गडकोटांच्या राज्यात फिरणाऱ्यांना प्रमोद मांडे हे नाव आता चांगलेच परिचयाचे आहे. मार्गदर्शक, सह्याद्रीपुत्र , दुर्गमहर्षी आदरणीय श्री. प्रमोद मांडे उर्फ ‘भाऊ’ यांचे सकाळी ११.१५ वा. दीनानाथ रुग्णालय येथे दुःखद निधन झाले आहे. खासरे परिवारातर्फे दुर्गमहर्षी आदरणीय श्री. प्रमोद मांडे सरांना भावपुर्ण श्रद्धांजली
दुर्गमहर्षी प्रमोद मांडे उर्फ भाऊ यांचा अल्प परिचय
प्रमोद मांडे हवं शिवप्रेमी असून त्यांनी आजपर्यंत शिवाजी महाराजांनी प्रवास केलेल्या राजगड ते आग्रा आणि आग्रा ते राजगड अशा सात राज्यातून जाणाऱ्या ६३०० की.मी.मार्गावर २ वेळा प्रवास करून या ऐतिहासिक मार्गाचे संशोधन आणि चित्रीकरण केले आहे.
टाटा मोटर्स येथे २२ वर्षे कार्यरत राहून त्यांनी सह्याद्रीमध्ये सतत ४० वर्षे पदभ्रमण,फोटोग्राफी करून ६५० किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट दिली.युवअवस्थेपासून वाचन व लेखन हा त्यांचा आवडीचा छंद राहिला आहे.छंदातून भ्रमंती करताना त्यांच्या दांडग्या वाचनामुळे ते इतिहास संशोधनही करू लागले. २५०० पुस्तकांचा त्यांचा व्यक्तिगत पुस्तक संग्रह आहे. ३००० स्लाइड्स व ६८००० हुन अधिक फोटोग्राफ्स त्यांच्या संग्रही आहे. ४५० दुर्मिळ क्रांतिकारकांचे दुर्मिळ फोटो व तैलचित्र त्यांच्या संग्रहात आहेत. कोल्हापूरचे छत्रपती शाहु महाराज यांच्याकडून ‘दुर्गमहर्षी’ किताबाने गौरव केला आहे.
सतत वाचन,चिंतन,संशोधन यातूनच गडकिल्ले महाराष्ट्राचे,सह्याद्रीतील रत्नभांडार,स्वातंत्र्यासंग्रामातील समिधा स्वातंत्र्यसंग्रामातील अंगार,स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका,१११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र मराठी,इंग्रजी,गुजराती आणि कन्नड भाषेत प्रकाशित झाले.तसेच महान्यूज,लोकराज्य,पुणे परिचय आणि अनेकविध नियतकालिकांमधून लेख प्रकाशित झाले. टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, पुणे परिचय, महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य, पुढारी, सामना, चित्रलेखासह अनेक वृत्तपत्रे, मासिके यात लेखन त्यांनी केलेले आहे.
वाचा तानाजी मालुसरे व शिवरायांची कवड्याची माळ वाचा संपूर्ण इतिहास
इतिहासाची योग्य माहिती विद्यार्थी व शिवप्रेमीपर्यंत पोहचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.व्याख्याने व शोजच्या माध्यमातून ते अनेक शैक्षणिकसंस्था व इतर सेवाभावी संस्थांमध्ये सातत्याने कार्य असतात.महाराष्ट्र व इतर राज्यातील किल्ल्यांचे ३५० शोज् त्यांनी तयार केले आहेत.तसेच कथा क्रांतिकारकांच्या,पाठव व्यथा क्रांतिकारकांच्या,महाराष्ट्रातील किल्ले,परिचित व अपरिचित शिवाजी महाराज या अशा विविध विषयांवर त्यांनी १२०० हुन अधिक व्याख्याने त्यांनी केलेली आहेत.
आझादी के दिवाने(क्रांतिकारकांच्या जीवनावरील प्रदर्शन),सह्याद्रीतील रत्नभांडार (किल्ले,मंदिरे,लेणी,इ.फोटो प्रदर्शन),व किल्ल्यापलिकडे किल्ले (भारतातील किल्ल्यांचे प्रदर्शन)अशी महाराष्ट्र इतर राज्यात ६०० हुन अधिक प्रदर्शन भरविली आहेत.
वाचा मराठ्यांची दक्षिण स्वारी : पोर्टो नोवोवर विजय
महाराष्ट्रभर फिरून सर्व दुर्गाचा अभ्यास ज्या मोजक्या अभ्यासकांनी केला आहे, त्यामध्ये मांडेंचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या या राज्यव्यापी दुर्गभ्रमंती आणि अभ्यासातून साकारलेला एक दुर्गकोश म्हणजे- ‘गडकिल्ले महाराष्ट्राचे’! महाराष्ट्राला ‘दुर्गाच्या देशा’ असे म्हटले जाते. या राज्यात पाचशेच्या वर किल्ले असावेत असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. पण हे सर्व किल्ले राज्यभर अनेक दुर्गम जागी, खेडोपाडी असे विखुरलेले आहेत. या सर्व किल्ल्यांना भेटी देणे, त्यांचा अभ्यास करणे हे तसे एखाद्या गिरिदुर्गाएवढेच महत्त्वाचे काम आहे. या पाश्र्वभूमीवर मांडेंनी हे दुर्गाचे राज्य स्वत: पायदळी तुडवले, त्यांचा अभ्यास केला आणि एक सुसूत्र पद्धतीने जनतेसमोर आणले आहे- ‘गडकिल्ले महाराष्ट्राचे’!
भाऊच्या स्मृतीस खासरे परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
वाचा कवीराज भुषण यांनी शिवरायांच्या स्तुतिपर रचलेल्या “इंद्रजिमी जृंभ पर” काव्याचा अर्थ काय ?