.
ब्रूस ली कोणापासूनही ३ फुट दूर उभे राहून सेकंदाचा ५वा हिसा ०.०५ सेकंदात जोरदार ठोसा मारू शकत होते. यावरून तुम्ही त्यांच्या गतीची कल्पना करू शकता.
त्या काळात कोका कोला कॅन आजच्या पेक्षा अधिक जाड असायच्या परंतु ब्रूस ली आरामात त्या कॅनला त्यांच्या बोटाने छिद्र पाडायचे.
ब्रूस ली एका वेळेस अनेक काम करत असे जसे टीव्ही पाहणे, पुस्तक वाचणे आणि सोबतच वजन उचलणे हे सर्व ते एका वेळेस करत असे.
आपल्या शरीरात ज्या ग्रंथिमुळे घाम तयार होतो ती ग्रंथीच ब्रूस लीने शस्त्रक्रिया करून काढून टाकली होती.
ब्रूस लीचा वेग आणि हालचाल एवढी तीक्ष्ण होती कि तांदुळाचा एक दाना हवेत फेकून तो चॉपस्टिकने हवेतच पकड असे. येवढच काय तर ब्रुस ली तुमच्या हातातील शिक्का मुठ्ठी बंद करायच्या आधीच बदलवून दुसरा ठेवत असे.
ब्रूस ली याने हॉलीवूडमधील ८ सिनेमात काम केले त्यापैकी ३ सिनेमे त्याच्या मृत्यूनंतर प्रसिध्द झाले. हॉलीवूड Hall Of Fame मध्ये त्याचा आजही फोटो अभिमानाने लावलेला आहे.

ब्रूस ली यांचा मृत्यू डोके दुखीच्या गोळया अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे झाला होता. ह्या गोळ्यामुळे त्यांच्या मेंदूचा आकार १३% ने वाढला होता.
हि माहिती आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे खासरे पेज लाईक करायला विसरू नका….
वाचा WWE मधील पहिली भारतीय महिला भल्याभल्यांना देत आहे धोबीपछाड…