लोकशाहीत दुर्लक्षित घटक तृतीयपंथीय आज काल प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया ग्रामपंचायत सध्या दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे.
तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत एका तृतीयपंथी उमेदवाराने सहा उमेदवारांना पराभूत करत विजयाची मोहोर उमटवली आहे. ज्ञानदेव कांबळे असे त्यांचे नाव असून ते माळशिरस तालुक्यातल्या तरंगफळ गावच्या सरपंचपदी निवडून आले आहेत. तरंगफळ गावातील गावकऱ्यांनी भाजप पुरस्कृत तृतीयपंथ ज्ञानदेव कांबळे यांना निवडून दिलं.
वाचा भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश
ज्ञानदेव १६७ मतांनी विजयी झाले आहेत. तरंगफळ ग्रामस्थांनी तृतीयपंथी निवडून दिल्यानं खऱ्या अर्थाने लोकशाहीची सन्मान होत असल्याचं चित्र आहे.
वाचा तृतीयपंथी आई गौरी सावंतची सत्य घटना…
हा विजय आमचा आहे.